कडीपत्ता चटणी : आरोग्यासाठी लाभदायक

कडीपत्ता चटणी : आरोग्यासाठी लाभदायक 






कडीपत्ता चटणीची पोषणमूल्य :


कडीपत्ता चटणीच्या पोषणमूल्याची माहिती साधारणतः साहित्याच्या प्रमाणानुसार बदलते. खाली दिलेली माहिती एका सर्वसाधारण कडीपत्ता चटणीच्या 100 ग्रॅम्सच्या पोषणमूल्याची आहे:⤵️


कॅलोरीज: 70-80

प्रोटीन: 1.5-2 ग्रॅम

फॅट: 4-6 ग्रॅम

कार्बोहायड्रेट्स: 8-10 ग्रॅम

फायबर्स: 2-3 ग्रॅम

सोडियम: 10-15 मि.ग्रॅम (स्वतःच्या चवीनुसार कमी-जास्त होऊ शकते)

आयरन: 1-2 मि.ग्रॅम

कॅल्शियम: 50-60 मि.ग्रॅम


कडीपत्ता चटणीचे महत्व खालीलप्रमाणे आहे.. ⤵️


पोषक तत्त्वे : कडीपत्ता चटणीमध्ये कडीपत्ता, खोबरे, आणि अन्य सामग्रीत विविध पोषक तत्त्वे असतात. कडीपत्ता आयर्न, कॅल्शियम, आणि एंटीऑक्सीडन्ट्सने भरलेला असतो, ज्यामुळे शरीराच्या सर्वांगीण आरोग्यावर चांगला प्रभाव पडतो.


पाचन सुधारते : कडीपत्त्यामुळे पचनक्रिया सुधारते. अपचन आणि गॅस्ट्रिक समस्यांपासून आराम मिळतो.  कडीपत्ता पचनासाठी संजीवनीचे कार्य करते. 


रक्तशुद्धी : कडीपत्ता रक्तशुद्ध करण्यास मदत करतो, त्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.


वजन नियंत्रण : कडीपत्त्यात फॅट कमी करणारे गुणधर्म असतात, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते.


पोषण वाढवणे : खोबऱ्याचा कीस, शेंगदाणे, तीळ या चटणीचे पोषणमूल्य वाढवतात. 


स्वाद आणि ताजगी : कडीपत्ता चटणीला स्वादिष्ट बनवतो आणि विविध भारतीय खाद्यपदार्थांमध्ये ताजगी आणि रुची वाढवतो.


आयुर्वेदिक गुणधर्म : कडीपत्ता आयुर्वेदात वात, पित्त, आणि कफ यांचे संतुलन राखण्यात मदत करतो, त्यामुळे शरीरातील तंतू व शुद्धीकरण प्रक्रियेवर सकारात्मक परिणाम होतो.


कडीपत्ता चटणी रेसिपी


साहित्य:

• २ कप कडीपत्ता

• १/२ कप खोबऱ्याचा कीस

• १/२ कप शेंगदाणे 

• १/२ कप धणे

• १/२ कप तीळ 

• १ चमचा लाल तिखट 

• १ चमचा जिरे

• २-३ लसूण पाकळ्या

• १ चमचा तेल

• चवीनुसार मीठ


कृती:


१. कडीपत्ता नीट धुवून कोरडे करावे.



२. एका पॅनमध्ये धणे, जिरे, शेंगदाणे, तीळ, खोबरा कीस, लसूण सर्व एक एक करून हलकेसे भाजून घ्यावे. 




३. यानंतर कढईत १ चमचा तेल गरम करून त्यात कडीपत्ता घालून २-३ मिनिटे परतावे, नंतर गॅस बंद करावा.


४. सर्व साहित्य थंड झाल्यावर तीळ सोडून बाकी सर्व  मीठ घालून मिक्सरमध्ये बारीक वाटावे.




५. यानंतर वाटलेल्या मिश्रणात तीळ घालून मिक्स करावे. 


६. आपली कडीपत्ता चटणी तैयार! 




ही चटणी विविध प्रकारच्या भारतीय जेवणांसोबत चांगली चव आणते आणि पोटासाठी फायदेशीर आहे.


©सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या