Mindfulness : मनाची सकारात्मकता




Mindfulness


बाया कर्वे कॉन्सेलर्स असोसिएशनने निखिल वाळकीकर यांचे लेक्चर आयोजीत केले होते. हे लेक्चर खूप काही देऊन गेले. Thanks to Baya Karve Counselours Association.


● चर्चेचा व मार्गदर्शनाचा विषय : मनाची सकारात्मकता

● प्रमुख मार्गदर्शक

◆ निखिल वाळकीकर

  • Counselor and psychotherapist. 

  • Business coach. 

  • Founder Director: 

 

• मनाची सकारात्मकता 

 

निखिल वाळकीकर सरांनी जे काही लेक्चर मध्ये सांगितले त्याबद्दल थोडक्यात.... 

 

आनंदी राहणं किंवा आनंदी जीवन जगणं म्हणजे नेमकं काय? आनंद हि भावना काय आहे? तिचा रोल मानवाच्या आयुष्यात काय आहे? कोणता आनंद दीर्घकाळ टिकतो ? हा आनंद मिळवण्यासाठी काय केले पाहिजे किंवा आनंद निर्माण कसा करायचा ?


Positive Psychology म्हणजे काय ? यासाठी ध्यान कसे आवश्यक आहे? स्वतः मध्ये positive development तयार करण्यासाठी प्रत्यक्ष काय करायचं ? यासारख्या प्रश्नांचा अभ्यास विविध मानसोपचार तज्ञांनी कसा केला किंवा ते या प्रश्नांकडे कसे वळले आणि त्यातून त्यांना काय साध्य झालं? याविषयी सविस्तर माहिती सांगितली.



आपल्याकडे भरपूर पैसा आहे पण आपण आनंदी आहोत? प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगवेगळी असेल, कोणाला आईस्क्रीम खाल्यावर आनंद होईल, कोणाला पुरण पोळी खाण्याने आनंद होईल तर कोणाला चिकन खाल्याने आनंद होईल. परंतु हा झाला तात्पुरता आनंद. खरा आनंद हा स्वतःला स्वतः पलीकडे घेऊन जाणारा असतो आणि हा आनंद मोजण्याची देखील साधने उपलब्ध आहेत. 


उदा. मुलांचे दोन ग्रुप केले, दोन्ही ग्रुपला काही पैसे दिले. पहिल्या ग्रुपला ते फक्त स्वतः साठी वापरण्यासाठी सांगितले आणि दुसऱ्या ग्रुपला ते पैसे स्वतः साठी न वापरता फक्त इतरांसाठी वापरण्यास सांगितले. पहिल्या ग्रुपने हॉटेल मध्ये स्वतःसाठी खर्च केले, त्यांना आनंद मिळाला.


दुसऱ्या ग्रुपने ते पैसे काही गरजू व्यक्तींना आवश्यक सामान खरेदी करून घेऊन दिले. तेही आनंदी झाले. काही दिवसानंतर असे लक्षात आले की ज्यांनी ते पैसे स्वतः साठी खर्च केले त्यांना आनंद मिळाला परंतु तो तात्पुरता होता. आणि ज्यांनी दुसऱ्याच्या आनंदासाठी पैसे खर्च केले त्यांचा आनंद दीर्घकाळ टिकणारा होता.



आज माणसाकडे भरपूर पैसा आहे, कमीत कमी पाच सहा महिने किंवा वर्षे देखील त्याने काही काम केले नाही तरी तो आरामात बसून खाऊ शकेल हे निश्चित, असे असले तरी माणूस आनंदी आहे का ? आज मानसिक ट्रेस खूप वाढलेला दिसून येतो आणि हे थांबवण्यासाठी Positive Psychology आवश्यक आहे म्हणजे positive विचार आवश्यक आहे.


बऱ्याचदा आपल्या मनात नकारात्मक विचारच सुरुवातीला येतात. मात्र या नकारात्मक विचारांना Positive विचारांमध्ये convert करण्यासाठी Positive Psychology उपयोगी पडते म्हणजे ध्यान धारणा meditation तंत्र उपयोगी पडते.


● डॉ. हरबर्ट बेन्झन्ट यांनी संशोधन केले की BP कंट्रोल होण्यासाठी ध्यान उपयोगी पडते.


● डॉ. जेम्स ऑस्टिन (न्यूरॉलॉजिस्ट) हे जपानमध्ये झेन मेडिटेशन शिकले आणि त्यांना अलौकिक अनुभव आले. त्यांना आनंदी आणि शांत वाटू लागले. दीर्घकाळ ध्यान केल्यावर काय परिणाम होतो, शांतता कशी वाढते, मेंदूमध्ये काय काय होत यावर यांनी तीन पुस्तके लिहिली.


● डॉ. जॉन (PHD in molecular biology) यांना बौद्ध भिक्षुने ध्यान शिकविले. यांनी सांगितले की सतत आठ दिवस जर तुम्ही ध्यान केले तर तुमच्या मेंदूत काही कायमस्वरूपी बदल होतात. डिप्रेशन, हृदयाचे blockages घालवण्यासाठी वापर केला गेला आणि तो यशस्वी झाला. blockages नाहीसे झाले. 



● डॉ. एलिझाबेथ यांना ध्यानामुळे त्वचा जास्त दिवस तरुण राहते या शोधासाठी 2008 चे नोबेल पारितोषिक मिळाले.


अमेरिकन सैन्याला Positive Psychology चे शिक्षण दिले जाते. अमेरिकेत 5 हजार शाळांनी Positive Psychology स्वीकारली, मुलांना त्याचे ट्रेनिंग दिले जाते. त्यामुळे तेथे मुले जाण्याचे प्रमाण 50% नी कमी झाले.


मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा आवश्यक आहे. इथे प्रॅक्टिस महत्वाची आहे. यात दोन प्रकार येतात..


1. upwards

 2. downwards         


कोणत्याही बाबतीत पुढे जाणे महत्वाचे आहे थांबायचे नाही, थांबलात कि संपलात downward सुरु होणार मग डिप्रेशन निश्चित आहे. यासाठी बिझी राहणं, काम करीत राहणं, पुढे जात राहणं महत्वाचे आहे.


थांबून राहिलात तर -ve विचार मनाची पकड घेतात आणि आपण त्यातच गुरफटत जातो. यासाठी रोज ध्यान आवश्यक आहे, ध्यानामुळे ब्रेन शांत होतो आणि +ve विचार कार्य करू लागतात. -ve विचार मनात येत नाहीत आणि आले तरी फार काळ टिकत नाहीत.


ज्या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्याला अर्थ प्राप्त होईल, आत्मिक आनंद मिळेल ते करा. आनंदी राहणं, +ve विचार करणं हा आनंदकडे प्रवास करण्याचा मार्ग आहे.



या लेक्चर मधून कायमस्वरूपी आनंद कसा मिळवायचा याची मला समजलेली व्याख्या...⤵️

 

So Be +ve & Do Meditation = Create Happiness


• कसा वाटला ब्लॉग..


• आवडला का..


• आवडल्यास जरूर कमेंट करा आणि मला फॉलो करा..


• आपल्याला मिळालेली सकारात्मक माहिती इतरांपर्यंत पोहोचवणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे.


• आणि हो.. ब्लॉग शेअर करायला विसरू नका.. पण माझ्या नावासहित.


• कारण साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.


 धन्यवाद! 🙏🏻

© सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻️

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या