Marathi Recipe : Veg Crispy 'व्हेज क्रिस्पी' तुम्ही कधी घरी बनवलीत का..? या पद्धतीने बनवा मुले होतील अगदी खुश !

"व्हेज क्रीस्पी"

© सौ. सुचिता मिलिंद वाडेकर..✍🏻️


खूपदा हॉटेल मध्ये आपण स्टार्टर घेतो, खूप छान चव असते त्यांना आणि त्यांची किंमतही तशीच असते. त्यापैकी व्हेज क्रीस्पी आणि ड्राय मंचुरीअन माझ्या लेकीच्या विशेष आवडीचे. एकदा असेच हॉटेलमध्ये व्हेज क्रीस्पी खाताना ती सहज बोलून गेली, 'मम्मा, तू पण बनव ना घरी, किती छान लागतेय'. मग एक दिवस ट्राय केला आणी जमली 'व्हेज क्रीस्पी'.


Veg Crispy : या पद्धतीने बनवा
मुले होतील अगदी खुश ! 


सगळी तयारी असेल तर अगदी पाच मिनिटात होणारी डिश आहे ही पण याच्या त्यारीलाच खूप वेळ लागतो त्यामुळे आता मी परत करणार नाही असं दरवेळी जाहीर करूनही, "मम्मा, तूच छान बनवते ही डिश, मला तुझ्याच हातची आवडते" असं लेकीचं लडिवाळ वाक्य ऐकलं की पुन्हा पाघळते आणि तयारीला लागते.


आजही अशीच तयार झाली "व्हेज क्रीस्पी"


 ◆ रेसिपी : व्हेज क्रीस्पी



Veg Crispy : या पद्धतीने बनवा मुले होतील अगदी खुश ! 

 ● साहित्य :


•पनीर - 1 वाटी

•सिमला मिरची - 1

•फ्लॉवर - अर्धी वाटी

•कांदे - 2

•मैदा - 2 चमचे

•कॉनफ्लॉवर - 2 चमचे

•मीठ - आवश्यकतेनुसार

•मिरपूड -  पाव चमचा

•टोमॅटो सॉस - 4 चमचे 

•ग्रीनचिली सॉस - 2 चमचे 

•रेडचिली सॉस - 2 चमचे 

•सोया सॉस - 1 चमचा 

•शेजवान चटणी - 4 चमचे 

•कोबी - एक वाटी 

•कांदापात - अर्धी वाटी 

•लसूण - दहा बारा पाकळ्या 

•आलं - एक चमचा 

•तेल - आवश्यकतेनुसार 


● कृती : 

1. प्रथम पनीर, सिमला मिरची, फ्लॉवर आणि कांद्याचे एक इंच आकाराचे तुकडे करून घ्यावेत.






2. हे तुकडे फ्राय करण्यासाठी मैदा, कॉनफ्लॉवर, मीठ, मिरपूड यांचे पाणी घालून बॅटर तयार करून ठेवावे.


3. इथे जेवढा मैदा घ्याल तेवढाच कॉनफ्लॉवर घ्यावा (1:1प्रमाम).


4. कोबी स्लाईसरवर बारीक किसून घ्यावा आणि कांदापातही चिरून घ्यावी.




Marathi Recipe - Pav bhaji "पावभाजी" बिनाकांद्याची तुम्ही केलीत का कधी..?





5. पनीर व भाज्यांचे तुकडे एक एक करून बॅटर मध्ये बुडवून डीप फ्राय करून घ्यावेत.



6. एका कढईत तेल घालून त्यात बारीक चिरलेला लसूण, आलं, कंदापात घालावी.


7. थोडे परतले की त्यात टोमॅटो सॉस 4 चमचे, ग्रीनचिली सॉस 1 चमचा, रेडचिली सॉस 1 चमचा, सोया सॉस 1 चमचा, शेजवान चटणी 2 चमचे घालावी व थोडे परतावे.





8. तुमच्या आवडीनुसार आणि quantity नुसार याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. 


9. यानंतर यात डीप फ्राय केलेल्या भाज्या घालाव्यात व मिश्रण चांगले एकत्र करावे. 


10. कोबी व कंदापातीने गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी, "व्हेज क्रीस्पी"



Veg Crispy : या पद्धतीने बनवा
मुले होतील अगदी खुश !
 


•कशी वाटली रेसिपी..


•आवडली का..


•मग तुम्हीही बनवणार नां..


•बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा.


•रेसिपी आवडली तर जरूर शेअर करा पण नावासहित कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे. 


धन्यवाद! 🙏🏻

© सौ. सुचिता मिलिंद वाडेकर..✍🏻️

पुणे. 

 


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या