लॉक डाउन स्पर्धा - 'पत्रास कारण की..' मधील एक पत्र आज तुमच्या भेटीला..!





#आठवण 

#लॉकडाउन 

#ऑनलाईन स्पर्धा 

#पत्रलेखन 

#मनोगत 



प्रिय मास्क, 

खूप खूप प्रेम!

     पत्रास कारण की... 

     बरेच दिवस झाले तुला पत्र लिहायचे मनात होते आज तो योग आला. तुझ्याविषयी वाटणारी कृतज्ञता व्यक्त करायची होती त्यासाठी हा पत्र प्रपंच. 

     कोणतीही गोष्ट चांगली असो वा वाईट तिचा अतिरेक झाला की ती वाईटच. तसंच काहीसं लॉकडाउनच्या बाबतीत घडू लागलं. 

"सुरुवातीला लॉकडाउनमुळे 
सारे घर आनंदी झाले. 
कधी नव्हे ते सारेजण 
एकत्र जेवू लागले."

"घरच्या लक्ष्मीची कसरत सर्वांना जाणवली 
अन मुलांपासून आजी-आजोबांपर्यंत 
साऱ्यांनीच तीला मदत केली."

"तीही सुखावली, 
प्रेमाने विरघळली, 
रोज नवनवे पदार्थ करून 
सर्वांना खाऊ घालू लागली."

"साऱ्यांनीच शोधल्या 
आपापल्या परीने वाटा,
कोरोनाला पळवून लावण्याच्या 
उपाय अन क्लुप्त्या."

"तुझ्यामुळे राहिलेत 
बरेचजण सुरक्षित, 
तरीसुद्धा होऊ लागल्या 
हॉस्पिटल मधील खाटा आरक्षित."

"पण खरे सांगू आता 
सारेच कंटाळलेत, 
सर्वसामान्यांचे तर खायचे 
वांदे होऊ लागलेत."

     काही दुष्ट लोकांच्या जगावर राज्य करण्याच्या अतिदुष्ट महत्वकांक्षेच आज सगळं जग बळी ठरलंय. गेले सहा-सात महिने कोरोना नावाच्या (कोविड-१९) विषाणू मुळे सार जग हादरलय. त्यापाई सरकारला करावा लागला लॉकडाउन, पशु पक्षी फिरू लागले आझाद अन माणूस बसला पिंजऱ्यात जाऊन.  

     कोरोनाच्या भीती मुळे सगळे उद्योगधंदे बंद झाले, कंपन्या, व्यापार, शाळा-कॉलेजेस, हॉटेल्स सार-सार बंद झालं अन माणसाला चार भिंतीच्या पिंजऱ्यात कैद व्हावं लागलं.  

काही महिन्यांपूर्वी पुणेरी लोकांना 
सगळेजण हिणवायचे, 
तोंडाला फडके लावतात 
म्हणून सारेच चिडवायचे. 

पण लॉकडाउनमुळे सऱ्यांनाच 
तुझी किंमत कळली  
तुझ्यामुळे सर्वजण 
सुरक्षित राहू लागली. 

"प्रत्येकाचीच कधी न कधी वेळ नक्की येते, 
त्यावेळी साऱ्यांना त्याचे महत्व कळते." 

     तुझ्या बाबतीतही असेच काहीसे घडले कारण तुझ्यामुळे विषाणू लांब राहू लागले म्हणून कधी कोणाला हिणवायचे नसते, प्रत्येकाची किंमत आपापल्याजागी योग्य असते. तुझ्यामुळे हा धडा, साऱ्यांना मिळाला अन तू सर्वांच्या गळ्यातील ताईत बनला.

धन्यवाद मास्क..! 🙏

कळावे, 
तुझी चाहती, 
©सौ.  सुचिता मिलिंद वाडेकर... ✍️

धन्यवाद..! 🙏🏻

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या