Veena World वीणा वल्ड सोबतची केरळची अविस्मरणीय 'लेडीज स्पेशल' टूर (5 मार्च ते 10 मार्च 2023)
पूर्वी सकाळ पेपर मध्ये केसरीच्या My Fair Lady चे सदर यायचे.. मी ते नेहमी आवर्जून वाचत असे. त्यावेळी वीणा पाटील केसरीच्या हेड होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांनी वीणा वल्ड नावाची स्वतःची ट्रॅव्हल कंपनी सुरु केली.. तेव्हापासून माझी वीणा वल्डच्या 'लेडीज स्पेशल' सोबत एकदा तरी जायचे अशी खुप इच्छा होती.. ती यावर्षी अचानक माझ्या पुतणीमुळे आणि माझ्या मुलीमुळे शक्य झाली.
मागच्या वर्षी प्रसिद्ध झालेला झिम्मा चित्रपट तुम्हाला माहिती असेल या चित्रपटात वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या बायका दहा दिवस एकत्र एकट्याने जीवनाचा आनंद घेत असतात.. राहून गेलेल्या गोष्टी करत असताना गेलेला आत्मविश्वास पुन्हा नव्याने मिळवताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून हरखून जायला होतं.. आणि कुठेतरी आपणही स्वतःला त्यात शोधू लागतो. प्रत्येकीचे काही ना काही प्रश्न असतात पण त्यावर मात करून नव्याने आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी त्या देतात.. त्यामुळे आपणही एकदा तरी अशी सहल वीणा वल्ड बरोबर करावी हे माझं स्वप्न होतं. ते आज सत्यात उतरलं याचा मला खुप आनंद आहे.
त्याचबरोबर दरवेळी 'झिम्मा' पाहताना मी दोन वर्षांपूर्वी वीणा वल्ड सोबत केलेल्या माझ्या 'सिमला-मनाली' सहलीला देखील पुन्हा जाऊन येते. अविस्मरणीय अनुभव होता तो. वीणा वल्डची राहण्याची सोय, जेवणाची सोय उत्तम असते. टूर मॅनेजर सर्वांची खुप आत्मीयतेने काळजी घेतात. ते कधी आमचे मित्र होऊन जातात आणि कधी आमच्या कुटुंबंचा भाग होऊन जातात हे कळतदेखील नाही.
केरळच्या या ट्रिप मधील उपेंद्र आणि केतन हे देखील आमचे कधी मित्र बनले समजले देखील नाही. खरं तर आम्ही सर्व लेडीज आणि आमच्यात फक्त हे दोघेच men's होते.. पण आम्हाला एक क्षण देखील uncomfortable वाटले नाही. बायकांना एक 6th सेन्स असतो.. म्हणजे एक नजरेत त्या समोरच्या पुरुषांची नजर ओळखू शकतात पण उपेंद्र आणि केतन एवढे स्वछ आणि निर्मळ मनाचे होते की आम्ही जे जे कपडे घातले त्यात त्या दोघांसोबत आम्ही comfortable होतो.
आम्ही खुप मज्जा केली. ज्या गोष्टी आम्ही फॅमिली सोबत शकत नव्हतो त्या सर्व गोष्टी आम्ही या ट्रिप मध्ये केल्या. आजपर्यंत आम्ही इतरांसाठी जगत आलो पण हे सहा दिवस आम्ही स्वतःसाठी जगलो. या सहा दिवसात आम्ही आमचं घर, कुटुंबं, प्रत्येकाची काळजी करणं सारं काही विसरून गेलो. हा सुंदर अनुभव आमच्या कायम लक्षात राहिल.. यासाठी केतन, उपेंद्र आणि वीणा वल्ड चे खुप खुप आभार.. 🙏🏻
पहिल्या दिवशी हॉटेवर पोहोचल्या नंतर आम्ही सर्वजणी जे सुटलो ना.. ते शेवटच्या दिवशी आता घरी जात असलो तरी भरपूर energy आणि वीणा वल्डच्या या sweet memory घेऊन, fresh होऊन घरी आलो याचा खुप आनंद आहे.
वीणा ताईंनी आम्हा लेडीजसाठी लेडीज स्पेशल टूर ही concept निर्माण करून वर्षानुवर्षे संसाराच्या रहाट गाडग्यात अडकलेल्या आम्हा बायकांना संजीवनी बुटी दिली आहे.. ज्याचे सेवन करून आम्ही इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक अडचणीला धैर्याने तोंड देण्यासाठी पुन्हा सज्ज झालो आहोत. त्यासाठी वीणा ताईंचे खुप खुप आभार.. 🙏🏻💐
वीणा वल्डची हॉटेल्स एक सौ एक बढकर एक होती.. प्रत्येक ठिकाणी ब्रेकफास्ट, लंच, डिनर अतिशय अप्रतिम, सुदंर आणि टेस्टी होते. याशिवाय प्रत्येक क्षणी आमची काळजी घेणारे, आमची विचारपूस करणारी वीणा वल्ड ची दोन आपली माणसं आमच्या सोबत होती. आता इथून पुढे आमची प्रत्येक ट्रिप वीणा वल्ड सोबतच असेल हे मात्र नक्की. कुणीही आमची इतकेदिवस इतकी सुंदर काळजी घेणार नाही जी वीणा वल्ड ने घेतली आहे.. यासाठी उपेंद्र, केतन आणि वीणा वल्ड ला खुप खुप धन्यवाद..! 🙏🏻🙏🏻
Once again thank u so much Veena World..!!
©सौ. सुचिता वाडेकर…✍🏻️
पुणे.
#Veena_World
माझ्या या ट्रिपचा प्रवास एका छोट्याश्या कवितेतून व्यक्त झाला ती कविता खास तुमच्यासाठी.. ⤵️
"मंतरलेले ते सहा दिवस..!"
एकदिवस अचानक,
एक स्वप्न सत्यात उतरलं..
पुतणीच्या प्रयत्नाने,
महिला स्पेशल पक्क झालं..!
नवरोबाने भरले पैसे,
लेकीने दिली परवानगी..
म्हणाले मग दोघेही,
तू जी ले अपनी जिंदगी..!
बॅग भरो निकल पडो,
ब्रीद वीणा वल्डचे..
मणी माळेत गुंफुन,
विमान उडाले आमचे..!
सोबत होती वीणा वल्डची,
दोन आपली माणसे..
केतन आणि उपेंद्र,
होते टूर मॅनेजर आमचे..!
वाटलं नव्हतं स्वप्नात देखील,
हे ही दिवस सत्यात उतरतील..
दुरदुरून आलेल्या साऱ्याजनी,
सहा दिवस एकत्र राहतील..!
पहिल्याच दिवशी साऱ्याजनींनी,
जणू कात टाकली..
केवडयाच्या बनात जशी,
नागीणच सळसळली..!
प्रत्येकजण घेत होती,
आस्वाद आनंदाचा..
आताचा क्षण माझा,
फक्त स्वतःसाठी जगण्याचा..!
घर, संसार, नवरा मुलं,
साऱ्यांचा विसर पडला..
मुक्त होऊन मुक्तपणे,
मग आम्ही संचार केला..!
एक दिवस तिच्यासाठी,
खास राखून ठेवलेला..
तिचा सन्मान करण्याचा,
हट्ट वीणा वल्डने केलेला..!
8 मार्च महिला दिन,
आम्ही साजरा केला..
वीणा वल्डने मग आमचा,
यथोचित सन्मान केला..!
डान्स, पार्टी, स्पर्धा, मनोगत,
खच्चून कार्यक्रम आखलेला..
न्हाऊन निघालो साऱ्याजनी,
चेहऱ्यावर आनंद माखलेला..!
विसरणार नाही हे क्षण,
स्वतःसाठी जगलेले..
वीणा वल्डच्या साथीने,
मनात साठवून घेतलेले..!
वीणा वल्डची हॉटेल्स तर,
एकाचढीत एक होती..
जेवण सुद्धा अप्रतिम,
कशाचीही कमी नव्हती..!
ट्रिप आमची यशस्वी झाली,
सेलिब्रेशन तो बनता है बॉस..
चौघी निघणार लवकर म्हणून,
एक दिवस आधीच केक कापला खास..!
बघता बघता एक एक गड,
आम्ही सर केला..
अन एकदिवस परत जायचा,
तो क्षण आला..!
क्षणभर मनामध्ये,
हुरहूर दाटून आली..
पण पुढच्याच क्षणी मग,
घरी जायची ओढ वाटू लागली..!
निरोप घेतला साऱ्यांचा,
मनामध्ये आनंद भरलेला..
बघता बघता आमचे विमान,
पोहोचले की हो पुण्याला..!
मंतरलेले ते सहा दिवस,
कायम लक्षात राहतील..
आयुष्यात कधी दुःख आले,
तर कायम सोबत करतील..!
धन्यवाद वीणा वल्ड.. 🙏🏻🙏🏻
धन्यवाद केतन, उपेंद्र..! 🙏🏻🙏🏻
तुम्ही आमच्या कायम लक्षात रहाल..!
😊😊
©सौ. सुचिता वाडेकर…✍🏻️
पुणे.
0 टिप्पण्या