'समीक्षा' चित्रपट - क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम




#चित्रपट_समीक्षा

#चित्रपट_क्रांतिज्योती_विद्यालय_मराठी_माध्यम 

#लेखन_दिग्दर्शन_हेमंत_ढोमे 

#निर्मिती_क्षिति_ढोमे 


समीक्षा..

८ जानेवारीला ‘क्रांती ज्योती विद्यालय’ मराठी माध्यम हा सिनेमा बघितला. सिनेमा खूप मस्त आहे.. म्हणजे हेमंत ढोमेंचे दिग्दर्शन उत्तम आहे, चित्रपटाची मांडणी उत्तम केलीये, कलाकार उत्तम निवडले आहेत, प्रत्येकानेच अभिनय सहज सुंदर केला आहे, छायाचित्रण तर एकदम सुरेखच झाले आहे. जाता जाता एक उत्तम विचार ही दिलाय जो भावी पिढीला नक्कीच मार्ग दाखवेल आणि या निमित्ताने काही मराठी शाळा तरी कायमच्या बंद होण्यापासून वाचतील हे नक्की. 


या चित्रपटाला थोडी विनोदाची झालरही आहे.. जसे पाण्याचे शिंथोडे उडवल्यावर अंगावर शहारे येतात ना तसे वाटते अगदी; त्यामुळे चित्रपट हलका फुलका झाला आहे. अमेय वाघ आणि त्याचा प्रिंसुली एकदम भारी म्हणजे ते दोघेही या चित्रपटाची जान आहेत. खूप सहज सुंदर अभिनय केलाय दोघांनी. छोट्याशा भूमिकेतही प्रिंसुली भाव खाऊन जातो. 


सचिन खेडेकरांचा सहज सुंदर अभिनय एका मुख्याध्यापकाची तळमळ जिवंत उभी करतो आणि छोट्याशा भूमिकेत देखील निर्मिती ताई नेहमी प्रमाणेच भाव खाऊन जातात. सिद्धार्थ, प्राजक्ता, कादंबरी, पुष्कराज, हरीश, क्षिती या सर्व अभिनेत्यांच्या भूमिका देखील त्यांनी खूप सुंदर केल्या आहेत. सायली संजीव छोट्याशा भूमिकेत देखील तिच्या गोड चेहऱ्यामुळे लक्षात राहते. 


नेहमीप्रमाणेच बेरकी नजर असलेल्या अनंत जोगांची खलनायकी भूमिका देखील सहज, सुंदर आणि उत्तम झाली आहे. फक्त त्यांचा जो क्लायमॅक्स दाखवण्याचा प्रयत्न केलाय तो ओढून ताणून आणलाय असे वाटते.. म्हणजे तो चित्रपटाला सूट होत नाही असे कुठेतरी वाटते. 


बाकी सिनेमा उत्तमच आहे. हेमंत ढोमेंच्या आधीच्या चित्रपटांच्या तुलनेत हा सिनेमा उजवा ठरतो. आपण आपली तुलना इतरांशी करण्यापेक्षा स्वतःच्याच आधीच्या कामांशी केली तर आपण चांगले जज बनून स्वतःमधील कमी चांगल्या प्रकारे ओळखू शकतो आणि पुढच्यावेळी त्याची पुनरावृत्ती टाळता येते असे आपले माझे प्रामाणिक मत आहे. 


बाकी चित्रपट सुरु झाल्यावर मध्यन्तर कधी होतो आणि त्यानंतर शेवट कधी येतो कळतही नाही इतका त्याचा फ्लो सुरेख झाला आहे. विचार करायला भाग पाडणारा आणि एकदम पैसा वसूल सिनेमा आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी मिळून एकत्र बघण्यासारखा आहे. तुम्हीही वेळ काढून नक्की बघा. ही सिनेमाची जाहिरात नसून चित्रपट पाहिल्यावर मनात आलेले विचारआहेत. 😄

धन्यवाद! 🙏🏻


©सुचिता वाडेकर..✍🏻

१० जानेवारी २०२६


#कलाकार 

#सचिन_खेडेकर 

#निर्मिती_सावंत 

#अनंत_जोग

#सायली_संजीव 

#अमेय_वाघ_प्रिंसुली 

#सिद्धार्थ_चांदेकर 

#प्राजक्ता 

#कादंबरी_कदम 

#पुष्कराज

#हरीश

#क्षिती_ढोमे 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या