#मराठी_कविता
"प्रिय शेतकरी दादा..!"
प्रिय शेतकरी दादा,
साऱ्या जगाचा तू पोशिंदा..
अन्न, वस्त्र, निवारा या,
मानवाच्या मूलभूत गरजा..
अन्नाची गरज,
तुझ्यामुळे भागते..
तुझ्या घामाची किंमत,
तेव्हा कुठे कळते..
साऱ्यांनाच सुखाची,
नोकरी हवी असते..
शेतात कष्ट करायची,
कोणाचीच तयारी नसते..
शेती विकून तेथे,
इमारती उभ्या राहतात..
अन धान्य महाग होते म्हणून,
मग सारेच बोलबाला करतात..
तुझ्या मेहनतीवर,
दलाल गब्बर होतात..
तुझ्या मात्र हातावर,
कवडया टेकवतात..
तरी तू तुझे मुख,
गिळून बसतोस..
नाहीच सहन झाले तर,
स्वतःसच संपवतोस..
हा काही यावरचा,
उपाय असत नाही..
असे भ्याडसारखे जाने,
तुझे योग्य नाही..
माणसाने नेहमी,
आत्मसन्मानित रहावे..
स्वतःच्या हक्कासाठी,
हिरीरीने लढावे..
एक दिवस नक्कीच,
असा काही येईल..
ज्यामुळे तुझी खूप,
वाहवा होईल.
त्या दिवसाची तरी तू,
नक्की वाट पहावीस..
चूकीचा निर्णय सोडून,
कुटुंबाची काळजी घ्यावीस..
खूप खूप आभार अन..
खूप साऱ्या शुभेच्छा..!
प्रिय शेतकरी दादा,
तूच आहेस साऱ्या..
जगाचा पोशिंदा..!!
©सौ. सुचिता वाडेकर... ✍️
0 टिप्पण्या