#मातृदिन_स्पेशल
#चॉकलेट_केक
#आठवण
मे महिना आला की आजही चार वर्षांपूर्वी माझ्या लेकीने साजरा केलेल्या मातृदिनाची आठवण होते. त्यावेळी ती दहा वर्षांची होती. मे महिन्याचा दुसरा रविवार... यादिवशी आपण कुणीतरी स्पेशल आहोत असं वाटू लागतं... कारण घरातील वातावरणच तसं असत. न बोलता मुलांच्या नजरा खूप काही बोलून जातात आणि आई असल्याचं पूर्ण समाधान आपल्या चेहऱ्यावर उमटतं... तेव्हाही असंच झालं होतं.
Made by Aarya Wadekar |
Marathi Recipe - Pav bhaji "पावभाजी" बिनाकांद्याची तुम्ही केलीत का कधी..?
सकाळी उठल्या उठल्या माझ्या लेकीने (10 वर्षे) सांगितले की आई, "आज नाष्टा झाल्यावर तू किचनमध्ये यायचं नाहीस".
का गं 🤔🤔...?" मी.
"सांगितलं ना, नाही यायचं…" असं म्हणत ती बाबाच्या कानात काहीतरी खुसुरफुसुर करू लागली.
मीही हसत 😊 "चालू दे तुमचं" म्हणत माझ्या कामाला लागले. बाबासोबत शॉपमध्ये जाऊन लागणारे साहित्य ती घेऊन आली आणि बाबा त्यांच्या कामासाठी निघून गेले.
किचनमधून आवज येणं चालू होतं... थोड्यावेळाने हळूच डोकावून पाहिलं तर सगळा किचन ओटा भांड्यांनी भरला होता. मनात म्हटलं... साफसफाईच काम करावं लागणार दिसतंय आपल्याला... 😁
थोड्यावेळाने लेकीने आवाज दिला... पहाते तर काय…!😵 एका मोठ्या तटावर बाईसाहेबांनी सुंदर केक बनवला होता👌 आणि त्याला जेम्सनी सजवले होते. 😍😍 खूपच सुंदर दिसत होता 🤗🤗 पण चवीला कसा लागेल माहीत नव्हते. तिने तो उचलून फ्रिजरला ठेवला आणि दुपारी बाबा आल्यावर कापुयात असे सांगून खेळायला पळाली.
या लेकींचा बाबा लोकांवर प्रचंड जीव... आई म्हणून सगळं आपण करतो पण बाबा मात्र सगळं श्रेय घेऊन जातात, असो. कारण आपल्यालाही कुठेतरी ते आवडत असतं.
या चॉकलेट केक साठी लागणार साहित्य आणि कृती पाहुयात जी माझ्या लेकीने केलीय....
#चॉकलेट_केक
साहित्य :
● हाईड अँड सिक बिस्कीट
● डेरी मिल्क चॉकलेट
● दूध
● चॉकलेट सिरप
कृती :
•बिस्किट्स दुधात बुडवून त्यावर डेरी मिल्क आणि चॉकलेट सिरपचे लेयर दिले.
•वरून जेम्स ठेवल्या.
•आणि 3 तास फ्रिजला ठेवले.
•झाला चॉकलेट केक तैयार ... !! 👍👍
©आर्या वाडेकर
● दुपारी बाबा आल्यावर केक कट केला अर्थात माझ्या हातून... खूप छान वाटलं 🤗🤗 😍😍 आणि केक तर अगदी अप्रतिम चव होती...😋😋
"आमच्यासाठी नेहमीच तू सर्वकाही बनवतेस... आज मदर्स डे म्हणून तुझ्यासाठी मला केक बनवायचा होता…!"
माझ्यासाठी तिची यामागची ही भावना महत्वाची होती. 🤗🤗
आजही मे महिना आला की माझ्या लेकीने साजरा केलेल्या या मातृदिनाची आठवण होते.
• कसा वाटला ब्लॉग..
• आवडल्यास शेअर करा व मला फॉलो करा
• ब्लॉग शेअर करताना नावासहित करा अन्यथा ती साहित्यचोरी समजली जाईल.
धन्यवाद! 🙏🏻
© सौ. सुचिता वाडेकर…✍🏻️
0 टिप्पण्या