Maher : "माहेर" सासरी कितीही सुखी असलो, आनंदात असलो तरी माहेरची ओढ ही असतेच प्रत्येकीच्या मनात...

माहेर...

३० मे २०१८
©सौ. सुचिता वाडेकर... ✍️

बरोबर दोन वर्षांपूर्वीची गोष्ट...










       सातारा जिल्हा आणि वाई तालुक्यातील ओझर्डे हे गांव माझे माहेर, परंतु नोकरी निमित्ताने माझा भाऊ बारामतीला स्थायिक झाला आणि माझी आई माझ्या भावाकडे असते त्यामुळे बारामती हे माझे माहेर  झालेय. वर्षातून एकदा मे महिन्यात चार दिवस का होईना माझे माहेरी जाणे होते. खरे तर एप्रिल महिना चालू झालाकीच माहेरी जायचे वेध सुरु होतात.

Maher : "माहेरपण" घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात  हे बोल ऐकले तरी प्रत्येक स्त्रीचं मन माहेरी फेर फटका मारून येतं. 

सासरी कितीही सुखी असलो, आनंदात असलो तरी माहेरची ओढ ही असतेच प्रत्येकीच्या मनात...
त्यामुळे....

उन्हाळ्यात कितीही...

उसाचा रस....
लिंबू पाणी ....
पुदिना- कैरीचे पन्हे ...
दह्या-लस्सीचे सेवन केले तरी ...
.
.
.
.

थंडावा माहेरी गेल्यावरच जाणवतो.😜😜😜😜

       तुम्हालाही असं जाणवत असणार याची खात्री आहे कारण प्रत्येक स्त्रीच्या मनात माहेराविषयी एक नाजूक, हळवा कोपरा कुठेतरी दडलेला असतो, एरवी तो बंद असला तरी मे महिना जवळ येऊ लागताच त्याची दारे आपोआप ओपन होऊ लागतात आणि माहेरी जाण्याची ओढ तीव्रतेने जाणवते. ते चार दिवस तिला वर्षभर उत्स्फुर्तपणे जगण्याची उर्मी देतात, येणाऱ्या संकटाना तोंड देण्यासाठी बळ देतात आणि ते तिची शक्ती कधी बनून जातात हे तिलादेखील कळत नाही.

Family is most important in our life : बंध  नात्यांचे....


       मे महिना जवळ येऊ लागताच भावाचं आग्रहाचं विचारणं, 'कधी येतीयेस'?, गेल्यावर वहिनीने केलेलं हसून स्वागत.... लेकीला आणि नातीला पाहून आईचा खुललेला चेहरा.... भावाची प्रेमळ मुलगी... माझ्या आणि माझ्या लेकीच्या आवडीचे पदार्थ करण्यासाठी चाललेली मामीची लगभग... चार दिवस रोज वेगवेगळे पदार्थ....  माझ्या लेकीला आवडते म्हणून मामाने आठवणीने आणलेले मँगो आईस्कीम.... कुल्फी.... गप्पांमधून निघालेल्या लहानपणी एकत्र घालवलेल्या क्षणांच्या जुन्या आठवणी.... माझ्या लेकीला आवडणाऱ्या गोष्टी देण्यासाठी तत्पर असलेला तिचा मामा... आणि तिला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर पाहून आकाश ठेंगण झालेलं माझं मन.

       किती अन किती वर्णन करू याचं ... हे सगळं पाहून मन कसं अगदी तृप्त होऊन जातं. चार दिवस अगदी लहान होऊन गेल्यासारखे वाटते. लहानपण पुन्हा जगता येत नाही पण मला वाटते की या माहेरपणामुळे आपल्याला पुन्हा एकदा त्याची अनुभूती घेण्याची संधी मिळते.

       आम्ही येणार म्हणून आमच्या साठी खास बनवलेले कोंबडी वडे... माझ्या लेकीला आवडते म्हणून खास मामाने बनवलेली मटण बिर्याणी.... नाश्त्याला उदीडवडा सांबर ... कच्ची दाबेली... एकदिवस पनिरची भाजी, पुरी, आम्रखंड.... एकदिवस मासे.... एकदिवस मला आवडतं म्हणून केलेलं डाळवांगं... आमरस पोळी... असा चार दिवसांचा भरगच्च पाहुणचार घेऊन सोबत नाचणीच्या लाडूंची शिदोरी घेऊन आमची पावले नव्या उमेदीने आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाला आनंदाने सामोरे जाण्याची शक्ती घेऊन घराकडे जाण्यासाठी वळली.

सोबत माझ्या वहिनीने बनवलेल्या डिशेसचे काही फोटो....

• कसा वाटला ब्लॉग...
• आवडला का... 

• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 
• फॉलो करा. 
 

धन्यवाद ! 🙏 

©सौ. सुचिता वाडेकर...✍️
३० मे २०१८ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या