"एक अनोखे गेट टुगेदर..."
आठवण दोन वर्षांपूर्वीची..
"आमच्या योगा क्लासचे अनोखे गेट टुगेदर"
©सौ. सुचिता वाडेकर... ✍️
"एक दिवस स्वयंपाकाला
सुट्टी द्यावी म्हटलं,
लहान मुलांसारखी डब्बा पार्टी
करुन पहावी ठरलं."
"प्रत्येकीने एक-एक पदार्थ
करून आणायचा ठरला,
ज्यात जीची स्पेशालिटी
तिने तो आणायचा ठरला."
"मिळूनी सऱ्याजनी
हॉलिडे साजरा करायचा,
लहानपणीचा आनंद
नव्याने उपभोगायचा."
"कार्तिकी एकादशीचा
मुहुर्त झाला पक्का,
आमचा बेत पाहून त्यावर
सरांनी मारला शिक्का."
"आज तो दिवस उजाडला,
मिळूनी आनंद घ्यायचा,
योग करून तुडुंब जेवून
तृप्त होऊन जायचा."
"लगबगीत आल्या सऱ्याजनी,
अर्धा हॉल पिशव्यांनी भरला,
योग केल्याशिवाय सुटका नाही
सरांनी दम भरला."
"क्लास संपताच गोल करुनी
बसल्या सऱ्याजनी,
एक-एक पदार्थ ताटात वाढता
ताट गेले भरुनी."
"पल्लवीने आणले
रुचकर छोले,
त्यासोबत प्रतिभाचे
न्यारी फुलके."
"सुनीताने आणली
चविष्ट बटाटा भाजी,
लताने आणली
कोशिंबीर आणि चटणी."
"स्वप्नाने आणले
श्रीखंड अन मिरची ठेचा,
संपदाने आणली
कोथिंबीरवडी अन मिरकुंडा."
"कविताने बनवला मऊसुद,
रेशमी-मुलायम कोहिनुर पुलाव,
चॉकलेट-व्हॅनिला आईस्क्रीमच जणू
सोनिमच्या दही वड्यांनी केला शिरकाव"
"पाचक म्हणून बनवली
मी सोलकढी,
शेवटी प्रज्ञाने बनवलेल्या
तांबूलाने केली सर्वांवर कडी."
"अन्नदाता सुखी भव:
ओठातून उदगार आले,
जे नाही आले त्यांना मात्र
आम्ही मिस केले."
"एवढे सगळे कमी म्हणून की काय
उरलेले आम्ही मुलाबाळांसाठी नेले,
त्यांनी दिलेले तृप्तीचे ढेकर
मन प्रसन्न करून गेले."
अशाप्रकारे आमचे
अनोखे गेट-टुगेदर
आनंदात साजरे झाले."
• कसा वाटला ब्लॉग...
• आवडला का...
• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा.
संत बहिणाबाई चौधरी : "हृदयाचा हृदयाशी संवाद" याचे धावते समालोचन..."
धन्यवाद ! 🙏
©सौ. सुचिता वाडेकर...✍️
0 टिप्पण्या