Marathi Recipe : Valache Birade 'वालाचं बिरडं' - कोकणामध्ये तसेच बऱ्याच ठिकाणी गणेशोत्सवात गणपती स्थापनेच्या दिवशी नेवैद्याला बनवलं जात 'वालाचं बिरड'

 ● वालाचं बिरडं (डाळींब्यांची उसळ)


©सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻️



Marathi Recipe : Valache Birade



Marathi Recipe : Valache Birade हि डिश मी माझ्या सासुबाईंकडून शिकले. त्या मुरुडच्या, त्यामुळे आमच्याकडे गणेशोत्सवात गणपती स्थापनेच्या दिवशी नेइवैद्याला उकडीचे मोदक आणि वालाचं बिरड केलं जातं. तसेच श्रावणात दर सोमवारी संध्याकाळी हे वालाचं बिरड उपवास सोडण्यासाठी बनवलं जातं. हे बिरड सर्वांना अतिशय आवडतं. 


गणेशोत्सवामध्ये मात्र तीन दिवस आधी वाल भिजत घालून नंतर स्वच्छ कपड्यामध्ये बांधून मोड आणले जातात. चांगले मोड आले की हे वाल गरम पाण्यात घालून ठेवायचे आणि मग सोलून घ्यायचे म्हणजे पटकन सोलेले जातात. हल्ली सोलेले वाल सगळीकडे मिळतात त्यामुळे करायला सोपे जाते. श्रावणात आणि गणेशस्थापणेच्या दिवशी केलेल्या बिरड्याची चव काही वेगळीच असते. याच्या डाळींब्या तर खूप सुंदर लागतात.


Summer Recipe : Watermelon Juice Simple Recipe

चला तर मग Marathi Recipe : Valache Birade या वालाच्या डाळींब्यांची उसळ कशी करायची ते आपण पाहुयात. यालाच 'वालाचं बिरडं' असे म्हणतात. 


वालाचं बिरडं (डाळींब्यांची उसळ)...


साहित्य :


• मोड आले वाल - 2 वाटी 

• कांदे - 2 

• टोमॅटो - 1

• लसूण - 6 - 7 पाकळ्या

• ओला नारळ - 1 वाटी

• कोथिंबीर

• लाल तिखट - 2 चमचे

• काळा मसाला - 1 चमचा

• मोहरी - पाव Tsp

• हिंग - पाव Tsp 

• हळद - पाव Tsp

• कडीपत्ता 4-5 पाने

• तेल - 3 Tbsp 

• मीठ आवश्यकतेनुसार 



कृती : 


प्रथम एक कांदा, टोमॅटो आणि लसूण मिक्सरला बारीक करून घ्यावे. वालाच्या डाळींब्या स्वच्छ धुऊन त्याला हे मिश्रण चोळावे (मिक्स करावे).





Marathi Recipe : Masala Bhendi मसाला भेंडी तुम्ही कधी सोलर कुकर मध्ये बनवलीत का..?

यानंतर एका कढईत थोड्याशा तेलावर एक कांदा परतून घ्यावा. तसेच लसूणही परतून घ्यावा. यानंतर ओला नारळही परतून घ्यावा व कोथिंबीर घालून हे मिश्रण मिक्सरला फिरवून त्याचे बारीक वाटण करावे. 






एका भांड्यामध्ये ३ ते ४ पळ्या तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता घालावा आणि कांदा, टोमॅटो, लसूण चोळलेल्या डाळींब्या घालाव्यात. थोडे परतल्यावर त्यात काळा मसाला आणि लालतिखट घालावे. लालतिखट थोडे जास्त घालावे.






हे मिश्रण चांगले परतून थोडे पाणी घालून दोन उकळ्या आल्यावर बारीक गॅसवर डाळींब्या शिजू द्याव्यात.




डाळींब्या शिजल्या की यात मिक्सरला बारीक केलेले वाटण घालावे, आवश्यक वाटले तर अजून थोडे पाणी घालावे आणि मीठ घालून बारीक गॅसवर ठेवून द्यावे. पाच मिनिटांनी गॅस बंद करावा.






Evening Snacks : गरमा गरम 'बटाटे वडा' आणि गरमागरम 'वडापाव' 


आपले वालाचे बिरडे तय्यार ! पोळी, भात आणि लिंबासोबत सर्व्ह करा वालाचं बिरडं !


Marathi Recipe : Valache Birade


• टीप : बिरड्यामध्ये तूप आणि लिंबू पिळल्याने चव अतिशय छान लागते.


• कशी वाटली रेसिपी आवडली का..


तुम्हीही बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा.


• रेसिपी आवडली तर जरूर शेअर करा पण नावासहित कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे. 


धन्यवाद! 🙏🏻

© सौ. सुचिता वाडेकर…✍🏻️




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या