Marathi Kavita : Mother-in-law सासू म्हणजे सासू असते, तुमची आमची सेम असते.. तिच्या जागी स्वतःला ठेवले, तर आपल्यालाही ती कळून चुकते..!

फोटो : सौजन्य Zee5

"सासू..!"


#कविता

©सौ. सुचिता वाडेकर...✍🏻️


सासू म्हणजे सासू असते,

तुमची आमची सेम असते..

तिच्या जागी स्वतःला ठेवले,

तर आपल्यालाही ती कळून चुकते..!


सासू देखील एक मुलगी असते..

भावाची बहीण असते,

जिवाभावाची सखी असते..

अज्ञाधारक सून असते,

मुलांची प्रेमळ आई असते..!


घरासाठी ती राबते,

कष्टातून जीवन फुलवते..

तुटपुंजा पगारात देखील,

नेहमीच समाधानी राहते..!


घर, संसार, मुलं,

हेच तिचं विश्व बनते..

त्यांच्यातून बाहेर पडणं,

तिच्यासाठी कठीण होते..!



सासू ही मुळात खरंच,

कधी वाईट नसते..

तुमची आमची नजरच तिला,

सतत वाईट ठरवत असते..!


तुमच्या माझ्यासारखीच,

सासूदेखील एक आई असते..

मुलगा दुरावणार या भीतीने,

ती थोडी अस्वस्थ होते..!


मनातील ही भीतीच सुनेबद्दल,

असुया निर्माण करते..

अन सासूचा रोल निभावणं,

तिच्यासाठी कठीण होऊन बसते.!


तिला देखील एका,

विश्वासाची गरज असते..

प्रमाने सावरणाऱ्या,

मैत्रिणीची(सून) कमी असते..!


तुमच्या आईसारखीच ती देखील,

तुमच्या नवऱ्याची आई असते..

चुकलंच काही तिच्याकडून,

तर डोळ्यात पाणी काढायचे नसते..!



म्हणून म्हणते सुनांनो,

सासूची मैत्रीण व्हा..

तिच्याच गोटात शिरून,

तिला थोडं अश्वस्त करा..!


मग कधीच होणार नाहीत,

वितंड-वाद अन भांडणं..

सुख-शांती नांदेल घरात,

फुलेल घराचे आंगणं..!


सासू म्हणजे सासू असते,

तुमची आमची सेम असते..

तिच्या जागी स्वतःला ठेवले,

तर आपल्यालाही ती कळून चुकते..!



• कशी वाटली कविता..

• आवडली का..

• आवडल्यास जरूर शेअर करा..

• पण माझ्या नावासहित..

• कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

धन्यवाद! 🙏🏻

©सौ. सुचिता वाडेकर...✍🏻️


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या