Parenting : 'जन्मपूर्वावस्था' - गर्भधारणा ते जन्मापर्यंतचा गर्भाचा प्रवास... पालकत्व निभावताना... (भाग-२)

 पालकत्व निभावताना... (भाग-२) जन्मपूर्वावस्था - 

(गर्भधारणा ते जन्मापर्यंत)


©सौ. सुचिता मिलिंद वाडेकर... ✍️

१५.०४.२०२०


मागील भागात आपण "मानवाच्या जीवन विकासावस्था" कोणकोणत्या आहेत ते पाहिले..


खालील लिंकवर... ⤵️


पालकत्व निभावताना भाग - 1

१.जन्मपूर्वावस्था - 

(गर्भधारणा ते जन्मापर्यंत)








या भागापासून आपण "मानवाच्या जीवन विकासावस्था" सविस्तर पाहणार आहोत.  या भागात आपण पहिली अवस्था पाहणार आहोत.


१.जन्मपूर्वावस्था - 

(गर्भधारणा ते जन्मापर्यंत)


'जन्मपूर्वावस्था' म्हणजे गर्भधारणा ते जन्मापर्यंतचा गर्भाचा प्रवास. साधारणत: ९ महिने ९ दिवस असा हा कालखंड असतो,  त्यामुळे याला "जन्म पूर्व विकासाचा कालखंड" असेही म्हटले जाते.


• आता आपण या अवस्थेत काय घडते हे पाहणार आहोत...


गर्भधारणा होण्याने जीवनाला सुरुवात होते. स्त्रीजनन पेशी आणि पुरुषजनन पेशी यांच्या संयोगाने नवीन जीवन सुरु होते. स्त्रीजनन पेशीत २३ समान रंगसूत्रे जोडी असतात व पुरुषजनन पेशीत २२ समान व १ विषम असे २३ रंगसूत्रे जोडी असतात. लिंगनिश्चिती साठी २३ वी जोडी कार्य बजावते.


एका मासिकपाळीच्या चक्रात स्त्रीच्या दोन अंड ग्रंथिंपैकी एकीमधून एक बीजमोचन होते. दुसऱ्या मासिकपाळीच्या चक्रात दुसऱ्या अंड ग्रंथीमधून बीजमोचन होते.हे स्त्रीबीज अंडपेशी जवळच्या गर्भनलीकेच्या टोकाला असलेल्या झालरीच्या हालचालीमुळे नलीकेत शिरते. याला स्वतःची गती नसते. एकदा का स्त्रीबीज गर्भनलीकेत शिरले की ते पुढे ढकलले जाते.


• बीजमोचन पाळीच्या पाचव्या दिवसापासून २३ व्या दिवसापर्यंत कधीही होते.


• बीजमोचन पहिला टप्पा...


• स्त्रीबीज दुसरा टप्पा...


• फलन हा विकासाचा तिसरा टप्पा आहे.


स्त्रीबीज जेव्हा गर्भनलीकेत शिरते तेव्हा शुक्राणूशी त्याचा संयोग आला की फलन घडून येते. एकदा का रेतपेशीचा(शुक्राणू) अंडपेशी(स्त्रीबीज) संयोग झाला की अंडपेशीचा आकार असा काही बदलतो की दुसरे शुक्राणू त्यात शिरू शकत नाहीत.


रेतपेशीमध्ये(शुक्राणू) रंग सूत्रांच्या २२ समान जोड्या XX आणि २३ वी जोडी XY असते. लिंगनिश्चिती साठी पुरुषजनन पेशीतील २३ वी जोडी लिंग निश्चित करते... म्हणजे स्त्रीबिजातील XX जोडीशी पुरुष रेतपेशीतील XX चा संगयोग झाला तर मुलगी जन्माला येते आणि स्त्रीबिजातील XX जोडीशी पुरुष रेतपेशीतील XY चा संगयोग झाला तर मुलगा  जन्माला येतो... यानुसार अर्भकाचे लिंग निश्चित होते. एकावेळी एकच अर्भक जन्माला येते... क्वचित जुळी किंवा तीळी अर्भके जन्माला येतात.


गर्भधारणा होण्याने जीवनाला सुरुवात होते.

अंडपेशी(स्त्रीबीज) आणि रेतपेशीचा(शुक्राणू)  संयोग झाला की फलित पेशी तयार होते आणि तेथूनच मानवी गर्भाचे अस्तित्व सुरु होते. जन्म होई पर्यंत सामान्यत: ९ महिने ९ दिवस जातात या कालखंडालाच जन्मपूर्व अवस्था असे म्हणतात.


• "जन्म पूर्व विकासाचा कालखंड" या अवस्थेचे तीन भाग पडतात. 


१. अंडावस्था किंवा बिजावस्था 

२.भ्रूणावस्था

३. गर्भावस्था


१. अंडावस्था किंवा बिजावस्था -

(कालावधी : फलना पासून २ आठवडे)


जन्म पूर्व अवस्थेतील अतिशय लहान अशी ही अवस्था होय. टाचणीच्या टोकाएवढी लहान फलित पेशी दोन दिवस गर्भनलीकेतच असते. तिचे पोषण अंडपेशीतील द्रवाने होते. दोन दिवसांनंतर ही फलित पेशी गर्भनलीकेतून गर्भाशयाकडे मार्गकर्मण करते. तिसऱ्या दिवशी पेशी विभाजन क्रिया सुरु होते. पहिल्या दिवशी बीजाला ३२ पेशी असतात... दुसऱ्या दिवशी त्या दुप्पट होतात. आठवडा भरात १०० ते १५० होतात. गर्भधारणेनंतर जवळपास १० दिवसांनी बीजाचे गर्भाशयाच्या कडेला रोपन होते.


२.भ्रूणावस्था - 

(कालावधी : २ आठवडे पासून ८ आठवडे पर्यंत)


फलन झाल्यावर २ आठवड्यानंतर भ्रूणाची वाढ़ सुरु होते. ८ आठवड्यापर्यंतच्या या ६ आठवड्यात भ्रूणाची महत्वाची इंद्रीये व मूलभूत शरीररचना विकसित होते.


भ्रूणाला ३ स्तर असतात. 


१. बाह्यस्तर - यामध्ये बाह्यत्वचा, केस, दात, इंद्रीये, मेंदू,  मज्जा रज्जू तयार करतो.


२. अंतरस्तर - यामध्ये अंतर त्वचा स्तर,   पचन संस्था, यकृत, स्वादुपिंड व श्वसनसंस्था तयार करतो.


३. मध्यस्तर - हा स्नायू अस्थी रक्त आणि अभिसरण संस्था तयार करतो.


भ्रूण एक ते दीड इंच लांबीचा असतो. ८ आठवड्याचा भ्रूण छोटया माशाच्या शेपटी सारखा दिसतो. बारकाइने  पाहिल्यास डोळे,  नाक, कान यांच्या खुणा दिसून येतात. हातापायाच्या जागी फुगवटे दिसतात. भ्रूणावस्थेत मेंदू, डोळे यांच्यात खूप जलद गतीने वाढ़ होते. ५ व्या आठवड्यापासून दर मिनिटाला १,००,००० नसपेशी तयार होतात.


३. गर्भावस्था - 

(कालावधी : ८ आठवडे संपल्यापासून जन्मापर्यंत) 


या अवस्थेत कोणतेही नवीन अवयव तयार होत नाहीत परंतु गर्भाची वाढ़ झपाट्याने होते. गर्भाची लांबी २० इंचा पर्यंत वाढते. सुरुवातीला डोक्याचा भाग खूप मोठा असतो पण हळूहळू इतर अवयवांची वाढ़ झाली की डोक्याचा आकार कमी होऊ लागतो...  लहान वाटू लागते. या गर्भाच्या बहुतांश क्रियाही सुरु होतात. ३ महिन्याच्या गर्भाला गिळता येते,  शु करता येते. हातांना तळहात, तळहातांना बोटे,  बोटांना नखे येतात. गर्भाचे अस्तित्व मातेला समजू लागते. १६ ते २२ आठवड्याच्या दरम्यान गर्भाच्या हालचाली सुरु होतात. याशिवाय गर्भाला वळता येते, कोलांटी मारता येते, रडता येते, मुठी आवळता येतात,  डोळ्यांची उघडझाप करता येते आणि अंगठा चोखता येतो. मेंदूची वाढ़ देखील झपाटयाने होते.


• भेटूयात पुढील भागात..  


२. नवजातावस्था - (कालावधी : जन्मापासून ते २ आठवडे)


• कसा वाटला ब्लॉग...

• आवडला का... 


• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 

• फॉलो करा. 



धन्यवाद ! 🙏 


©सौ. सुचिता वाडेकर...✍️

१५.०४.२०२०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या