Maharastrian Upvas Recipe - साबुदाणा आप्पे मराठी रेसिपी
#साबुदाणा_आप्पे
#उपवास_स्पेशल
साबुदाणा वडे' कम 'आप्पे' चतुर्थी निमित्त खास तुम्हा सर्वांसाठी....
माझ्या मुलीला साबुदाणा वडे खायचे होते परंतु तिला खूप खोकला होता त्यामुळे तळलेले पदार्थ देऊ नयेत असे डॉक्टरांनी सांगितले होते. मग आता काय करायचे असा विचार करत असताना मनात विचार आला की साबुदाणा वडे तेलात न तळता आप्पे पात्रात केले तर ...?
प्रयोग करून बघितला आणि तो यशस्वी झाला. खाऊन झाल्यावर माझ्या मुलीने याचे 'खिचडी वडे' असे नामकरण केले.
साबुदाणा आप्पे रेसिपी
साहित्य:
• १ कप साबुदाणा
• ३-४ मध्यम बटाटे (उकडलेले व सोललेले)
• १/२ कप शेंगदाणे (भाजून व बारीक कुटलेले)
• २-३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
• १/२ चमचा जिरे
• १/२ चमचा साखर
• मीठ चवीनुसार
• कोथिंबीर (बारीक चिरलेली)
• लिंबाचा रस
• तळण्यासाठी तेल
कृती :
• साबुदाणा भिजवणे :
साबुदाणा स्वच्छ धुवून ४-५ तास (किंवा रात्रभर) जेवढा साबुदाणा तेवढेच पाणी टाकून झाकून ठेवा.
• मिश्रण तयार करा :
1. उकडलेले बटाटे कुस्करून घ्या.
2. त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा, कुटलेले शेंगदाणे, चिरलेल्या मिरच्या, जिरे, साखर, मीठ, कोथिंबीर आणि हवे असल्यास लिंबाचा रस घालून सर्व व्यवस्थित एकत्र करा.
3. चांगले मळून घट्ट मिश्रण तयार करा.
• गोळे तयार करा :
1. तयार मिश्रणाचे छोटे गोल गोळे बनवून घ्या.
2. सर्व गोळे तयार करून बाजूला ठेवा.
• आप्पे :
1. आप्पे पात्र गॅसवर ठेवून त्यात थोडे तेल टाका
2. गरम तेलात तयार गोळे ठेवून त्यावर झाकण ठेवा. मध्यम आचेवर दोन मिनिटे भाजून घ्या.
3. दोन मिनिटांनी झाकण काढून आप्पे पलटी करून घ्या व दुसऱ्या बाजूनेही सोनेरी तांबूस रंग आला की आप्पे काढून घ्या.
• सर्व्ह करणे :
गरमागरम साबुदाणा आप्पे नारळाची चटणी किंवा दहीसोबत सर्व्ह करा.
0 टिप्पण्या