Summer Recipe : Watermelon Juice Simple Recipe

"Watermelon Juice"

#summercoolers


© सौ. सुचिता वाडेकर…✍🏻️



Summer Recipe : Watermelon Juice
Simple Recipe 


उन्हाळ्याच्या दिवसात मिळणारे आणखी एक पाणीदार फळ म्हणजे 'कलिंगड'... ज्याला टरबूज असेही म्हटले जाते. मुळातच कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण खूप असते त्यामुळे याचा ज्यूस करताना पाणी अजिबात घालावे लागत नाही.


कलिंगड मुळातच सुमधुर असल्यामुळे त्याच्या फोडी करून वरून मीठ टाकून हि खायला खूप सुंदर लागतात आणि या कलिंगडाचे सरबत बनवले तर आणखीच भारी 👌👌 लागते.


तुम्ही कधी कलिंगडाची आख्खी फोड कधी खलित का.. माझ्या लहानपणी आम्ही असेच कलिंगड खायचो. आजी कलिंगड कापायची आणि आम्ही तिच्या भोवती गोल करून बसायचो. एक एक फोड ती आम्हाला द्यायची, एक फोड संपली की दुसरी पुढ्यात यायची. क्षणात कलिंगड संपून जायचे. खुप मजा यायची.


Marathi Recipe : How to make - हरभऱ्याच्या वाळलेल्या पानांची भाजी


आता मात्र कलिंगड कापून त्यातील बिया काढून, बारीक फोडी करून डिश मध्ये घेऊन छोटया काटेचमच्याने खाल्ले जाते. असो. काळ बदलला, परिस्थिती बदलली.. त्याप्रमाणे आपणही बदलायला हवं. भगवान श्रीकृष्णांनी म्हटलेच आहे की परिवर्तन संसार का नियम है l जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे आपल्याला बदलायला हवं.





माझ्या लेकीलाही कलिंगड खुप आवडते. नुसते खायलाच नाही तर कापून त्याचे छोटे छोटे तुकडे करून ठेवते.. ते सर्व्ह करण्याचं आणि ज्यूस बनवण्याचं काम मात्र माझ्याकडे येतं.





Evening Breakfast : गरमा गरम 'बटाटे वडा' आणि गरमागरम 'वडापाव'

• चला तर मग आपण याची साहित्य आणि कृती पाहुयात ... 😊


"Watermelon Juice"


साहित्य :


● एक मोठी वाटी कलिंगडाचे काप


● पुदिना पाने 3 ते 4


● साखर 2 ते 3 चमचे


● पाव चमचा सैंधव मीठ


● पाव चमचा चॅट मसाला


● आइसक्युब्ज 4



कृती :


1. मिक्सरच्या जार मध्ये कलिंगडाचे काप, पुदिना, साखर, सैंधव मीठ, चॅट मसाला घालून ज्यूस काढून घ्यावा.


2. तयार झालेला ज्यूस गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यावा.


3. सर्व्हिंग ग्लास मध्ये आइसक्युब्ज घालावेत, गाळलेला कलिंगड ज्यूस ओतावा आणि कलिंगडाच्या काही फोडी घालाव्यात.


Marathi Recipe : Sabudana Khichadi : खिचडीसाठी साबुदाणा भिजवण्याची एक सोपी पद्धत


4. वरून थोडा चॅट मसाला स्प्रिंकल करावा आणि सर्व्ह करावा रुचकर, थंडगार "Watermelon Juice"



Summer Recipe : Watermelon Juice
Simple Recipe 


• रेसिपी आवडली का..


•मग तुम्हीही बनवणार नां..


•बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा.


•रेसिपी आवडली तर जरूर शेअर करा पण नावासहित कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे. 


धन्यवाद! 🙏🏻

© सौ. सुचिता वाडेकर…✍🏻️




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या