![]() |
फोटो : गुगल सौजन्य 🙏🏻 |
Marathi Short Story | Laghu Katha कहाणी घरघर की..! मराठी लघुकथा.. कमी शब्दातील गहन आशय..!
#100शब्दांचीगोष्ट
#कमी_शब्दात_गहन_आशय
#घरोघरी_मातीच्या_चुली
कहाणी घरघर की...!
अलार्म होऊन गेला.. समिधा कशी उठली नाही म्हणून समीरने पाहिले.. तर समिधा तापाने फनफनलेली. तिला न उठवताच समीरने मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या.
नीलचे आवरून, "आईला बरं नाहीये" सांगून घरातील स्नॅक्स डब्यात भरले, त्याला स्कुल बस मध्ये बसवले.. स्वतः अर्धा दिवस सुट्टी टाकली आणि समिधाला घेऊन डॉक्टरांकडे गेला.
जोशी काकूंच्या मेसमधून गरमागरम डबा आणला.. समिधाला जेवू घातले.. स्वतः जेवून ऑफिसला गेला.
इतक्यात वाजलेल्या अलार्मने समिधाच्या चेहऱ्यावरील समाधान भंग पावले. "अरेरे..! स्वप्न होतं तर हे."
मात्र समिधाच्या अंगात ताप होता. तशीच ती उठली, मुलाचं आवरून स्कुल बस मध्ये बसवलं, समीरचा डब्बा केला.. पण समीरच्या गावीही नव्हतं. तिनेच मग घरातील गोळी घेतली.
संध्याकाळी समीर आला तोच मुळी तापाने फनफणून. आहाहा..! मग काय ती सरभराई...! बसल्या जागेवर हातात सगळं.
दुसऱ्यादिवशी ऑफिसला रजा.. चौकशीसाठी फोन... यात समिधाचं आजरपण कुठल्याकुठे पळून गेलं कळलंच नाही.
धन्यवाद..! 🙏🏻
© सौ. सुचिता वाडेकर...✍
0 टिप्पण्या