About us

   

"मनोगत, रेसिपी आणि बरंच काही"

 नमस्कार 🙏🏻

"मनोगत, कथा, कविता, लेख, रेसिपी" मध्ये तुमचं स्वागत..!



https://suchitamw.blogspot.com

ही वेबसाईट सौ. सुचिता मिलिंद वाडेकर चालवत आहेत. या साईटच्या माध्यमातून मनोगत, आठवणी, रेसिपी, कथा, कविता, लेख वाचकांपर्यंत पोहोचवणे हा उद्देश आहे. या ब्लॉग मध्ये तुम्हाला विविध रेसिपी, कथा, कविता, लेख पहायला मिळतील.





या रेसिपीसोबत अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. आपण कितीही मोठे झालो तरी या आठवणी आपल्याला नेहमी सोबत करतात, अगदी बिलगून असतात मनाच्या अस्तराला. थोडा निवांतपणा मिळाला की ते अस्तर हलते आणि आठवणी चमकू लागतात... असंच काहीसं झालंय माझं.

या आठवणी जपून ठेवल्यात माझ्या या डायरीमध्ये...  ही डायरी मी हळूहळू ओपन करतेय तुमच्यासमोर. प्रत्येक पानामध्ये काही ना काही देण्याचा प्रयत्न मी नेहमी करेन.




याशिवाय लेख, कथा, कविता या माध्यमातून मी माझ्या भावना व्यक्त करू लागले. यातूनच अनेक रेसिपी देखील जन्माला आल्या. काही रेसिपी सासूबाईंनी तर काही आजी, काकू, आईने शिकवल्या तर काही मी स्वतः माझ्या मुलीसाठी तयार केल्या आहेत.




यामध्ये माझं मनोगत आहे, आजूबाजूला घडलेल्या घटना, किस्से, आठवणी, कथा, कविता, लेख आणि माझ्या आवडत्या मी स्वतः बनवलेल्या रेसिपी देखील आहेत. याशिवाय माझ्या लेकीने बनवलेल्या रेसिपी देखील तुम्हाला पहायला मिळतील.





स्वतः बनवलेल्या रेसिपी : सुचिता वाडेकर 



स्वतः बनवलेल्या रेसिपी : सुचिता वाडेकर 




स्वतः बनवलेल्या रेसिपी : सुचिता वाडेकर 



स्वतः बनवलेल्या रेसिपी : सुचिता वाडेकर 





स्वतः बनवलेल्या रेसिपी : सुचिता वाडेकर 



व्हेज, नॉनव्हेज, स्नॅक्स, हेल्दी, पारंपारीक, सणवार अशा विविध प्रकारच्या रेसिपी तुम्हाला इथे पहायला मिळतील.


मला खात्री आहे.. तुम्हाला माझ्या या डायरीतील प्रत्येक पान वाचायला आवडेल.


धन्यवाद! 🙏🏻

©सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻️









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या