फोटो : जीवन विद्या मिशन गुगल सौजन्य 🙏🏻 |
"आपणच आहोत आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार"
©सुचितावाडेकर..✍🏻️
एक संवाद मनाचा,
मनाने मनाशी साधलेला..
रिकाम्यावेळी एकटेच बसून,
स्वतःच स्वतःला पारखलेला..!
जेव्हा कधी उदास वाटते,
हितगुज करावे स्वतःशी..
का, कधी, कसे, कुठे,
प्रश्न विचारावेत मनाशी..!
जावे प्रश्नांच्या मुळाशी,
सोडून विद्वात्तेची गाठ..
पडावा फडशा उभा आडवा,
धरून सचोटीची पाठ..!
डोकावून पहावे अंतरमनात,
उत्तर मिळेल वारेमाप..
चूक कळेल स्वतःची,
मग सुटतील प्रश्न आपोआप..!
पळून जाईल उदासीनता,
मग काही क्षणात..
फक्त एक संवाद मनाचा,
ठेवेल मन आनंदात...!
कुठलाही विचार करताना,
घाई नका करू..
शांतपणे विचार करून,
सकारात्मकतेची कास धरू..!
सकारात्मकतेचा एकच विचार,
पुढचं सगळं घडवेल..
नकारात्मक विचारांना मग तो,
लागलीच धुळीस मिळवेल..!
नकारात्मक विचार हे नेहमी,
एकापाठोपाठएक येतात..
हातात हात घालून,
आपल्यावरच स्वार होतात..!
आपण अगदी अलगद,
त्यामध्ये अडकत जातो..!
बाहेर पडण्याचा मार्ग,
मग स्वतःच हरवून बसतो..!
भोवऱ्यात सापडलेल्या माणसावाणी ,
मग आपली अवस्था होते..
अन सारासार विचार करण्याची,
बुद्धीच सारी खुंटली जाते..!
काय करावे काय नाही,
सगळेच गणित कोलमडते..
कुबुद्धीच्या साथीने मग,
सारेच आयुष्य ढासळते..!
आहे खरे सामर्थ्य,
आपल्याच विचारात..
एक सकारात्मक विचार,
ठेवेल मन आनंदात..!
आव्हानांची कमी नाही,
एक संपले की दुसरे हजर..
प्रयत्नांची धरूनी कास,
आयुष्याला द्यावे उत्तर...!
रेखाटावे एक सुंदर चित्र,
मग बनून चित्रकार..
कारण आपणच आहोत,
आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार..!
©सुचितावाडेकर..✍🏻️
• कशी वाटली कविता..
• आवडली का..
• आवडल्यास जरूर शेअर करा पण माझ्या नावासहित कारण साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.
My favorite fruit : Mango माझं आवडतं फळ 'आंबा'
धन्यवाद! 🙏🏻
0 टिप्पण्या