Marathi Recipe : Sabudana Khichadi : खिचडीसाठी साबुदाणा भिजवण्याची एक सोपी पद्धत

"साबुदाणा खिचडी"

© सौ. सुचिता वाडेकर..✍🏻️


साबुदाणा खिचडी : स्वतः बनवलेली रेसिपी
 खिचडीसाठी साबुदाणा भिजवण्याची
एक सोपी पद्धत 


ही खिचडी सर्वांनाच खूप आवडते पण सर्वांना जमतेच असे नाही. साबुदाणा भिजवनं ही एक कला आहे, प्रत्येक स्त्रीची ती वेगवेगळी असते आणि ज्यांना ती साध्य झाली त्यांना खिचडी जमली असे म्हणायला हरकत नाही.


माझी आई अगदी अप्रतिम खिचडी बनवते (वनस्पती तुपात), आई खिचडी बनवायची तेव्हा सगळीकडे नुसता घमघमाट सुटायचा, नुसत्या वासानेच खूप भूक लागायची. लहानपणी खिचडी साठी आम्ही उपवास करायचो आणि आता नाष्ट्यासाठी म्हणून एखादे दिवशी आवर्जून खिचडी केली जाते. माझ्या मुलीलाही ही खिचडी अतिशय आवडते त्यामुळे आठवड्यातील एक दिवस शॉर्ट-ब्रेक (टिफिन) ठरलेला असतो.


My favorite fruit : Mango माझं आवडतं फळ 'आंबा'


खिचडीसाठी साबुदाणा भिजवण्याची एक सोपी पद्धत आहे जी चुकून मला समजली. एके दिवशी रात्री साबुदाणा भिजत घालताना माझ्या मुलीने मला हाक मारली म्हणून मी साबुदाण्यात पाणी घालून ती काय म्हणतेय हे पहायला गेले आणि अर्ध्या तासाने लक्षात आले की अरे... साबुदाण्यात पाणी तसेच आहे. मी पटकन गेले आणि साबुदाणा बघितला तर बऱ्यापैकी मऊ झाला होता म्हणून साबुदाण्यातील पाणी काढून टाकले आणि आता कशी होतेय देव जाणे असे मनाशी पुटपुटत त्यावर झाकण ठेवून दिले.


सकाळी उठल्यावर प्रथम हात फिरवून साबुदाणा बघितला तर एकदम मऊ आणि मोकळा झाला होता. मी एकदम खुश झाले कारण आता खिचडी एकदम मस्त होणार याची खात्री झाली आणि खिचडी झालीही सुंदर! तेव्हापासून मी यापद्धतीनेच साबुदाणा भिजवते.


सोबत कृती आणि फोटोही ....



साबुदाणा खिचडी 

Marathi Recipe - Pav bhaji "पावभाजी" बिनाकांद्याची तुम्ही केलीत का कधी..?


कृती :


रात्री साबुदाणा भिजवताना सबुदाण्यामध्ये अर्धा तास पाणी घालून ठेवावे (साबुदाण्याच्या वर साधारणतः बोटांची दोन पेरं इतपत) अर्ध्या तासानंतर सबुदाण्यातील पाणी काढून टाकावे. सकाळी खिचडी करताना भिजवलेल्या साबुदाण्यात दाण्याचा कूट सढळ हाताने घालावा, मीठ, साखर, कोथिंबीर घालून मिक्स करावे. मिरची आणि बटाट्याचे काप करून ठेवावेत.


Joke : एक किस्सा



गॅसवर कढई तापत ठेऊन त्यात तेल घालावे. तेल गरम झाले की त्यात जिरे, मिरचीचे काप घालावेत, थोडे परतले की त्यात बटाट्याचे काप घालावेत सोबत थोडे मीठ आणि चिमूटभर साखर घालावी, नंतर त्यात लिंबू पिळावे आणि झाकण ठेवून एक वाफ आणावी, त्यानंतर त्यात साबुदाण्याचे मिश्रण घालावे आणि व्यवस्थीत हलवून दोन मिनिटे झाकण ठेवावे, गॅस मंद आचेवर ठेवावा. दोन मिनिटांनी झाकण उघडावे, एकदा हलवावे आणि गॅस बंद करावा. (ही खिचडी अजिबात चिकट होत नाही) गरमा गरम साबुदाणा खिचडी तय्यार !


•कशी वाटली रेसिपी..

•आवडली का..

•मग तुम्हीही बनवणार नां..

•बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा.

• अन फॉलो करा


• रेसिपी आवडली तर जरूर शेअर करा पण नावासहित कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे. 


धन्यवाद! 🙏🏻

© सौ. सुचिता मिलिंद वाडेकर..✍🏻️

पुणे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या