पालकत्व निभावताना... (भाग-८)
©सौ. सुचिता मिलिंद वाडेकर... ✍️
२२.०४.२०२०
२२.०४.२०२०
मागील भागात(भाग-७) आपण "उत्तर बाल्यावस्था" पहिली..
खालील लिंकवर ⤵️
पालकत्व निभावताना... (भाग-७) "उत्तर बाल्यावस्था"
या भागात आपण "पौगांडावस्था" पाहणार आहोत.
६. पौगांडावस्था(यौवनारंभ) -
(कालावधी : १२ वर्षेपासून ते १५ वर्षे पर्यंत)
पौगांडावस्था(यौवनारंभ) म्हणजेच पूर्व कुमारावस्था ज्याला पूर्व किशोर अवस्था असेही म्हणतात. ही संक्रमणाची अवस्था मानली जाते. बाल्यावस्था आणि प्रौढअवस्था यामधील ती संक्रमणा अवस्था आहे... म्हणजे ना बालक ना प्रौढ अशी अवस्था. साधारणत: १२-१३ वर्षाच्या आसपास या अवस्थेला सुरुवात होते आणि १९ ते २० व्या वर्षी शेवट होतो. या अवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे शारीरिक वाढ़.
• पूर्व किशोर अवस्थामधील शारीरिक वाढ़ -
१. उंची - उंची झपाट्याने वाढते, एका महिन्यातच उंचीत झालेला बदल दिसून येतो. मुलींपेक्षा मुलांची उंची अधिक वाढते.
मुली साधारणत: वयाच्या ११ व्या वर्षी उंच दिसू लागतात तर मुळे १३ व्या वर्षी मुलींपेक्षा अधिकउंच दिसू लागतात.
२. वजन - पूर्व किशोर अवस्थेत उंची बरोबर वजनही वाढते. हात, पाय, पावले, नितंब तसेच संपूर्ण धडाची वाढ़ होते त्यामुळे वजनही वाढते.
• पौगांडावस्था(यौवनारंभ) -
मेंदूमधील असणाऱ्या मस्तीशक ग्रंथीच्या संकेतामुळे शरीरातील लैंगिक ग्रंथी रसाच्या निर्मितीस सुरुवात होते. यौवनारंभास लेप्टीन हा ग्रंथीरस कारणीभूत असतो.
मुलींमध्ये ११-१२ व्या वर्षी तर मुलांमध्ये १३-१४व्या वर्षी यौवनारंभास प्रारंभ होतो. हल्ली मुलींमधील मासिक स्त्रवाचे वय कमी होऊ लागलेय त्यामुळे मुली लवकर वयात येताना दिसतात.
• मुलींमधील यौवनारंभ - मुलींमध्ये मासिकपाळी ११-१२ व्या वर्षी येताना दिसते. चांगल्या पोषणामुळे मुलींचा शारीरिक विकास अधिक सुदृढ होतो व त्यामुळे लवकर परिपक्वन होऊन मासिकपाळी लवकर म्हणजे लहान वयात सुरु होताना दिसते.
स्थूल प्रकृती असणाऱ्या मुलींना लवकर मासिकपाळी सुरु होते. त्यामानाने कमी स्थूल असणाऱ्या मुलींना उशिरा मासिकपाळी सुरु होते. ज्या मुलींच्या शरीरात चरबीचे प्रमाण जास्त असते अशा मुलींनाही मासिकपाळी लवकर सुरु होते. तसेच ताणाचाही परिणाम होत असल्यामुळे मासिकपाळी लवकर सुरु होते.
यौवनारंभात होणाऱ्या विविध बदलांपैकी मासिकपाळीला सुरुवात होणे हा एक बदल आहे आणि त्याचबरोबर गर्भाशय व योनीमार्गाचा विकासही होतो. गुप्त जागी लव येते, स्तन व नितंबाची वाढ होते, त्यांना गोलाई येते. साधारणत: १० वर्षाच्या आसपास स्तनाची वाढ़ सुरु होते. ११ व्या वर्षी गुप्त जागी लव यायला सुरुवात होते तर आणखी दोन वर्षांनी काखेतही लव यायला सुरुवात होते.
• मुलांमधील यौवनारंभ - मुलांचे लैंगिक परिपक्वनमुलींपेक्षा भिन्न असते. मुलांना १२ व्या वर्षी गुप्त जागी लव येते आणि नंतर चेहऱ्यावर दाढी-मिशा आणि काखेत लव येते. मुलांचा स्वररज्जू लांब होतो आणि स्वरयंत्राचा आकार मोठा होतो. परिणामत: त्यांचा आवाज फुटतो व अधिक घोगरा होतो.

Parenting is a very big chalange to everyone : "पालकत्वाच्या प्रवासातील एक अवघड टप्पा" पौगांडावस्था
मुलांमध्येही जननेणंद्रीयात बदल घडतो साधारणत: १२ वर्षाच्या सुमारास शिस्न व त्याखाली असणाऱ्या पिशवीची वाढ़ होते. त्यानंतर ३-४ वर्षात पिशवीचा आकार प्रौढन इतका मोठा होतो. वीर्य निर्मिती करणाऱ्या ग्रंथी आणि शुक्रजंतू निर्माण करणाऱ्या पिशवीचे आकारमान वाढते. १३ व्या वर्षीच्या आसपास मुलांमध्ये पहिले वीर्यपतन होते. सुरुवातीला वीर्यामध्ये शुक्राणूचे प्रमाण कमी असले तरी वयाबरोबर शुक्राणूच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ़ होते.
मुलींना जसा मासिक पाळीचा अनुभव येतो तसा मुलांना देखील वीर्यपतनाचा अनुभव येतो, पण त्याविषयी क्वचितच मुले पालकांशी बोलतात. या बदलानमुळे मुलांपेक्षा मुलींमध्ये संकोचाची भावना निर्माण होते.
अशाप्रकारे या भागात आपण "पौगांडावस्था" पाहिली.
• भेटूयात पुढील भागात..
७. किशोरावस्था -
(कालावधी : १५ वर्षे पासून २१ वर्षे पर्यंत)

• कसा वाटला ब्लॉग...
• आवडला का...
धन्यवाद ! 🙏
• आवडला का...
• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा.
• फॉलो करा.
©सौ. सुचिता वाडेकर...✍️
२२.०४.२०२०
0 टिप्पण्या