Marathi Katha "जगरहाटी" : प्रत्येक मुलीला एकदिवस आपलं घर सोडून सासरी जावं लागतंच.

जगरहाटी

#लघुकथा

© सौ. सुचिता वाडेकर…✍🏻️


आकाश काळ्या ढगांनी ⛈ भरून आलं होतं... जुईलीचं मन खूप अस्वस्थ होतं. तिला खूप रडावसं वाटत होतं.. 😭😭 डोळे भरून आले होते. तिने साऱ्या घरावर 🏡 नजर फिरवली.. जिथे ती लहानाची मोठी झाली होती.




कित्येकवेळा दुडुदुडु पळताना👭 तिची पावले या जमिनीने आपल्या अंगाखांद्यावर अलगद फुलासारखी झेलली होती. कित्येक गोष्टी ती दरवाजाशी.. खिडकीशी.. तिच्या रुमशी.. रुममधल्या प्रत्येक गोष्टीशी बोलली होती. बघता बघता चोवीस वर्ष कशी गेली तिलाच काय घरातील कुणालादेखील कळले नव्हते. तिचे डोळे भरून आले.. नकळत डोळ्यांनी आसवांना वाट मोकळी करून दिली. 😭😭


तिला काहीच कळत नव्हतं की असं का घडतंय. आपल्याला नेमकं दुःख कशाचं होतंय... सारखं रडू का येतंय.. काही केल्या काही कळत नव्हतं. एक हुरहूर मनाला लागून राहिली होती. तिची हि उलघाल तिचा बाबा आणि आईला कळत होती.. पण त्यांच्याकडेही शब्द नव्हते.. त्याचंही मन दाटून आलं होतं.





चार दिवस उरले होते जुईलीच्या लग्नाला... सगळी तयारी झाली होती... घरात नुसती गडबड धांदल सुरु होती... पण जुईलीच्या मनाची द्विधा मनस्थिती झाली होती. ज्या घरात ती लहानाची मोठी झाली.. हे माझं, ते माझं म्हणून हक्काने ती भांडली होती... ज्या घरावर माझं म्हणून तिनं निस्सीम प्रेम केलं होतं.. ते घर आता चार दिवसांनी तिच्यासाठी परकं होणार होतं. या घरात ती आता पाहुणी होणार होती. या विचाराने तिला आणखीनच रडू कोसळले... 😭😭



चार दिवसांनी ज्या घराला तिने पाहिलेही नव्हते अशा नवख्या घरात ती प्रवेश करणार होती... अगदी कायमची. त्या घरातील माणसांना तिला आपलं मानायचं होतं... अनोळखी लोकांना... ज्यांना कधी तिनं पाहिलं देखील नव्हतं अशा माणसांसोबत पुढचं सगळं आयुष्य एकटीला काढायचं होतं... आणि ज्यांच्या सोबत आतापर्यंतचं आयुष्य तिनं माझी माणसं म्हणून घालवलं... त्यांच्यासाठी ती आता पाहुणी होणार होती. या विचाराने ती ऑक्साबोक्षी रडू लागली. 😭😭 


का फक्त मुलींनीच आपलं घर सोडून निघून जायचं..? का त्यांनीच मनाला समजवायचं..? असे एक ना अनेक प्रश्न तिला सतावत होते. जुईलीला दोन भाऊ होते आणि ती एकटी होती म्हणजे बहीण नव्हती. ती तीघंच भावंडं.


लहानपणी केलेली मारामारी... सोबत खेळलेली भांडीकुंडी... समज आल्यावर जेवणासाठी एकमेकांची पाहिलेली वाट... रक्षबंधन... भाऊबीजे दिवशी  भावांचं केलेलं औक्षण.. भावाच्या मांडीवर डोकं ठेऊन पाहिलेला टीव्ही... सारं सारं तिला अस्वस्थ करत होतं.


माझं घर.. माझे आई वडील.. माझे भाऊ.. जे जे म्हणून तिला माझं वाटत होतं ते सर्व आता तिच्यासाठी परकं होणार होतं आणि या जाणिवेनं तिचं मन अगदी व्याकुळ झालं होतं.


तिच्या मनाची हि अवस्था पाहून तिचा बाबाही आणि आईही स्वतःच्या अश्रूंना आवर घालू शकले नाहीत.. निशब्द होते ते.  त्यांनीही तिला मनसोक्त रडू दिलं. तिच्या मनाची उलघाल तिच्या आईला कळत होती.


जुईलीच्या केसांवरून हात फिरवत तिची आई जणूकाही जुईलीचं मन जाणून बोलली,



"जग रहाटीच आहे बाळा, प्रत्येक मुलीला एकदिवस आपलं घर सोडून सासरी जावं लागतंच."


"मी नाही का आले इथे.. इथे आले अन इथली कधी झाले कळलेच नाही मला."


"एकेदिवशी तू आमच्या आयुष्यात असलीस अन आमच्या आयुष्याला खरा अर्थ प्राप्त झाला."


"मग मी मागे वळून कधी बघितलेच नाही आणि लग्नापूर्वीचं 'माझं घर'... 'माझं महेर' कधी बनून गेलं मलादेखील कळलं नाही."


"असंच असतं गं बायकांचं जीवन... त्याचा आनंद घ्यायचा.. आस्वाद घ्यायचा आणि इतरांनाही तो द्यायचा आपलं मानून.. मग बघ जीवन किती सुंदर आहे हे तुला लवकरच कळेल."


असं सासर सुरेख बाई.. खरंच या प्रेमाला उपमा नाही. असं प्रेम प्रत्येकीला मिळालं तर..!


आईचे हे बोल त्यावेळी फारसे जुईलीला कळले नाहीत.. पण आईच्या या समजवण्याने तिचे मन मात्र तिला भविष्यातील या सुंदर, सोनेरी स्वप्नांच्या खाईत घेऊन गेले.


तुमच्या बाबतीतही झालंय का असं..?


तुम्हाला देखील तुमचं घर सोडून येताना अशीच हुरहूर वाटली होती..?


तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा


मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट पहातेय 


तुम्हाला माझी हि कथा आवडली तर जरूर शेअर करा पण माझ्या नावासहित. 


•कारण साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.


धन्यवाद! 🙏🏻

© सौ. सुचिता वाडेकर…✍🏻️ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या