Marathi Kavita - 'संकल्प' मराठी कविता

 


संकल्प 


संकल्प 


वर्ष बदलते नव्याने,

वय वाढत जाते..

कॅलेंडर बदलते दरवर्षी,

मी मात्र तीच रहाते.


कधीतरी स्वतःस बदलू,

विचार मनी येतो..

आतील आवाज पुन्हा मग,

नवा संकल्प करतो. 


नव्याचे नऊ दिवस,

भुरकन उडून जातात..

मनातील सर्व विचार मग,

हवेत विरून जातात.


बघता बघता वर्ष संपते,

नवा वारा वाहतो..

प्रयत्न करूनही दरवर्षी,

संकल्प तसाच रहातो.


नवीन वर्षातली जुनी मी,

मलाच पाहून हसते..

मात्र दरवर्षी पुन्हा नव्याने,

नवा संकल्प करते. 


©सौ. सुचिता वाडेकर... ✍🏻





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या