Marathi Kavita - मराठी कविता - "थोडं स्वतःविषयी..!"

Marathi Kavita 






#मराठी_कविता 


"थोडं स्वतःविषयी..!"


एकटं रहाणं स्वतःत हरवणं,

मला खूप आवडतं..

नकळत स्वतःला स्वतः मधून काढून,

स्वतःशीच बोलायला आवडतं..!


स्वतःशीच बोलताना स्वतःच्या चुका,

जाणून घ्यायला आवडतं...

काय चुकलं कुठे चुकलं,

नेमकं मग उमगतं..!


म्हणतात कधी तुसडी मला,

पण स्वभावाला औषध नसतं..

बोलणाऱ्याच्या तोंडाला का हात लावता येतो,

इतकं मनावर घ्यायचं नसतं..!


संकटं ही प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात,

त्याला कधी घाबरायचं नसतं..

घडेल त्याचा स्वीकार करत,

पुढे चालत रहायचं असतं..!


मिळालेलं जीवन आनंदाने जगणं,

एवढच आपल्या हातात असतं..

मनापासून ठरवलं तर हसत जगणं,

प्रत्येकालाच जमू शकतं..!


©सौ. सुचिता वाडेकर.. ✍️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या