Surmai Fry Recipe In Marathi : सुरमई तवा फ्राय - चटकदार आणि सोपी रेसिपी अगदी घरगुती खासियत

 


Surmai Fry Recipe In Marathi : सुरमई तवा फ्राय - चटकदार आणि सोपी रेसिपी अगदी घरगुती खासियत 

सुरमई तवा फ्राय : 

चटकदार आणि सोपी रेसिपी

अगदी घरगुती खासियत 

सुरमई ही एक लोकप्रिय आणि पोषणमूल्यांनी समृद्ध अशी सागरी मच्छी आहे. तिला किंग फिश किंवा इंडियन मॅकरेल असेही म्हटले जाते. तिच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत:

  1. प्रथिनांनी समृद्ध: सुरमईमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात, जी शरीराच्या स्नायूंच्या विकासासाठी उपयुक्त असतात.
  2. ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स: हृदयासाठी फायदेशीर असलेल्या ओमेगा-3 फॅटी ऍसिड्सचे चांगले प्रमाण यामध्ये असते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

  3. विटॅमिन्स आणि खनिजे: सुरमईमध्ये व्हिटॅमिन डी, बी12, आणि सेलेनियमसारखी खनिजे असतात, जी हाडांची मजबुती आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी महत्त्वाची आहेत.

  4. कमी फॅटसाठी उत्तम: सुरमई ही कमी फॅट असलेली मच्छी असल्यामुळे वजन नियंत्रित ठेवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त आहे.

  5. सुगंधित चव: सुरमईचा स्वाद सौम्य आणि स्वादिष्ट असल्यामुळे ती विविध प्रकारे शिजवता येते - तवा फ्राय, करी, ग्रिल इत्यादी.


सुरमई तवा फ्राय 


साहित्य:

• सुरमईचे तुकडे अर्धा किलो 

• लसूण पाकळ्या 12-15

• चिंच एक चमचा 

• हळद १ चमचा

• लाल तिखट 2 चमचे 

• हिंग पाव चमचा 

• चवीनुसार मीठ

• कोथिंबीर मूठभर 

• तेल (तळण्यासाठी)

 




कृती :


• सुरमई तयार करणे :

  1. सुरमईचे तुकडे स्वच्छ धुवून घ्या.
  2. त्याला हिंग, हळद लावून घ्या. 
  3. लसूण, चिंच, लाल तिखट, कोथिंबीर आणि मीठ एकत्र करून मिक्सरला वाटण तयार करा.
  4. सुरमईचे तुकडयांना हे वाटण लावून मुरवण्यासाठी ३० मिनिटे ठेवा.


• तवा तयार करणे :

  1. तवा गरम करून त्यावर तेल घाला.


• फ्राय करणे :

  1. त्यावर सुरमईचे तुकडे ठेवून त्यावर झाकण ठेवा. 
  2. मध्यम आचेवर पाच मिनिटे ठेवून द्या. 
  3. पाच मिनिटांनी झाकण काढून तुकडी पलटी करा. 
  4. दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करा.


• सजावट आणि सर्व्हिंग :

  1. फ्राय केलेले सुरमईचे तुकडे ताटात काढून घ्या.
  2. कोथिंबीर घालून सजवा.
  3. गरम गरम सुरमई तवा फ्राय लिंबाच्या फोडींसह सर्व्ह करा.
  4. अथवा पोळी, सुरमईची रस्सा भाजी, भाता सोबत सुरमई थाळी सर्व्ह करा. 
  5. अशा प्रकारे, तुम्ही सुरमई तवा फ्राय चविष्ट आणि कुरकुरीत तयार करू शकता.



ही रेसिपी माझ्या सासूबाईंची. माझ्या सासूबाईंचे माहेर मुरुड- जंजिरा. समुद्रकिनारी, नारळाच्या झाडीत वसलेले टूमदार गांव आता पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. मच्छीचे प्रकार मी त्यांच्याकडूनच शिकले. माझं माहेर कृष्णा खोऱ्यात असल्यामुळे लग्ना आधी मी फक्त नदीची मच्छीच खाल्ली होती. त्यामुळे पापलेट, कोळंबी, ओले बोबील, चिंबोरी, शिवल्या, कालवे ही समुद्री मच्छी मी त्यांच्याकडूनच शिकले. धन्यवाद आई! 🙏🏻

धन्यवाद..! 🙏🏻

©सौ. सुचिता वाडेकर…✍🏻





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या