Marathi Recipe - Pav bhaji "पावभाजी" बिनाकांद्याची तुम्ही केलीत का कधी..?

"पावभाजी" बिनाकांद्याची पावभाजी


©सौ. सुचिता वाडेकर... ✍️




'पावभाजी'...  सगळ्या मुलांचा आवडता मेनू. ज्यांची मुले लहान आहेत त्यांच्याघरी आठवड्यातून एकदा तरी नक्की पावभाजी केली जाते. माझ्या मुलीलाही पावभाजी खूप आवडते त्यामुळे बऱ्याचदा करणं होतं आणि विशेष म्हणजे सगळ्या भाज्या त्यानिमित्ताने काहोईना खाल्या जातात.


बऱ्याचदा आपल्या बायकांना प्रश्न पडतो की काय करु जेवायला...🤔 म्हणजे फ्रीज भरलेला असला तरीही प्रश्न पडतो बरं. परवा माझेही असेच झाले. काय करू....?  काय करू...?  पण सुचत काहीच नव्हते. 


आर्याला शिवजयंतीची सुट्टी होती त्यामुळे ती घरी होती. काय करू प्रश्न पडलाच होता की इतक्यात लेकीची 👧ऑर्डर आली, "आई, आज पावभाजी कर, पोळी भाजी नको". म्हटले, 'चला, हे एक बरे झाले... म्हणजे आजचा दिवस चांगला जाणार तर!' (पावभाजी केली की माझी मुलगी दिवसभर अगदी शहाण्या मुलीसारखी वागते) 'पण भाज्या आहेत का घरात?'... मी स्वतःलाच विचारले. 🙄


फ्रीज मध्ये बघितले तर सगळ्या भाज्या थोड्या-थोड्या होत्या. चला आत्ताचे काम तर झाले म्हणून सगळ्या भाज्यांना बाहेर काढले. फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची, गाजर, मटार, टोमॅटो आणि बटाटेही होते. पावभाजी मसाला घरात होताच... फक्त पावलादी आणि बटर आणायचे होते. तेही आर्याच्या बाबांनी 👨आणून दिले. 


आमच्याकडे या बाबालोकांचे 👨‍एक बरे आहे खाण्याचे नखरे नाहीत. अन्न हे पूर्णब्रम्ह समजून मी जे बनवते ते जेवतात, पण लेक मात्र चवीने खाणारी आहे बरं... म्हणजे अगदी दडपे पोहे करताना सुद्धा थोडं लिंबू 🍋 जास्त घाल हं आई, थोडी साखरपण जास्त घाल आणि जरा तिखट बनव अशी ऑर्डर देऊन जाते. 


पावभाजी असते त्यावेळी मात्र तिला लिंबू 🍋हवंच. वर शेरा हा असतो, "मम्मा( लाडात आली की मम्मा असते, कधी-कधी मम्मूडीही होते) तुझी पावभाजी छान होते, 👌👌 Yammy! I like it". 😍😍


मग मलाही गालातल्या गालात हसू 😊 येतं आणि अंगावर मूठभर मांस चढल्याचं फील होतं. या गालातल्या गालात हसण्याने आठवलं, माझ्या आईला जेव्हा माझ्या लहानपणी मी असेच बोलायचे (साबुदाणा खिचडी विषयी, आजही बोलते की कशी गं तुझी छान होते 🤔खिचडी) त्यावेळी ती गालातल्या गालात नुसती हसायची. 😊 मी विचारायचेही तिला कि का हसतेस म्हणून तर तिला ते कधी संगता आले नाही. 


आजही माझी आई एखादा पदार्थ बनवते तेव्हा त्याची चव हि अगदी माझ्या लहानपणी तिने केलेल्या पदार्थाइतकीच ताजी असते.


यातून एक गोष्ट उमगलीय मला कि आपण आया जेव्हा एखादा पदार्थ बनवतो, तेव्हा तो बनवताना आपल्या मुलांचे चेहरे 👫 आपल्या डोळ्यासमोर असतात कारण त्यांच्या आवडीचं आपण बनवत असतो. तो पदार्थ बनवताना मुलांविषयी वाटणारं प्रेम ❤️आपल्याही नकळत त्या पदार्थात मिसळत असतं आणि म्हणून तो पदार्थ खूप चवदार होतो. 


मुलं पोटभर, आवडीनं जेवली की आपण आया अगदी तृप्त होतो. 😍 माझी आई काय, मी काय किंवा तुम्ही सगळ्याजणी काय हा अनुभव घेत असालच !


चला, मी बोलायला लागले की थांबणं मुश्किल होतं. आपण पावभाजी करतोय ना! तर आता इथे आपण कांदा🧅 वापरणार नाही तर बिनाकांद्याची पावभाजी करणार आहोत. 


एकदा कांदे खूप महाग होते आणि घरातील कांदे देखील संपले होते; त्यामुळे बिनाकांद्याची पावभाजी केली आणि अतिशय सुंदर झाली. 👌👌 तेव्हा पासून मी पावभाजीत कांदा वापरत नाही... मात्र सोबत देते. 


तुम्हीही करून बघा एकदा... 👍 चवीतला फरक तुमच्या लक्षात येईल आणि आले लसूण वापरले नाही तर चातुर्मासात देखील चालेल. (जे चातुर्मासात कांदा-लसूण वर्ज करतात त्यांच्यासाठी)


साहित्य तर झाले तयार आता कृती करूयात. 

• कृती : 


1. सर्व भाज्या(थोडा फ्लॉवर, थोडा कोबी, 2सिमला मिरची, एक गाजर,  दोन टोमॅटो, 3 मध्यम आकाराचे बटाटे आणि थोडा मटार) धुऊन, बारीक चिरून कुकरमध्ये घातले, टोमॅटो ही दोन भाग करून भाज्यांवर ठेवला आणि कुकरचे झाकण लावून भाज्या शिजवून घेतल्या. 


2. तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात थोडे आले, लसूण आणि कोथिंबीर चे वाटण करून ठेवले. 


3. कुकरची वाफ गेल्यावर झाकण उघडून कापलेल्या टोमॅटोवरील साल अलगद काढून टाकले आणि बटाट्याची सालं कडून बटाटा वेगळा स्मॅश करून घेतला. 


4. सर्व भाज्या हॅन्ड मिक्सीने ब्लेंड केल्या. (हॅन्ड मिक्सी नसेल तर भाज्या मिक्सरला फिरवा अथवा स्मॅशर ने स्मॅश कराव्यात)


5. गॅसवर एका मोठ्या कढईत तेल आणि थोडे बटर घातले. नंतर त्यात हिंग, हळद आणि आले-लसणाचे वाटण घालून थोडे परतले, 


6. नंतर 'अपूर्व पावभाजी मसाला' घातला. माझी मैत्रीण मृणाल म्हैसकर हिची कंपनी आहे 'ट्रायो इंटरनॅशनल' धायरी पुणे येथे... त्यांचे 'अपूर्व मसाले' आहेत.


7. त्यानंतर ते थोडे परतले कि त्यात भाज्यांचे बॅटर आणि स्मॅश केलेला बटाटा घालून चमच्याने चांगले हलवून घेतले. 


8. मिश्रण थोडे घट्ट वाटल्याने त्यात थोडे पाणी घातले. यानंतर त्यात मीठ आणि खायचा टोमॅटो रेड कलर थोड्याशा पाण्यात मिक्स करून घातला. 


9. या भाज्यांमध्ये बिट वापरले तर खायचा कलर घालण्याची आवश्यकता भासत नाही. परंतु माझ्याकडे बिट नसल्यामुळे मी कलर वापरला आणि झाकण ठेवून एक उकळी आणली. 


10. यानंतर वरून कोथिंबीर पेरली आणि गॅस बंद केला.


11. दुसरीकडे पावांना बटर लावून ते तव्यावर चांगले भाजून घेतले आणि लिंबू, कांदा, काकडी सोबत सर्व्ह केली 'पावभाजी". 


मैं भी खुश, लेक भी खुश और लेकीचा बाबाही खुश!


Sabudana Khichadi : खिचडीसाठी साबुदाणा भिजवण्याची एक सोपी पद्धत


• कसा वाटला ब्लॉग...

• आवडला का... 


• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 

• फॉलो करा. 



धन्यवाद ! 🙏 


©सौ. सुचिता वाडेकर...✍️


टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

Amar म्हणाले…
वाचूनच तोंडाला पाणी सुटले,😋
पाव भाजी म्हणजे (माझ्या मते) सगळी जीवनसत्त्व मारून बनवलेली भाजी, पण मुलांना खरंच खूप आवडते...