Parenting : पालकत्व निभावताना... (भाग-९) "किशोरावस्था"

 पालकत्व निभावताना... (भाग-९)

©सौ. सुचिता मिलिंद वाडेकर... ✍️

२३.०४.२०२०





मागील भागांपासून आपण "मानवाच्या जीवन विकासावस्था" सविस्तर पहात आहोत.

मागील भागात(भाग-८) आपण "पौगांडावस्था" पहिली... खालील लिंकवर ⤵️

पालकत्व निभावताना... (भाग-८) "पौगांडावस्था"


या भागात आपण "किशोरावस्था" पाहणार आहोत. 

७. किशोरावस्था(कुमारावस्था) -  
(कालावधी : १५ वर्षे पासून २१ वर्षे पर्यंत)

• किशोरावस्थेची (कुमारावस्था) वैशिष्ट्ये - 


ही अवस्था खूप महत्वाची मानली जाते. हे शारीरिक, मानसिक बदलाचे वय असते. बाल्यावस्थेतून प्रौढ अवस्थेमध्ये जाण्यासाठीची ही सुरुवात आहे. हे प्रॉब्लेमेटीक वय समजले जाते.

या वयात शारीरिक बदल होतात,  मुलींना पिरेडस येतात,  मुलांच्या आवाजात बदल होऊन तो घोगरा होतो. या वयात मुलांच्या मनात स्वातंत्र्याची भावना वाढीस लागते. पालकांना दैनंदिन जीवनातील या वास्तवतेला तोंड देणे जड जाते.

बहुतांश किशोरांचे त्यांच्या पालकांशी जुळते मात्र काहींचे जुळतही नाही. पालकांचे आर्थिक, सामाजिक, राजकीय बाबतीत एक मत असले तरी वेशभुषा, संगीत, खाद्यपदार्थ याविषयीच्या आवडी निवडी भिन्न असू शकतात. पालकांच्या अपेक्षेपेक्षा मुले लवकर स्वातंत्र्य घेऊ लागतात आणि मग वाद निर्माण होतात.

किशोरावस्थेच्या सुरुवातीला हे प्रमाण जास्त असते. उदा. मुलांनी कानात बाळी घालणे पालकांना पसंद नसते परंतु किशोरांना ती वैयक्तिक स्वारस्याची वाटते. किशोरांना पालकांच्या सततच्या उपदेशाची कटकट वाटते.

लहान असताना सांगितलेले काम ते ऐकायचे मात्र किशोरवयात त्यांना हे पटत नाही. किशोरअवस्थेच्या सुरुवातीच्या काळात त्यांची वाद घालण्याची वृत्ती,  हेकटपणा यामुळे पालक-बालक संघर्ष वाढत असले तरी त्यांच्यामधील संबंध विकसित होण्यामध्ये या संघर्षाची महत्वाची भूमिका असते.

मुले मोठी होत आहेत, त्यांच्याशी वाद होणे स्वभाविक आहे, याची जाणीव पालकांना होते. साधारणत: मध्यकिशोरावस्थेत ही प्रक्रिया घडत असल्याने सुरुवातीला उडणारे खटके हळूहळू कमी होत जातात.

किशोरांचा अधिकाधिक वेळ मित्र समूहात जातो. त्यांना स्वतःची मते, क्षमता, आणि शारीरिक क्षमतानचे मूल्यमापन करता येते. किशोरावस्थेत होणारे शारीरिक बदल लक्षणीय असल्याने आपल्यासारखे अनुभव येणाऱ्या अन्य किशोरांची त्यांना गरज भासते.

या वयात लैंगिक इंद्रीये परिपक्व व्हायला सुरुवात होते त्यामुळे भिन्नलिंगी व्यक्तीकडे पाहावयचा दृष्टिकोन बदलतो. 10 वर्षाच्या मुलांमुलींना प्रत्येक भिन्नलिंगी व्यक्ती चीड निर्माण करणारी वाटते तर किशोरवयीन मुलेमुली परस्परांकडे मोठया स्वारस्याने पाहतात.

सुरुवातीला मुलेमुले, मुलीमुली असे तयार झालेले कंपू किशोरवयात एकत्र येऊ लागतात. लवकरच भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर अधिक वेळ जाऊ लागतो आणि मुलामुलींचे एकत्रित कंपू तयार होतात. किशोरअवस्थेच्या शेवटी मात्र या कंपूचा प्रभाव कमी होतो बऱ्याचजणांच्या जोडया जमल्याने हे कंपू नष्ट होतात.

• किशोरावस्थेतील(कुमारावस्था) धोके -

• शारीरिक धोके - 

१. पोषण, आहारविषयक धोके -
किशोरावस्थेत शारीरिक बदलांना तोंड देताना आहारात वाढ़ होत असते. या वयात पोषक व संतुलित आहार घेतला नाही तर समस्या उद्भवतात. शरीराच्या वाढीसाठी कॅल्शियम, लोहाची आवश्यकता असते आणि हे आहारातून मिळत असते, त्यामुळे या काळात परिपूर्ण आहार नाही घेतला तर ऍनिमिया सारखे आजार उद्भवू शकतात.

२. लठ्ठपणा - लठ्ठपणा ही किशोर वयातील महत्वाची समस्या आहे. वाढत्या आहारामुळे  शरीर लठ्ठतेकडे झुकू लागते तसेच व्यायामाचा अभाव हे देखील लठ्ठपणाचे कारण आहे. त्यामुळे या वयात लठ्ठपणा हा धोका उद्भवू शकतो.

३. क्षुधाभाव - या वयात शरीराबद्दल सजगता निर्माण होते. सुंदर, आकर्षक दिसावे यासाठी किशोर सजग असतात. परंतु व्यायाम न करता लठ्ठपणा वाढू नये म्हणून किशोर खाणे बंद करतात. याचा अतिरेक झाला कि हा धोका निर्माण होऊ शकतो.

• आरोग्यविषयक धोके -  

किशोरावस्थेतील धोक्यापैकी आमली पदार्थांचे सेवन हा एक गंभीर धोका आहे. आमली पदार्थ, मद्य, तंबाखू, गुटखा, सिगारेट यासारखे धूम्रपान याचा किशोरांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी बरीचशी अनुवंशिकताही कारणीभूत असते.
धूम्रपानामुळे सुखद भावनिक अवस्था निर्माण  होते त्यामुळे अनेक किशोर याकडे ओढले जातात.

• लैंगिकदृष्टया संक्रमित होणारे संसर्ग - 
किशोररांमध्ये लैंगिकदृष्टया संक्रमित होणाऱ्या आजारांची शक्यता जास्त असते. हताश झालेले किशोर बेजबाबदारपणे लैंगिक संबंध ठेवतात त्यामुळे अशामध्ये लैंगिकदृष्टया संक्रमित होणाऱ्या आजारांचे धोके निर्माण होतात.  उदा. एड्स, तसेच लग्नाआधी पप्रेग्नन्सी राहणे हा धोका निर्माण होतो.

• शारीरिक व्यंग - शारीरिक व्यंग असेल तर शारीरिक हालचाली फास्ट करता येत नाहीत. इतरांना जमतंय पण आपल्याला जमत नाही त्यामुळे अस्वस्थ वाटू लागते.

खूप उंच मुली असतील किंवा काही मुलींची उंची कमी असते अशावेळी त्यांना अनकन्फर्मटेबल वाटू लागते. तसेच अति लठ्ठ किंवा अति बारीक असण्यानेही स्वतःची लाज वाटू लागते. खूप काळे असण्याने देखील कॉम्प्लेक्स येऊ शकतो. 

मेमरी आय क्यू कमी असणे, ऐकू कमी येणे, दात वेडेवाकडे असणे, केस अति कुरळे असणे यामुळे देखील धोका निर्माण होऊ शकतो.

• आत्महत्या - किशोरावस्थेत होणाऱ्या आत्महत्यांसाठी कौटुंबिक संघर्ष, कौटुंबिक नाती, शालेय समस्या कारणीभूत ठरतात. तर काही आत्महत्यांमागे उपेक्षित वागणूक कारणीभूत ठरते. 

आमली पदार्थांचे सेवन करणार्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे किशोरावस्थेत हा धोका निर्माण होण्याचे प्रमाण जास्त आहे.

• सामाजिक वर्तन - सोसायटीमध्ये, समाजात जबाबदारीने वागले तर ठीक आहे अन्यथा हा धोका निर्माण होऊ शकतो. सोसायटीमध्ये मिक्स होता येत नाही, फटकळ वागण्यामुळे अनेकांशी पटत नाही. व्यक्ती कधीही वाईट नसते तिचे वर्तन वाईट असते.

• कौटुंबिक संबंध - जे आईवडील मुलांचे प्रश्न समजून घेतात, मुले चुकली तर त्यांना सांभाळून घेऊन समजावून सांगतात त्यांचे सबंध चांगले राहतात. उलट जर प्रत्येक बाबतीत मुलालाच जबाबदार धरले, त्याच्या चुकीबद्दल सारखे बोलले तर त्रास होऊ शकतो. कुटूंबाचा स्पोर्ट नसेल तर मानसिक प्रश्न निर्माण होऊ शकतात.

• भावनिक धोके - कुमारावस्थेत शारीरिक बदल होतात त्यामुळे त्यांना कॉम्प्लेक्स येऊ शकतो. अचानक आई किंवा वडिलांचा मृत्यू होतो तेव्हा अचानक आलेल्या जबाबदारीचा ताण येऊ शकतो.

आईबाबांचे भांडण  सारखे डोळ्यसमोर होत असेल तर ट्रेस येऊ शकतो. मित्रसोबत असताना आई वडिलांपैकी कोणी त्यांच्याशी नीट बोलले नाही तर मुलांना ट्रेस येऊ शकतो.

या वयात मुलांशी आवाज चढवून बोलले तर ते आणखी आवाज चढवतात. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर कॉलेज बंग करून मुलांना पार्ट टाइम जॉब करावा लागतो याचाही ताण मुलांना येऊ शकतो.

अशाप्रकारे या भागात आपण किशोरावस्था(कुमारावस्था), तिची वैशिष्ट्ये,  आणि कुमारवयातील संभाव्य धोके आपण पाहिले. 


भेटूयात पुढील भागात..  

८. तारुण्यावस्था (पूर्व प्रौढअवस्था) - 
कालावधी : २१ वर्षे ते ४० वर्षे पर्यंत 

• कसा वाटला ब्लॉग...
• आवडला का... 

• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 
• फॉलो करा. 

धन्यवाद ! 🙏 

©सौ. सुचिता वाडेकर...✍️
२३.०४.२०२०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या