#कविता - 'काही क्षण आनंदाचे'
“काही क्षण आनंदाचे”
काही क्षण आनंदाचे,
मनात साठवावे..
अंतःकरणाच्या कुपीत अगदी,
जपून जपून ठेवावे..!
सुख आणि दुःख जणू,
ऊन सावलीचा खेळ..
स्वीकारत जावे सारे,
बसवून जीवनाचा मेळ..!
दुःखातही आठवावे,
ते आनंदाचे क्षण..
मग हळूच फुंकर मारून,
रिझवतील सारे मन..!
सुखातील आनंद असतो,
चांगल्या कर्माचे फळ..
दुःखात देखील आनंद देतो,
स्वीकार करण्याचे बळ..!
विचारात आहे सामर्थ्य,
नशीब घडवण्याचे..
आनंदाने हसत हसत,
जीवन जगण्याचे..!
काही क्षण आनंदाचे,
मनात साठवावे..
अंतःकरणाच्या कुपीत अगदी,
जपून जपून ठेवावे..!
धन्यवाद..! 🙏🏻
©सौ. सुचिता मिलिंद वाडेकर..✍🏻
0 टिप्पण्या