Veg Cutlet Recipe in Marathi - व्हेज कटलेट : कटलेटचे महत्त्व आणि पौष्टिकता

 



Veg Cutlet Recipe in Marathi - व्हेज कटलेट : कटलेटचे महत्त्व आणि पौष्टिकता


#कटलेट 


रोज उठून काय करायचे नाष्टयाला..?🤔 हा मोठ्ठा प्रश्न आवासून उभा राहतो त्यावेळी  आम्हा स्त्रियांमधील आई 😜 कल्पना शक्तीच्या जोरावर बऱ्याचदा जुगाड करत असते आणि हा जुगाड यशस्वी देखील होतो.


हा जुगाड करण्यामागे तिचे दोन हेतू असतात… एक म्हणजे राहिलेल्या सगळ्या थोड्या थोडया भाज्या सत्कारणी लावणे आणी दुसरे म्हणजे सर्व भाज्या मुलांच्याहि नकळत त्यांना खाऊ घालण्याचे समाधान 🤗 मिळवणे. 







कटलेटचे महत्त्व आणि पौष्टिकता


कटलेट हा सर्व वयोगटातील लोकांना आवडणारा पदार्थ आहे. हा पदार्थ स्वादिष्ट असून चविष्ट स्नॅक म्हणून खाल्ला जातो. कटलेटमध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध घटकांमुळे त्याला पोषणमूल्य देखील लाभते.

कटलेटचे महत्त्व:


• चविष्ट आणि पोर्टेबल पदार्थ : कटलेट पटकन तयार होणारा आणि सहज नेण्याजोगा पदार्थ आहे. त्यामुळे प्रवासात किंवा हलक्या उपवासासाठी याचा चांगला उपयोग होतो.

• विविधतेने भरलेला : कटलेट विविध प्रकारे बनवता येते.. भाज्यांचा कटलेट, मांसाहारी कटलेट, किंवा पनीर व शेंगदाण्यांचा कटलेट. त्यामुळे सर्वांना हवे तसे प्रकार करता येतात.

• आहारातील समतोल : कटलेटमध्ये वेगवेगळ्या घटकांचा समावेश करून तुम्ही तुमच्या आहारात समतोल साधू शकता.

कटलेटची पौष्टिकता :


कटलेटमध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांवर त्याची पौष्टिकता अवलंबून असते.

• भाज्या : बटाटा, गाजर, फ्लॉवर, बीट, पालक अशा भाज्या कटलेटमध्ये वापरल्यास फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स मिळतात.

• डाळी आणि कडधान्ये : राजमा, मूग, चणे यांचा वापर प्रोटीनसाठी होतो.

• पनीर किंवा टोफू : यामुळे प्रथिनांची मात्रा वाढते.
ब्रेडक्रंब किंवा रवा: ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट मिळतात.

• तळण्याऐवजी भाजून किंवा एअर फ्रायरमध्ये बनवल्यास: कटलेट अधिक आरोग्यदायी ठरतो.




कटलेटचा आरोग्यदृष्टीने वापर:


• तंदुरुस्ती राखण्यासाठी : कमी तेलाचा वापर आणि ताज्या घटकांचा समावेश केल्यास कटलेट आरोग्यदायी होतो.

• बच्चे कंपनी साठी : भाजी न आवडणाऱ्या मुलांसाठी कटलेटमध्ये भाज्या टाकून पौष्टिक आहार दिला जाऊ शकतो.

टिप : कटलेट बनवताना कृत्रिम पदार्थ किंवा जास्त मसाले टाळावेत. ताज्या आणि नैसर्गिक पदार्थांचा समावेश केल्यास हा पदार्थ अधिक पौष्टिक आणि चविष्ट होतो.

कटलेटसाठी साहित्य :


• २ मोठे बटाटे (उकडून सोललेले)

• १ वाटी बारीक रवा 

• १/२ वाटी गाजर (किसलेले)

• १/२ वाटी मटार (उकडलेले आणि मॅश केलेले)

• १/२ वाटी कोबी (किसलेला)

• १ टीस्पून आले-लसूण पेस्ट

• १/२ टीस्पून हळद

• १ टीस्पून तिखट

• १ टीस्पून धने-जिरे पावडर

• १/२ टीस्पून गरम मसाला

• चवीपुरते मीठ

• बारीक चिरलेली कोथिंबीर

• तेल (शालो फ्राय साठी)










कृती:

1. बटाट्याची पेस्ट तयार करा :

• उकडलेले बटाटे सोलून मॅश करा.


2. भाज्यांचे मिश्रण तयार करा :
• मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये गाजर, कोबी, मटार, आले-लसूण पेस्ट, तिखट, हळद, धने-जिरे पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ, आणि कोथिंबीर घालून चांगले मिक्स करा.


कटलेट 

3. कटलेट आकार द्या :
• मिश्रणाचे छोटे गोळे घ्या आणि त्यांना कटलेटसारखा आकार द्या (गोल किंवा अंडाकृती).








4. कोटिंग करा :
• कटलेटला रव्या मध्ये घोळवून कोटिंग करा. 




4. शालोफ्राय करा :
कढईत किंवा पसरट पॅन अथवा तव्यावर तेल गरम करा. गरम तेलात कटलेट शालो फ्राय करा. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगाचे आणि कुरकुरीत फ्राय करा. 



5. सर्व्ह करा :
गरमागरम कटलेट हिरव्या चटणी, टोमॅटो सॉस किंवा दहीसोबत सर्व्ह करा.











टीप : कटलेट तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता. डीप फ्राय करणार असाल तर कॉन्फ्लॉवर च्या पेस्ट मध्ये बुडवून मग ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून मग डीप फ्राय करावे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या