#Marathi _kavita
‘आदर स्त्रीत्वाचा’
प्रत्येक स्त्रीचा आदर
प्रत्येकाने ठेवावा मनी...
तिच्याच उदरातून जन्मलो,
याचे भान असुद्यावे जनी.
माता, भगिनी, मुलगी, सून
रूपे सारी तिचीच...
वेळ पडता रणरागिणी,
दुर्गाही होते तिच.
प्रेमाने जवळ घेते,
मायेने बांधून ठेवते...
वटवृक्षाच्या सावलीसारखी,
पाठीशी उभी राहते.
क्षणाची पत्नी अन
माता अनंत काळाची...
नका करू विटंबना,
तिच्या अस्तित्वाची.
कोवळ्या कळ्यांचे फुलांमध्ये
रूपांतर होऊ द्यावे...
उमलण्याआधीच खुडनाऱ्याचे,
इंद्रिय कापून टाकावे.
हीच शिक्षा योग्य होईल
त्याला धडा शिकवण्याची...
घेऊ जबाबदारी रक्षणाची
तिच्या स्त्रीत्वाची.
मान तिचा ठेवण्याची,
आहे जबाबदारी प्रत्येकाची...
वेळ आता आली आहे,
साथ तिला देण्याची.
©सौ. सुचिता वाडेकर....✍
0 टिप्पण्या