Chaat Recipe in Marathi - बाकरवडी कचोरी_चॅट एक फ्युजन रेसिपी

 












Chaat Recipe in Marathi - बाकरवडी कचोरी_चॅट एक फ्युजन रेसिपी 


#ChitaleGroup_KhadadKhau


#स्पर्धा_रेसिपी 


#CelebrateSnacksTime


#फ्युजनरेसिपी 2


#बाकरवडी_कचोरी_चॅट 


आज तुम्हासर्वांसाठी घेऊन आलेय... बाकरवडीकचोरी_चॅट. एकदम मस्त, टेस्टी आणि अप्रतिम बनली आहे ही फ्युजन रेसिपी.... 👌👌 FB वरील एका रेसिपी स्पर्धेसाठी ही रेसिपी मी बनवली होती. तुम्हीही नक्की करून बघा..





बाकरवडी कचोरी_चॅट एक फ्युजन रेसिपी 


कचोरीसाठी साहित्य :

● मैदा 1 वाटी

● मीठ आवश्यकतेनुसार

● तूप 4 चमचे

● पाव वाटी पाणी


हे सर्व साहित्य एकत्र करून मळून गोळा बनवा व तो अर्धा तास ओल्या कापडाने झाकून ठेवा.


सारणासाठी साहित्य :


● चितळे बाकरवडी 5 ते 6


मिक्सरला बारीक करून घेणे.


या बारीक करण्यावरून आठवलं... माझ्या सासूबाईंचे दात काढल्यामुळे त्यांना कवळी बसवली होती... परंतु 2 ते 3 वेळा कवळ्या बदलूनही एकही कवळी त्यांना नीट बसली नाही. शेवटी त्या बिनाकवळीचेच जेवायच्या... त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना पोळी आणि कडक पदार्थ मिक्सरला बारीक करून घ्यावे लागायचे. चितळेंची बाकरवडी त्यांना खूप आवडायची पण दात नसल्यामुळे त्या खाऊ शकत नव्हत्या. एकदा मी त्यांच्याही नकळत 2 बाकरवडी मिक्सरला बारीक करून त्यांना खायला दिल्या... "काय आहे ?" त्यांनी विचारले. मी म्हणाले, "खाऊन तर बघा आणि तुम्हीच सांगा काय आहे ते" एक घास तोंडात टाकताच त्यांनी विचारले.. "बाकरवडी का गं..!" मी हो म्हणाले त्यावर त्या म्हणाल्या... "किती दिवसांनी खाल्ली असेल बाकरवडी"👌👌 त्यांना जाऊन 8 वर्ष झाली पण या बाकरवडी मुळे हा किस्सा आठवला. तसेच माझ्या माहेरी जाताना मी अगदी आठवणीने चितळेंची बाकरवडी नेते. सर्वानाच ती खूप आवडते.




कृती :


१. अर्ध्या तासानंतर गोळा पुन्हा चांगला मळून घेऊन त्याचे मध्यम आकाराचे गोळे बनवले. 


२. आणि प्रत्येक गोळ्यात बाकरवडीचे सारण भरले.


३. हाताने त्यावर थोडी थाप मारली आणि वरून हलकेसे लाटणे फिरवले व मंद आचेवर तळून घेतले. 


४. मस्त टम्म कचोरी तयार झाली.


५. एका डिशमध्ये कचोरी ठेऊन त्यावर दही, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, चॅट मसाला, लालतिखट, शेव आणि कोथिंबीर घालून सर्व्ह केली. 


 #बाकरवडीकचोरी_चॅट




© सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या