Parijatak : पारिजातक

#पारिजातक... सुंदर आठवण

©सौ . सुचिता वाडेकर... ✍️

 




व्हाट्स अँप वर पारिजातकाच्या फुलांच्या 💮💮 सुदंर कलाकृती पाहिल्या आणि माझ्या मनातील आठवणीच्या कप्याचे दार किलकिले झाले... मी हळूच डोकावून पाहिले.




माझ्या लहानपणीची गोष्ट..  माझे काका काकू 👨‍👩‍👧‍👦 वाईला गंगापूरी मध्ये एका देशपांडयांच्या वाड्यात रहायचे. आम्ही शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी त्यांच्याकडे जात असू. वाडा 🏡अगदी भलामोठा होता.. वाड्याला भला मोठा दरवाजा होता. दरवाजाला लागून  संरक्षणासाठी भलीमोठी भिंत 🧱 होती त्यामुळे आत प्रवेश केल्यावर बाहेरच्या जगाशी संपर्क तुटल्यासारखे वाटायचे. दरवाजातून आत आल्यावर समोर वाड्याकडे जायला रस्ता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला आंगण 🌱🌷🌼🌺🌿☘️ लागायचं.. आंगण रस्त्याच्या थोडं म्हणजे साधारण एक फूट उंच होत.


रस्त्याने वाड्याच्या जवळ जाताच वाड्याच्या समोरच नगर पालिकेने दिलेला पाण्याचा नळ  होता.. आणि दोन पायऱ्या चढल्या की वाड्यात प्रवेश व्हायचा. एकदा पावसाळ्यात⛈️ आंगण आणि वाड्याच्या मोकळ्या जागेत प्रचंड पाणी साठले.. त्यावेळी आम्ही भावंडानी  कागदाच्या बोटी 🚣करून त्यात सोडल्या होत्या.. त्या बोटी तरंगताना खूप मस्त वाटले होते.. तसेच काकांकडे एक इंजिनची बोट 🚢 होती ती प्रत्यक्ष पाण्यावर चालायची... माझ्या मोठया भावाने ती पाण्यावर सोडली..  तिच्या इंजिनाचा होणारा आवाज, तिची ती पाण्यावरील रपेट... आज ते चित्र डोळ्यासमोर 👀 उभे राहते... खूप छान क्षण होते ते.


वाड्याचा एक भाग बंदच होता. वाडा दुमजली होता.. पण कुठेही खिडकी, गॅलरी दिसत नव्हती.. उजेडासाठी झरोके मात्र असावेत. वाड्याचे छप्पर कौलारू जुन्यापद्धतीचे निमूळते होते, 🏡जेणेकरून पावसाचे पाणी⛈️ झरकन वाहून जात असे. वाड्याचा वरचा भाग मात्र बंदच होता. वाड्याच्या आजूबाजूला खूप झाडी अन या झाडीत दडलेला हा वाडा.. खूप भयाण आणि 😳 भीतीदायक वाटायचा. या गोष्टी आठवताना वाड्यासोबत त्या जुन्या काळातील ज्यांनी कुणी हा वाडा बांधला असेल ती माणसे आणि त्यांचा वाड्यातील वावर कसा असू शकेल याचे चित्र मात्र  डोळ्यासमोर 👀 उभे राहते.


वाड्यातून आत गेल्यावर ओसरी लागायची.. ओसरी मात्र भलीमोठी होती, तिथे आम्ही दुपारच्या वेळात भांडीकुंडी 💃💃खेळत असू. ओसरीच्या बाजूला एक बंद दरवाजा होता.. बहुतेक तो वर जाणारा असावा. या दरवाजाच्या बरोबर समोर म्हणजे ओसरीच्या दुसऱ्या बाजूलाही असाच एक बंद दरवाजा  होता. या बंद दरवाजांची मलामात्र खूप भीती वाटायची. हे दरवाजे मात्र भक्कम, मजबूत, जुन्याकाळातील कोरीवकाम केलेले काळ्या कलरचे होते.


माझ्या काकांकडे गोष्टींच्या पुस्तकांचा 📚 खजिनाच होता.. चांदोबा, सिंदबादच्या सफरी, राजकन्या आणि सात बुटके, फास्टर फेणे... अशी कितीतरी अगदी छोटी छोटी 📚 पुस्तके होती... त्यामुळे या पुस्तकांचे वाचन, आजूबाजूची झाडी.. 🌳🌵🌱🌴 ती भयाण शांतता आणि वड्याचे बंद दरवाजे यामुळे भीती अजूनच वाढत असे.. यात भारीत भर म्हणून शाळेतील मैत्रिणींनी सांगितलेल्या भुताच्या गोष्टी आठवत असत मग भीती अजूनच वाटायची.


भलीमोठया ओसरीतून आत गेल्यावर मधली खोली लागायची. या खोलीत अभ्यासासाठी एक टेबल होते, त्यावर भावंडानची अभ्यासाची बरीचशी पुस्तके मांडलेली असायची... त्यावर एक टेबल लॅम्प💡 असायचा.. तो लावून तिथे गोष्टीची पुस्तके वाचायला मला खूप आवडायचे. या खोलीत बाजूच्या भिंतीत एक दरवाजा होता मात्र त्याला बाहेरून जाळी लावली होती.. कदाचित हा दरवाजा उजेडासाठी असावा कारण वड्याला कुठेही खिडकी दिसत नव्हती. वड्याच्या भिंतीही खूप रुंद होत्या.


हा भिंतीतील दरवाजा उघडून तिथे काकूची शिलाई मशीन आरामात बसायची. कंटाळा आला की या मशीनची वादि काढून मशीन चालवायची अन दरवाजातून बाहेर बघत पक्षानचे 🐦🐦आवाज ऐकायचे हा जणू छंदच मला जडला होता. त्यांनंतर स्वयंपाकघर लागायचे.. या स्वयंपाक घरातून मागील आंगणात जायला दरवाजा होता. तसेच ओसरीच्या दुसऱ्या बाजूला ही तशाच खोल्या होत्या.


वाड्याच्या चारी बाजूने भरपूर मोकळी जागा होती तिथे सिताफळाची झाडे होती. दुपारच्या वेळात भांडीकुंडी खेळताना या सिताफळाच्या झाडाची 🍃पाने आणि त्याच्या कळ्या आम्ही तोडून आणायचो. सिताफळाची पाने खेळण्यातील वाटीच्या साहाय्याने गोल कापली की त्याची पोळी 🍪 तयार व्हायची.. आणि सिताफळाच्या कळ्या अगदी भेंडी सारख्या दिसायच्या त्यामुळे त्याची आम्ही भेंडीची 🥗 भाजी बनवायचो. चपाती आणि भेंडीची भाजी.. खोटा खोटा चहा ☕️ हा आमचा ठरलेला मेनू असायचा.


वाड्याला एक परसदार होते... तिथे खूप सारी झाडे, 🌲🌴🌵 होती त्यात भली मोठी चिंचेची सुद्धा झाडे 🌳🌳होती. मला नेहमी तो भुताचा वाडा वाटायचा..  कारण तिथे फारशी कोणाची वरदळ नसायची. झाडी भरपूर असल्यामुळे पालापाचोळाही 🍂🍁भरपूर व्हायचा. या परसदरी जाताना या पालापाचोळयावर 🍂🍁 पाऊल पडताच चुर्रss चुर्रss असा आवाज व्हायचा.. त्या आवाजाने मनात धसss व्हायला व्हायचं.. पुरती गळण उडायची. तिथे असलेल्या झाडांवर अनेक पक्षाचे 🐦🐦 संसार देखील होते त्यामुळे सतत तिथे चिवचिवाट असायचा.. त्या भयाण शांततेत त्याचाच काय तो दिलासा मिळायचा.


तसे वाड्यात माझ्या काकांचे कुटूंब 👨‍👩‍👧‍👦 आणि आणखी एक कुटूंब 👨‍👩‍👧‍👧 वस्तीला होते. त्या कुटुंबात देखील माझ्या वयाच्या मुली 👭 होत्या त्यामुळे दुपारच्या वेळात आम्ही खेळत असू. वाड्याचा मालक मुंबईला असायचा... त्यांच्या कुटूंबातील कोणी फारसे इकडे यायचे नाही.. मात्र माझ्या काका काकूंनी त्या वाड्याला स्वतःच्या घराची काळजी घेतो इतकं प्रेमानं 👩‍❤️‍👨 सांभाळल. या वाड्याच्या मागच्या बाजूला एक अंगण होत...  त्या अंगणात एक पारिजातकाच झाड 🌿होत.. त्याच्या फुलांचा 💮💮 रोज सुंदर सडा पडायचा. एक महादेवाची 🛕 पिंडदेखील होती... तिची काका काकू रोज पूजा करायचे.


मी तिकडे सुट्टीला गेले की रोज सकाळी पारिजातकाची फुले 💮💮गोळा करण्याचे काम माझे असायचे..  रोज सकाळी सकाळी तो सडा पाहिला की नकळत माझी पावले तिकडे वळायची.. अगदी टोपलीभर फुले 💮💮 गोळा व्हायची. त्यानंतर आंघोळ आणि मग कळशीभर पाणी घेऊन महादेवाची पूजा हे माझं अगदी आवडीच काम.








पिंड पाण्याने स्वछ धुऊन झाल्यावर टोपलीतील पारिजातकाचे एक एक फुल 💮💮 पिंडीवर ठेवून सुंदर सजावट करायची हा माझा आवडता छंद असायचा... यात एक तास कसा जायचा कळायचे देखील नाही. पण पिंडीवरील पारिजातकाची सजावट इतकी मनमोहक वाटायची की त्याकडे नुसते बघतच रहावे वाटायचे. पिंडीच्या आकारावर अगदी जवळ जवळ ती फुले मी ठेवायची त्यामुळे पारिजातकाचीच पिंड वाटायची. सुंदर सजावट करून झाल्यावर कितीतरी वेळ मी नुसती त्याकडे पहात रहायची इतका तो पारिजातक त्यावर खुलून दिसायचा.


पारिजातकाची ही मऊ लूसलूशीत नारंगी दांडा असलेली पांढरी शुभ्र फुलं.. 💮💮सर्वांच्याच आवडीची. आज व्हाट्सअप वर अशीच काही सुंदर पारिजातकांच्या फुलांची 💮💮 सजावट असलेली चित्रे पहायला मिळाली अन माझं मन बालपणातील या आठवणीनच्या सुंदर क्षणात फेरफटका मारून आले. 😊😊


• कसा वाटला ब्लॉग...
• आवडला का... 

• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 
• फॉलो करा. 

धन्यवाद ! 🙏 

©सौ. सुचिता वाडेकर...✍️

फोटो : व्हाट्स अँप सौजन्य 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या