माणुसकी : माणुसकी फक्त इतरांसाठीच का..? त्याची सुरुवात स्वत: पासूनच सुरु केली तर…!

 माणुसकी

©सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻️


फोटो : गुगल सौजन्य 


बऱ्याचदा आपण ऐकत असतो... "बघा ना, काय माणूस आहे..? साधी माणुसकी पण नाहीये.." पण असे म्हणणारे देखील कधी कधी माणुसकी सोडून वागतातच की... मग प्रश्न पडतो की माणुसकी फक्त इतरांसाठीच का..? त्याची सुरुवात स्वत: पासूनच सुरु केली तर…! काय असते बरं हि माणुसकी…?🤔



माणुसकी म्हणजे निस्वार्थ भावनेने केलेले निरागस प्रेम…! माणुसकी म्हणजे जाणीव…! याचा अनुभव मी घेतला.



आमच्या सोसायटीतील स्टोअर रूममध्ये तीन मांजरीची पिल्ले होती. काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारणतः पंधरा दिवसांपूर्वी जन्मलेली असावीत..



पण त्यांची आई मात्र कुठे दिसत नव्हती... उपाशी पिल्लांना ओरडतानाचा आवाज येऊ लागला तसे आमच्या सोसायटीतील बालचमुंचे त्याकडे लक्ष गेले.



मग काय..! बालचमू सरसावले मदतीला. यात माझी मुलगी देखील सामील होती आणि तिचे मित्रमंडळी देखील. त्यावेळी सर्वांचेच वय दहा वर्षे होते.


Letter for daughter from mother : लेकीस पत्र..



आई विना पिलांना पाहून मुलांना खूप वाईट वाटले, त्यांनी पिलांना दूध दिले. सर्वांनी मिळून विटांचे घर रचले अन वर झाकण म्हणून पुठ्ठा ठेवला.



कुणी टोपली आणली, कुणी आणले दूध तर कुणी आणला टॉवेल... अशा सर्वांनी मिळून वस्तू जमा केल्या अन बनवलेल्या घरात ठेवल्या. 



पिलेही सुखावली.. पोटभर दूध पिऊन झोपी गेली... पिलांची नावेदेखील त्यांनी ठेवली.



सर्वांनी मग दूध कधी कुणी आणायचे हि वेळ ठरवून घेतली. रोज मुले शाळेत जाताना आणि शाळेतून आल्यावर पिलांची काळजी घ्यायचे.



फोटो : गुगल सौजन्य 



मुलांचा नुसता आवाज येताच पिले देखील कान टवकारून बाहेर यायची. मुले खेळत असताना त्यांच्या अवतीभवती खेळायची, इकडून तिकडे पळायची अन मुले गेली की गुपचूप घरात जाऊन बसायची. तो नजारा पहायला खूप गंमत यायची. यातून मुलांची त्या पिलाविषयीची काळजी आणि प्रेम दिसायचे.



"सरेचजन मग खुश झाले....


जमेल तसे लक्ष ठेऊ लागले...


बोकोबांपासून पिलांचे...


रक्षण करू लागले...


आईविना मांजरीची लेकरे पाहून...


मुलांचे मन हळहळले...


अन माणसाच्या पिलात


माणुसकीचे दर्शन मला घडले...!"


असं सासर सुरेख बाई.. खरंच या प्रेमाला उपमा नाही. असं प्रेम प्रत्येकीला मिळालं तर..!



• कसा वाटला ब्लॉग..


• आवडला का..


• आवडला तर शेअर करा पण नावासहित..


• आणि मला फॉलो करा


धन्यवाद 🙏🏻


©सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻️



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या