Parenting is a very big chalange to everyone : पालकत्व निभावताना... (भाग-१) पालकत्वाचा प्रवास

 पालकत्व निभावताना... (भाग-१)


©सौ. सुचिता मिलिंद वाडेकर... ✍️

१४.०४.२०२०







खरं तर पालकत्वाचा हा प्रवास कुणासाठीही अगदी सहज, सोपा नसतोच मुळी. खूप आव्हाने येत असतात ती समजून शांत संयमित राहून त्यावर मार्ग काढनं म्हणजे तारेवरची कसरत असते.. यासाठी सहचारीसाथीची साथ खूप मोलाची ठरते.


लहानपणी झालेले संस्कार मधून मधून डोके वर काढत असतात, ते ओळखून स्वतःत आवश्यक बदल करणं ही पाहिजे तेवढी सोपी गोष्ट निश्चितच नसते. प्रत्येक माणूस कितीही मोठा झाला तरी रोज नव्याने काही ना काही शिकत असतो... आणि 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' या म्हणीचा पदोपदी अनुभव घेत असतो. वाढत्यावयानुसार येणारी प्रगल्भता माणसास खूप काही शिकवून जाते.


जन्मला आलेल्या प्रत्येकाला आयुष्याच्या या पुढील टप्यातून जावे लागते.. ज्याला मानवाच्या जीवन विकासावस्था म्हणतात.


• मानवाच्या जीवन विकासावस्था - 


१. जन्मपूर्वावस्था - गर्भधारणा ते जन्मापर्यंत

२. नवजातावस्था - जन्मापासून ते २ आठवडे

३. शैशवावस्था -  २ आठवडे ते २ वर्षे

४. पूर्व बाल्यावस्था - २ वर्ष ते ६ वर्षे

५. उत्तर बाल्यावस्था - ६ वर्षे ते १२ वर्षे

६. पौगांडावस्था - १२ ते १५ वर्षे

७. किशोरावस्था - १५ पासून २१ वर्षे पर्यंत

८. तारुण्यावस्था - २१ ते ४० वर्षे (पूर्व प्रौढअवस्था)

९. प्रौढ अवस्था(मध्यप्रौढअवस्था) - ४० ते ६० वर्षे पर्यंत

१०. वृद्धावस्था(उत्तरप्रौढअवस्था) - ६० ते मृत्यू पर्यंत



अशावेळी त्या व्यक्तीने स्वतः कडे त्रयस्थपणे बघून स्वतःला पडताळूून पहाणे आवश्यक ठरते.. कारण पालकत्व निभावताना वेळोवेळी स्वतःत बदल करता येण आवश्यक असते... कारण आपण इतरांना बदलू शकत नाही मात्र स्वतःमध्ये निश्चित बदल करू शकतो.


Parenting is a very big chalange to everyone : "पालकत्वाच्या प्रवासातील एक अवघड टप्पा" पौगांडावस्था


पालकत्व निभावताना मोडेन पण वाकणार नाही हे तंत्र आजिबात उपयोगी नाही आणि यासाठीच सजगता आवश्यक आहे. चूक झालीच तर काय चूक झाली, कधी झाली, कोणाची झाली, कशी झाली हे प्रश्न पडायला हवेत आणि त्याची उत्तरे शोधता आली पाहिजेत. उत्तरे शोधली की आपोआपच.. ok ठीक आहे.. काही हरकत नाही.. तुला तुझी चूक कळली आहे ना.. मग झालं तर.. पुन्हा प्रयत्न कर... यावेळी यश नक्की मिळेल. हा विश्वास आपण आपल्या पाल्याला देऊ शकू अशी खात्री वाटते.


पालकत्वाचा हा प्रवास खूप मोठा आहे.. याला खूप सारे कंगोरे आहेत मी केवळ एक उदाहरण दिले. मीही एका अकरा वर्षाच्या मुलीची आई आहे.. एकटं मुल असणं हे देखील एक पालकत्वाच्या प्रवासातील मोठे आव्हान आहे... सध्या आम्ही ते निभावतो आहोत.. अनेकदा ठेच लागतीये... त्यातून मार्ग काढत पुढे जायचेय.


सांगायचं तात्पर्य एवढंच की प्रत्येकाला या सगळ्या स्टेजेस मधून जावे लागते.. कोणतीही स्टेज सोपी नाही.. प्रत्येकीचे काही फायदे आहेत तर काही तोटेही. आपण मात्र पालकत्वाच्या या स्टेजमध्ये स्वतःचा संयम ढळू न देता सजग पालक बनण्याचा प्रयत्न करूयात.


लवकरच आपण मानवाच्या जीवन विकासावस्था सविस्तर पाहणार आहोत.


भेटूयात पुढील भागात.. 

१. जन्मपूर्वावस्था - गर्भधारणा ते जन्मापर्यंत.


• कसा वाटला ब्लॉग...

• आवडला का... 


• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 

• फॉलो करा. 


धन्यवाद ! 🙏 


©सौ. सुचिता वाडेकर...✍️

१४.०४.२०२०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या