कविता : "चार भिंतीची कैद" विश्व मराठी परिषदेने लॉकडाउन मध्ये घेतलेल्या 'कविता लेखन' स्पर्धेत माझ्या या कवितेला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले

कोरोनामुळे हाहाकार उडाला होता.. Lockdown मुळे जणू सृष्टीचक्रच फिरायचे थांबले होते. या काळात मिळालेला एक दिलासा म्हणजे विश्व् मराठी परिषदेने घेतलेल्या 'कविता लेखन' स्पर्धेत माझ्या कवितेला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.





चार भिंतीची कैद


या कोरोनामुळे सरकारला..

करावा लागला लॉकडाउन..

पशुपक्षी फिरू लागले आझाद..

अन माणूस बसला पिंजऱ्यात जाऊन...!


मात्र 


चार भिंतीची कैद..

खूप काही शिकवून गेली..

पैशाच्या मागे धावणाऱ्या माणसाला..

थोडी उसंत देऊन गेली.


चार भिंतीची कैद..

खूप काही शिकवून गेली..

घरपण काय असतं..

हे साऱ्यांना दाखवून गेली.


चार भिंतीची कैद..

खूप काही शिकवून गेली..

मुलांमधील कलागुण..

आई-बाबांना दाखवून गेली.


चार भिंतीची कैद..

खूप काही शिकवून गेली..

नेहमी चार दिशेला चार डोकी ..

असणारी हि माणसे आज..

प्रेमाने गुजगोष्टी करू लागली.


चार भिंतीची कैद..

खूप काही शिकवून गेली..

घड्याळाच्या काट्याला बांधलेल्या..

पैशाच्यामागे धावणाऱ्या या माणसाला..

'जीवन हे क्षणभंगुर आहे' हे दाखवून गेली.


चार भिंतीची कैद..

खूप काही शिकवून गेली..

जग स्वतः पुरतं सीमित ठेवणाऱ्या..

माणुसकी विसरलेल्या माणसाला..

'मृत्यूचे भय' देऊन जगायला शिकवून गेली.


चार भिंतीची हि कैद माणसाला..

खूप काही शिकवून गेली...!

खूप काही शिकवून गेली...!!


©सौ. सुचिता वाडेकर...✍️


माहिती : या माझ्या कवितेला 2020 मध्ये विश्व् मराठी परिषदेने घेतलेल्या 'कविता लेखन' स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. 


विश्व मराठी परिषदेने 'कोविड 19' या विषयावर कविता लेखन, कथा लेखन स्पर्धा आयोजित केली होती.. ही स्पर्धा भारतातील स्पर्धकांसाठी एक गट आणि विदेशातील स्पर्धकांसाठी एक गट अशी दोन वेगवेगळ्या गटांमध्ये आयोजित केली होती.  या स्पर्धे साठी मी देखील "चार भिंतीची कैद" ही माझी कविता पाठवली होती. 


कविता लेखन साठी 18 बक्षिसे आणि 

कथा लेखन साठी 18 बक्षिसे असे एकूण 36 बक्षिसे भारतातील स्पर्धकांसाठी आणि 36 बक्षिसे विदेशातील स्पर्धकांसाठी होती. 


या 18 बक्षिसांमध्ये 3 विजेते, 5 उत्तेजनार्थ आणि 10 विशेष बक्षिसे देण्यात आली व विजेत्या कवितांचे पुस्तक प्रकाशन होणार होते.  


संध्याकाळी साडेसात वाजता या स्पर्धेचा निकाल मराठी विश्व परिषदेच्या युट्युब चॅनेल वर live जाहीर करण्यात आला.  


आपणास कळवण्यात मला अतिशय आनंद होत आहे की.. या स्पर्धेत "चार भिंतीची कैद" या माझ्या कवितेने उत्तेजनार्थ 3 रे पारितोषिक पटकावले. 😊😊





खरं तर मी विसरले होते..  पण माझी  ब्लॉगर मैत्रिण Ujwala Rahane  हिने हा कार्यक्रम बघितला आणि माझे नांव विजेते यादी मध्ये असल्याचे सांगितले तेव्हा मी चेक केले..  युट्युब वरील व्हिडीओ पाहिला आणि उत्तेजनार्थ जे 5 बक्षिसे जाहीर करण्यात आली त्यात 3 ऱ्या क्रमांकावर माझे नांव ऐकले अन क्षणभर विश्वासच बसला नाही.  खूप छान वाटले.  


संपूर्ण भारतात माझ्या कवितेने  6 वे स्थान पटकावले.  शिवाय या कविता पुस्तक रूपात प्रसिद्ध होणार याचा विशेष आनंद आहे.





या स्पर्धे साठी जगभरातून एकूण 4634 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी 1478 परदेशी मराठी लोक होते. जगभरातील एकूण 32 देशांनी सहभाग नोंदवला आणि अमेरिकेतील 18 राज्यांचा यात सहभाग होता. या स्पर्धेचा मी देखील एक भाग बनले याचा मला निश्चितच आनंद आहे. 





#खालील_लिंकवर_तुम्ही_रिझल्ट_पाहू_शकता..  ⤵️


https://youtu.be/ZYStsyj-rjw



 धन्यवाद! 🙏🏻

©सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻️



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या