"भित्यापाठी ब्रह्मराक्षस"
©सौ. सुचिता वाडेकर...✍️
लॉकडाउन मध्ये माझ्या लेकीने काढलेले कोरोनाचे चित्र |
"भित्यापाठी ब्रह्मराक्षस"
एखाद्या गोष्टीची जेव्हा आपल्याला प्रचंड भीती वाटते त्यावेळी ती गोष्ट आपल्या सोबत प्रत्यक्ष घडली आहे किंवा घडेल असे चित्र आपण पहात असतो.. म्हणजेच तसे विचार आपल्या मनात येतात आणि आपली भीती प्रचंड वाढते..
पण तुम्हाला हे माहीत आहे का.. या भीतीला पळवून लावण्याचे समर्थ्य आपल्या विचारात असते.. यासाठी मानसिकता देखील तितकीच महत्वाची ठरते. विचार आणि मानसिकता यांचा खूप जवळचा संबंध आहे. तुमचे विचार तुमची मानसिकता बदलू शकतात.
आपण उदाहरण पाहूयात..
सर्वांना माहीत आहे की कोणत्याही आजरात ऍलोपॅथी ने त्वरित आराम मिळतो. आयुर्वेदिक उपचार केले असता थोडा वेळ लागतो पण उपाय नक्की होतो आणि होमिओपॅथीमध्ये जास्त वेळ लागतो पण अगदी जुनाट आजार देखील नाहीसा करण्याची क्षमता त्याच्यात आहे.
असे असताना देखील अर्सेनिक गोळ्यांच्या बाबतीत 3 दिवस 2 गोळ्या घेतल्या की प्रतिकारशक्ती वाढते आणि कोरोना होत नाही.. या विचारावर आपण विश्वास ठेवून त्या गोळ्या घेत होतो.. किंवा 'वाफ घ्या.. काहीही होणार नाही' असे म्हणत होतो. ऐकत होतो आणि त्याप्रमाणे करतदेखील होतो.
'हे काय आहे..' एक प्रकारे या विचाराने आपली मानसिक शक्ती वाढत होती म्हणजेच कोरोना सोबत लढण्याचे खरे सामर्थ्य प्रत्येकाच्या विचारात आहे हे आपल्याला कळून चुकले.
एखाद्या गोष्टीची जेव्हा आपल्याला प्रचंड भीती वाटते त्यावेळी ती घटना आपल्या सोबत प्रत्यक्ष घडली आहे किंवा घडेल असे चित्र आपण पहात असतो. म्हणजेच तसे विचार आपल्या मनात येतात आणि आपली भीती प्रचंड वाढते.. आणि कालांतराने तसे घडते देखील म्हणून घाबरून.. नको त्या विचारांना नकळतपणे खतपाणी घालून वाढवण्या ऐवजी सकारात्मक विचार करूयात.
शक्य तेवढे आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय देखील करूयात.. पोषक व ताजा आहार घेऊयात.. रोज व्यायाम करूयात.. अगदीच नाही जमले तरी ओंकार, 12 सूर्यनमस्कार घालूयात.. प्राणायाम, कपालभाती अनुलोमविलोम करूयात... शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य देखील तितकेच महत्वाचे आहे.. यासाठी जमल्यास ध्यानधारणा करूयात.. याने मानसिक आरोग्य उत्तम राहील आणि सकारात्मक विचार देखील वाढीस लागतील.. नकारात्मक विचार आले तरी त्यांना झटकून टाकणे सोपे जाईल.
आपल्या आयुष्यात जे घडणार असेल ते चुकणार नाही हे जरी खरे असले तरी काळजी घेणं आपल्या हातात आहे.. पण त्याचा सामना करण्यासाठी शक्ती तर हवी ना.. मग ती नकारात्मक विचार करून वाया घालवण्यापेक्षा सकारात्मक विचार करूयात आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला धैर्याने तोंड देऊयात. तुम्हाला काय वाटते.
Positive Mind : "आपणच आहोत आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार"
त्यातून काही झालंच तरी घाबरून जायचे नाही तर फाईट द्यायची.. शेवटी "भित्यापाठी ब्रह्मराक्षस".
• कसा वाटला ब्लॉग..
• आवडला का..
• आवडल्यास जरूर शेअर करा पण माझ्या नावासहित कारण साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.
धन्यवाद! 🙏🏻
©सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻️
0 टिप्पण्या