"मनोगत...!"
नमस्कार! 🙏
मी सौ. सुचिता वाडेकर.
माझी मुलगी 'आर्या मिलिंद वाडेकर' हिने पाचवीची परीक्षा दिली असून सध्या तिला उन्हाळ्याची सुट्टी आहे. दरवर्षी उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की काही दिवस बाहेर फिरायला जाणे, समरकॅम्प, स्विमिंग यात सुट्टी पार पडत असे.. यावेळी नेहमी वाटायचं की आपण अनुभवलेलं बालपण आपण देऊ शकू की नाही आपल्या मुलांना कुणास ठाऊक... काळ बदलला, परिस्थिती बदलली, माणसं बदलली, विभक्तकुटुंब पद्धती आली, शिक्षणपद्धती महाग झाली, 'हम दो हमारे दो' वरून 'हम दो हमारा एक' आला आणि मुलांना वाढवण्यात नवीन समस्यादेखील समोर येऊन उभ्या ठाकल्या... याला तुम्ही, मी आणि कुणीही अपवाद नाही.
एक मुल, त्याचे अति लाड, मग त्याचा हट्टीपणा, सोबतीला विज्ञानाचा चमत्कार... मोबाईल, सोशल मीडिया, इंटरनेटचा अति वापर यामुळे नवनवीन समस्या निर्माण होऊ लागल्या आणि त्याला तोंड देताना नोकरी, घर सांभाळत आईबाबांची तारांबळ होऊ लागली.
Women's Day Special : महिलादिन विशेष
याबद्दलच्या माझ्या मनातील भावना मी खालील कवितेतून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय...
"बदलत गेला तो काळ...!"
बदलत गेला तो काळ,
तशी सृष्टी बदलली...
अन माणसं ही बदलली...
परिवर्तन सृष्टीचा नियम आहे,
अन माणसं ही बदलली...
परिवर्तन सृष्टीचा नियम आहे,
याला कुणीही अपवाद नाही...
जिथे हिरवी जंगले होती,
जिथे हिरवी जंगले होती,
तिथे सिमेंटची जंगले वसली...
प्रत्यक्ष दिसणारी चिऊताई,
प्रत्यक्ष दिसणारी चिऊताई,
गोष्टीतील चित्रात जाऊन बसली...
नऊवारीतील स्त्री सलवार कमीज मध्ये...
अन सलवार कमीजमधील स्त्री,
नऊवारीतील स्त्री सलवार कमीज मध्ये...
अन सलवार कमीजमधील स्त्री,
जीन्स टॉप मध्ये दिसू लागली...
बघता बघता इंग्रजीचे वारे वाहू लागले,
बघता बघता इंग्रजीचे वारे वाहू लागले,
अन आई बाबांचे मॉम डॅड झाले...
शाळांमध्ये मराठीची
शाळांमध्ये मराठीची
उलटी गिनती सुरु झाली...
इंग्रजाळलेल्या पालकांना शाळांचे बोर्ड,
इंग्रजाळलेल्या पालकांना शाळांचे बोर्ड,
स्टेट्स वाटू लागली...
अन मुलांची मात्र यात
अन मुलांची मात्र यात
फरफट होऊ लागली...
महाराष्ट्राच्या इतिहासातील गड किल्ले पाठयपुस्तकातून गायब झाले...
अन महाराष्ट्राचा इतिहास मुलांना,
महाराष्ट्राच्या इतिहासातील गड किल्ले पाठयपुस्तकातून गायब झाले...
अन महाराष्ट्राचा इतिहास मुलांना,
सिनेमातून दाखवण्याची वेळ आली...
बदलत गेला तो काळ,
बदलत गेला तो काळ,
कधी ते कळलेच नाही...
याला तुम्ही, मी अन कुणीही
याला तुम्ही, मी अन कुणीही
अपवाद नाही...!
© सौ. सुचिता वाडेकर...✍
या सर्वांत मुलांचे बालपण हरवून चालले की काय असे वाटू लागले असताना कोरोनाच्या भीतीने का असेना यावर्षी सर्वजण सक्तीची विश्रांती घेत(वर्क फ्रॉम होम) घरी एकत्र हा काळ घालवत आहेत. मनामध्ये धाकधूक असली तरी मुलांसोबत, घरच्यांसोबत वेळ घालवताना पूर्वी आपण घालवलेली उन्हाळ्याची सुट्टी खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा एन्जॉय करीत आहेत आणि मुलांना त्यांचं हक्कचं बालपण परत मिळतंय हे पाहून नक्कीच सर्वांची मने सुखावत आहेत याची खात्री आहे.
माझ्या मुलीलाही ते देण्याचा आमचाही प्रयत्न चालू आहे आणि विशेष म्हणजे तीही खूप खुश आहे. कोरोनाच्या भीतीमुळे कामवाल्या मावशी सुट्टीवर असल्याने घरकामात ती मला मदत करू लागली... ज्या गोष्टी आम्ही तिला शिकवू शकू की नाही असे वाटत असताना ती त्या सहज करू लागली.. केर काढणे, भांडी लावणे, कपड्यांच्या घड्या घालणे, देवपूजा करणे, संध्याकाळचा चहा करून सर्वांना देणे, चहा पिल्यावर सर्वांचे कप उचलून सिंकमध्ये ठेवणे हि कामे तीला आवडू लागली हे पाहून खूप छान वाटते आहे.

दोन वर्षांपूर्वी बालभवनच्या संस्कार वर्गाला आर्या गेली होती.. तिथे ती काकडी कापणे, भेंडी चिरणे, भेळ बनवणे, लिंबू सरबत बनवणे हि कामे शिकली होती... तेव्हापासून कधी कधी ती मला भेंडी चिरूनही द्यायची.. तसेच बऱ्याचदा लिंबूसरबतही बनवायची... आलं घातलेलं सरबत मला आवडतं म्हणून माझ्यासाठी स्पेशल आलं घातलेलं सरबत बनवलं जायचं... मुलांनी आपल्यासाठी असं काही केलं की खूप छान वाटतं ना!
खूप खूप धन्यवाद बालभवनच्या सर्वेसर्वा आ. शोभाताई भागवत आणि बालभवनच्या सर्व ताई! 🙏🙏
Picture draw by Aarya |
आर्या ड्रॉईंगही खूप छान काढते... विशेषतः व्यक्तिचित्रे... अर्थात तिचा मूड असेल तेव्हा... तिच्या शाळेच्या वहीत काढलेली असतात बरीच चित्रे.. आमच्या बिल्डिंग मध्ये एक ताई क्विलिंग शिकवायची.. दोन वर्षांपूर्वी आर्या आणि तिची मैत्रीण जवळ जवळ 3 महिने रोज संध्याकाळी एक तास तिच्याकडे क्विलिंग शिकायला जायच्या.. तिथे ती पेटल्स, फ्लॉवर्स बनवायला शिकली... रोज वेगवेगळी छोटी छोटी पेटल्स बनवून एका डब्यात ठेवायची... खूप सुंदर दिसायची ती पेटल्स. आर्या जे काही शिकली किंवा तिने जे पेटल्स, फ्लॉवर्स बनवले त्याची एक सुंदर फ्रेम त्या ताईने बनवून दिली...
कुकिंगचीही तिला आवड आहे.. मॅगी, फेंच टोस्ट बनवायला तिला आवडते. सध्या ती मला घरकामात मदत करते... रोजची देवपूजा करते... संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना बोलते... ड्राईंग काढते.. आम्ही मिळून गोष्टीची पुस्तके वाचतो... कंटाळा आला की थोडावेळ उनो खेळतो.
मागच्या वर्षी एका "परिपूर्ण थाळी" स्पर्धेत मी सहभागी झाले होते.. त्यात आर्याने 'पापडी चॅट' बनवला होता.. आणि त्या स्पर्धेत माझी थाळी 'विजेती थाळी' ठरली होती.
अशाप्रकारे या सुट्टीत देखील छोट्या छोट्या कामात तिला सामावून घेताना तिच्या चेहऱ्यावरील आनंदाने आपण नक्की काय मिस करत होतो याची जाणीव करून दिली आणि बस, जे झाले ते गेले पण आता आपण जे आणि जेवढे म्हणून देऊ शकतो(वेळ) तेवढे सगळे तिला द्यायचे हे नकळत मनाने ठरवून टाकले.
• कसा वाटला ब्लॉग...
• आवडला का...
धन्यवाद ! 🙏
• आवडला का...
• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा.
• फॉलो करा.
©सौ. सुचिता वाडेकर...✍️
0 टिप्पण्या