Marathi Recipe : Aalu Vadi "आळुवडी" आळुवडी बनवताना घ्या ही काळजी जेणेकरून आळुवडी घशामध्ये अजिबात खवखवणार नाही. पहा रेसिपी.

   #आळुवडी

 © सुचिता वाडेकर.. ✍🏻️


Marathi Recipe : Aalu Vadi
आळुवडी बनवताना घ्या ही काळजी जेणेकरून
आळुवडी घशामध्ये अजिबात खवखवणार नाही. 


       आळूवडी करून बरेच दिवस नाही तर बरेच महिने झाले होते. सध्या आळूची पाने बाजारात दिसू लागलीत त्यामुळे आळूवडी करण्याची इच्छा झाली. हि आळूवडी सर्वांचीच आवडती, पण ही थोडी तिखटच चांगली लागते.


काही ठिकाणी ही आळूवडी लालतिखट घालून केली जाते पण हिरवी मिरची घालून केलेली आळूवडी जास्त टेस्टी लागते. मिरची थोडी जास्त घ्यावी. तिखट आणि आंबटगोड अशी चव आल्याने आळूवडी एकदम भारी लागते. माझी आजी आळूवडी खूप छान बनवायची.


आम्ही मुले बऱ्याचदा उकडलेली आळूवडी जाता येता संपवून टाकायचो कारण ती तळेपर्यंत आम्हाला दमच निघत नसे. आता माझी मुलगी हया गोष्टी करते तेव्हा लहानपणीचे दिवस आठवतात.


       काहीवेळा ही आळूवडी खाल्यावर घशात एक विचित्र खवखव होते, ती होऊ नये यासाठी आळूच्या पानांची निवड काळजीपूर्वक करावी. काही आळूच्या पानांना काळसर आमसुली कलरची कड असते आणि फोटोत दाखवल्याप्रमाणे पानांच्या शिराही याच कलरच्या असतात, अशी पाने आळूवडीसाठी वापरावीत. चिंच-गुळ ही यासाठीच वापरला जातो.


 

आळूवडी साठी लागणारे साहित्य ⤵️

 

● साहित्य :

 

● अळूच्या 2 गड्ड्या (10 पाने)

● बेसनपीठ 2 वाट्या

● थोडी चिंच

● गुळ लिंबाएवढा 

● हिरव्या मिरच्या 4-5 (तिखट)

● जिरे 1 चमचा 

● लसूण पाकळ्या 4-5

● हिंग, हळद

● मीठ आवश्यकतेनुसार

● तेल तळण्यासाठी


 

Marathi Recipe : Aalu Vadi
आळुवडी बनवताना घ्या ही काळजी जेणेकरून
आळुवडी घशामध्ये अजिबात खवखवणार नाही. 


 

● कृती :

 

       प्रथम थोड्याशा पाण्यात चिंच भिजत घालावी, आळूची पाने स्वच्छ धुऊन पोळपाटावर लाटण्याने लाटून घ्यावीत. जिरे, लसून, हिरव्या मिरचिचे मिक्सरवर वाटण करून घ्यावे. चिंच भिजली की तिचा कोळ काढून घ्यावा. त्यात बारीक केलेला गुळ घालून हिरवी मिरचीचे वाटण घालावे. हिंग, हळद, मीठ घालून त्या पाण्यात बसेल एवढे बेसनपीठ घालावे. लाटण्याने लाटून ठेवलेले एक अळूचे पान घेऊन त्याला बेसनपीठाचे तयार केलेले पीठ लावावे, त्यावर दुसरे पान ठेऊन त्यालाही पीठ लावावे. अशाप्रकारे 3 ते 4 पाने एकावर एक ठेऊन त्याची वळकटी (रोल) करावी आणि तीळ लावून तेल लावलेल्या चाळणीत ठेऊन 20 मिनिटे वाफ द्यावी. वाफवल्यानंतर त्याच्या एकसारख्या वड्या करून तेलात खरपूस तळून घ्याव्यात. आपली आळूवडी तैयार ! 


 

Marathi Recipe : Aalu Vadi 


टीप :

1. आळुवडी करताना पिठामध्ये चिंच गूळ घालावे म्हणजे आळुवडीमुळे शामध्ये खवखवत नाही.


2. आळूच्या रोलला वरून तीळ लावल्याने आळूवडी खूप सुंदर दिसते आणि पटकन खावीशी वाटते. 

 





• कशी वाटली रेसिपी..

• आवडली का..


• मग तुम्ही बनवा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.


• आणि हो रेसिपी आवडल्यास जरूर शेअर करा.. पण माझ्या नावासहित.

• कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

धन्यवाद! 🙏🏻

©सौ. सुचिता वाडेकर..✍🏻️


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या