Joke : एक किस्सा

"एक किस्सा".....

©सौ. सुचिता वाडेकर... ✍️



       मराठी मध्ये स्वल्पविराम, अनुस्वार, फुलस्टॉप यांना खूप महत्व आहे. एखाद्या वाक्यात पॉज घेण्यासाठी आपण स्वल्पविराम वापरतो, अनुनासिकाचा उच्चार करण्यासाठी तसेच एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी अनुस्वार वापरला जातो आणि वाक्य संपल्याचे दर्शवतो तो फुलस्टॉप हे आपणा सर्वांना माहित आहे, परंतु हे चुकीच्याठीकाणी वापरले तर वाक्याचा अर्थ बदलतो... याचा एक किस्सा.

       एके दिवशी एका तरूण युवकाला एका चोरीच्या आरोपाखाली अटक करून न्यायाधीशांसमोर हजर करण्यात येते. त्याला पाहून न्यायाधीशांच्या मनात एक विचार येतो की आपल्या एका निर्णयाने याचे आयुष्य उध्वस्थं होऊ शकते, तेव्हा असे न करता त्याला आपण एक संधी देऊयात. तसे त्या युवकाला ते सांगतात देखील आणि त्याच्याकडून लिहून घेतात की मी चोरी करणार नाही. केल्यास फाशीची शिक्षा द्यावी. तो युवकही लिहून देतो आणि खाली स्वतःचे नाव आणि सही करतो. त्या युवकाला सोडून देण्यात येते.

       पुढे साधारणतः सहा महिन्यांनंतर परत त्या युवकाला चोरीच्या आरोपाखाली अटक करून न्यायाधीशांसमोर हजर करण्यात येते. न्यायाधीशांना धक्का बसतो की अरे आपण याचा, याच्या भविष्याचा विचार करून याला सोडून दिले होते; परंतु तरीही त्याने तोच गुन्हा परत केला. आता मात्र याला माफ करायचे नाही असे मनाशी ठरवून, त्याने लिहून दिलेल्या जबाबाची त्याला आठवण करून देतात आणि आता तू लिहून दिल्याप्रमाणे मला तुला फाशीची शिक्षा द्यावी लागेल असे सांगतात.

       यावर तो युवक गालातल्या गालात हसतो. ते पाहून जजसाहेब त्या युवकाला त्याने सहा महिन्यांपूर्वी लिहून दिलेला पेपर (stamp paper) दाखवतात. युवक, तो पेपर पहातो आणि त्यांना तो पेपर परत करून सांगतो की तरी सुध्दा तुम्ही मला फाशीची शिक्षा देऊ शकत नाही. युवकाचा हा आत्मविश्वास पाहून जजसाहेब अचंबीत होतात आणि त्याने लिहून दिलेला पेपर ते स्वतः वाचतात. त्या युवकाने जबाब लिहून देताना केलेली हुशारी पाहून तेही हसतात आणि त्या युवकाला सोडून देतात.

       आता युवकाने कोणती हुशारी केलेली असते  तर टिंबाच्या (फुलस्टॉप) जागेची अदलाबदल.
'मी चोरी करणार नाही. केल्यास फाशीची शिक्षा द्यावी' असे लिहावयास सांगितले होते.

       मात्र युवकाने टिंबाची अदलाबदल करून चलाखी केली होती आणि त्यावेळी ते कोणाच्याही लक्षात आले नव्हते.

'मी चोरी करणार. नाही केल्यास फाशीची शिक्षा द्यावी'.

• कसा वाटला ब्लॉग...
• आवडला का... 

• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 
• फॉलो करा. 

•  Suchita's Recipe या FB पेजला भेट द्या.. आवडल्यास Like करा... फॉलो करा. 

धन्यवाद ! 🙏 

©सौ. सुचिता वाडेकर...✍️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या