Women's Day Special : महिलादिन विशेष

"महिलादिन विशेष " 

©सौ. सुचिता वाडेकर... ✍️






       हल्ली whats app आणि Fb मुळे सर्वजण खूप एकमेकांच्या संपर्कात असतात. प्रत्यक्ष नसले तरी रोज एकमेकांना भेटत असतात. त्यात असे कुठले कुठले डे साजरे होतात त्यावेळी तर शुभेच्छांचा नुसता पाऊसच असतो. याचा परिणाम नकळत मुलांवर देखील होत असतो. आता पर्वाचेच बघा ना, 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला गेला. खूप साऱ्या शुभेच्छा आल्या आणि मी देखील दिल्या, माझी लेक आणि तिच्या मैत्रिणीही शुभेच्छा देऊन खेळायला गेल्या. माझी लेक सध्या तिसरीत आहे.

       ती खेळून आल्यावर आमची जेवणं उरकली आणि मी मोबाईल हाती घेतला fb open केले तर प्रशांत सरांची post होती. ती वाचत असताना माझ्याही नकळत मी हसू लागले. अगदी मनसोक्त, मोठ्याने आणि स्वतःला विसरून खूप खूप हसले जणू काही माझंच प्रतिबिंब मी पहात होते. मी अशी मधूनच का हसते आहे म्हणून माझी लेक आणि तिचा बाबा माझ्याकडे पहायला लागले आणि माझ्या लेकीने उत्सुकतेने काय वाचते आहेस, मलाही वाचून दाखव असा हट्ट धरला. 

       मग मी हि सरांचा लेख तिला वाचून दाखवला तर ती आणि तिचा बाबा दोघेही हसू लागले. माझी लेक पुढे म्हणाली, 'मम्मा, हे आपल्याबद्दलच लिहिले आहे, तू पण अशीच वागते माझ्याशी. मी ही तिला हो म्हटले आणि मला देखील माझी चूक समजली. मी माझ्या लेकीला जवळ घेत sorry बोलले तर तिनेही मोठ्या मनाने मला माफ केले, म्हणाली, 'Its ok तरी ही तू मला खूप आवडते, माझी प्यारी मम्मा' आणि गळ्यात हात टाकले मग आमचं प्रेम थोडा वेळ उतू गेलं.

       आर्याचे बाबा हे सर्व पहात होते, ते पुढे हसत म्हणाले की बघू कितीवेळ टिकतेय प्रेम आणि आम्ही दोघीही हसू लागलो. आमची मुलगीही मोठी वस्ताद आहे नूर बघून पार्टी बदलते. मी एखादे काही काम सांगितले तर काही तरी कारणं देते आणि तिच्या बाबाने मला काही मागितले तर ही पठ्ठी हातातला अभ्यास सोडून पळत जाते आणि एका मिनिटात बाबाच्या हातात वस्तू आणून हजर करते. दिवसभर मी हिच्या दिमतीला आणि संध्याकाळी बाबा आल्यावर मात्र ही त्यांच्या दिमतीला. 

       यावर आपण काही बोलले तर तिच्या बाबाच्या चेहऱ्यावर एवढं गोड हसू येत कि जणू सारं जग जिंकल्याचे समाधान दिसते चेहऱ्यावर. पण मला देखील आवडतं हे पहायला, छान वाटतं बाबा बद्दलचा तिचा ओढा बघून आणि मुली खूप जवळ असतात बाबाच्या हे पटतं देखील. खरं तर हि लहान मुले असतातच खूप निरागस. मोठ्यांच्या सारखे मनात काही ठेवत नाहीत. झटकन माफ करून मोकळे होतात.


       या लहान मुलांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, आपण त्यांच्यावर कितीही रागावलो, ओरडलो, प्रसंगी कधी एखादा फटका हि दिला तरीही दुसऱ्या क्षणी ते तितक्याच प्रेमाने आपल्याला मिठी मारतात, अगदी सगळं विसरून. 

       परवा Woman's Day होता म्हणून माझ्या लेकीने माझ्यासाठी ग्रीटिंग बनवले होते पण खेळायला गेली आणि द्यायचे विसरली. रात्री लेख वाचल्यानंतर पटकन तीने ते तिच्या बॅग मधून आणले आणि पुन्हा एकदा Happy Woman's Day असं म्हणून माझ्या हातात ग्रीटिंग दिले. त्या ग्रीटिंग मधला मजकूर वाचला आणि खूप छान वाटले. वेळप्रसंगी मी कितीही रागावले तरीही माझं पिलू माझ्यावर खूप प्रेम करतं हे मला माहित असलं तरीही ते तिच्या शब्दातून वाचताना मला एक वेगळाच आनंद देऊन गेलं. आज मी हा आनंद तुम्हा सर्वांसोबत शेअर करतीये  ...

       ग्रीटिंग मध्ये जो मजकूर माझ्या लेकीने  लिहिला होता तो असा आहे ...

Many Many Happy Woman's Day God will bless you.

Do you know Rama, Nimisha, Diya and Me like your Khichadi. (साबुदाणा खिचडी)

खाली caterpillar काढलीये (तिला खूप आवडते) आणि त्यात I love you असे लिहिले आहे.

पुढे प्रश्न विचारलाय ..

Did you love me ..

and say to me Yes ___ or No ____

आणि पुढे गोड शब्दात मागणी ही केलीय ..

Pls. take me wallet when my exam will finish on that day...

खाली woodpecker आपल्या पिलाला खाऊ भरवतानाचे drawing काढले आहे आणि त्याखाली लिहिले आहे ...

How are you angry but I know you love me.

You always give me food like woodpecker.

आता तुमच्या लक्षात आले असेल की हे ग्रीटिंग पाहून मला काय वाटले असेल....

• कसा वाटला ब्लॉग...
• आवडला का... 

• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 
• फॉलो करा. 

•  Suchita's Recipe या FB पेजला भेट द्या.. आवडल्यास Like करा... फॉलो करा. 

धन्यवाद ! 🙏 

©सौ. सुचिता वाडेकर...✍️
11.03.2018

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या