फोटो : गुगल सौजन्य |
माझं आवडतं फळ 'आंबा'
तुझ्या येण्याची,
आम्ही वाट पाहतो..
तुझी अवीट गोडी चाखण्यात,
आनंदाने हरवून जातो..!
तुझ्या येण्याने आमचे,
मन मोहरून जाते..
तुझ्या चवीची अवीट गोडी,
अजून तोंडात रेंगाळते..!
भाजी नसली एखादा दिवस,
तरी आम्हांला चालते..
तुझ्यासोबत पोळी मात्र,
पटकन पोटात जाते..!
आमरस तर आमचा,
जीव की प्राण..
नाही खाल्ला तर अंगात,
उरत नाही त्राण..!
चित्रगौरीला असे,
कैरीची डाळ..
तिची तर गोडी,
अवीटच फार..!
आजीच्या हातचे,
कैरीचे पन्हे..
आजोबांना स्वर्गसुख,
फक्त दोन बोटे उरे..!
आई करते आंब्याची मस्तानी खास,
त्यावर पेरते ड्रायफ्रुटची रास..
कधी करते मँगो आइस्क्रीम,
तर कधी करते फ्रुटी छान..!
कधी करते गुलाबजाम तर,
तर कधी करते मँगो शिरा..
आजोबा करतात कौतुक,
आम्ही तो खातो भराभरा..!
हळूच मग आई,
बाबांना ऑर्डर देते..
अजून एक पेटी,
आणायला सांगते..!
आमची तर बाबा,
चंगळच असते..
तुझ्यामुळे सुट्टी,
आनंदात जाते..!
उन्हाळा संपला की,
पावसाळा सुरू होतो..
तुझ्या जाण्याचा दिवस,
जवळ येऊन ठेपतो..!
वाईट तर मनातून,
खूप सारे वाटते..
तू परत कधी,
जाऊ नये वाटते..!
जरी तू गेलास तरी,
कायम आमच्या मनात असतो..
पुढच्या वर्षी तुझ्या येण्याची,
आम्ही सारे वाट पाहतो..!
©सौ. सुचिता मिलिंद वाडेकर.. ✍🏻️
पुणे.
• कशी वाटली कविता..
• आवडली का..
• आवडल्यास जरूर शेअर करा पण माझ्या नावासहित कारण साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.
Positive Mind : "आपणच आहोत आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार"
धन्यवाद! 🙏🏻
0 टिप्पण्या