नारळी भात
रक्षाबंधनला नारळाच्या बर्फीचे विशेष महत्व आहे. या दिवशी आवर्जून नारळाची बर्फी आणि नारळी भात बनवला जातो. श्रावणातील पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. श्रावण पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सणही साजरा केला जातो. या सणाला विशेष महत्व आहे. पूर्वापार चालत आलेले हे सण आजही तितक्याच उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले जातात.
नारळी पौर्णिमेनिमित्त आज तुमच्यासाठी नारळी भात कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आलेय. हा भात मी माझ्या सासुबाईंकडून शिकले. त्या हा भात करताना लवंग, दालचिनी, वेलदोडा याची फोडणी देत असत. या फोडणीमुळे भाताला एक वेगळाच सुवास येतो
नारळी भातासाठी लागणारे साहित्य :
• अख्खा बसुमती तांदळाचा शिजवलेला 1 वाटी भात
• ३ ते ४ लवंगा
• दालचिनी २-३
• वेलची २
• तूप ४ चमचे
• साखर पाव वाटी
• ओला नारळ १/२ वाटी
• दूध २ चमचे
• वेलची पावडर पाव चमचा
• सजावटी साठी पिस्ते, बदामाचे काप
कृती :
१. प्रथम कढईत तूप घाला
२. तूप तापले की लवंगा, दालचिनी, वेलची घाला.
३. नंतर ओला नारळ घालून २ मिनिटे परतून घ्या.
४. यानंतर यात शिजवलेला भात घाला.
५. साखर घालून २ चमचे दूध घालून मिश्रण २ मिनिटे चांगले परतून घ्या.
७. वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स घालून पुन्हा एकदा हलवून घ्या.
८. आपला नारळी भात तयार झाला.
©सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻
0 टिप्पण्या