'भरलं वांगं'
माझं माहेर सातारा जिल्यातील वाई तालुक्यातील ओझर्डे हे गांव. त्या काळी पाच हजार लोकवस्तीचे असेल... तेथील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा होता. त्यामुळे सर्वांचा दिवस लवकर उगवायचा. सकाळी अकरा वाजले की गावात शुकशुकाट पसरत असे ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत. पाच नंतर मात्र पुन्हा लगभग सुरु व्हायची ते रात्री आठवाजे पर्यंत. रात्री आठ नंतर पुन्हा सगळीकडे सामसूम व्हायची. माझ्या माहेरी रोज ताजी भाजी मिळायची.
रोज संध्याकाळी मंडई भरायची, 4 वाजले की गावातील शेतकरी शेतातील ताजी भाजी घेऊन विकायला यायचे. त्यामुळे सर्व पालेभाज्या, फळभाजा ताज्या मिळायच्या. वांगी, गवार, दोडके, मेथी, शेपू, चाकवत, कोथिंबीर, पोकळा अगदी फ्रेश असायचे. त्यामुळे गावातील लोकांना त्यावेळी फ्रीज ची कधी आवश्यकता भासलीच नाही.
मसाला भरलेली भरली वांगी माझ्या विशेष आवडीची. माझी आजी आणि आई खूप छान बनवायची भरली वांगी. सखींनो, अशी ही आजी आणि आई कडून शिकलेली भरली वांगी आज तुमच्यासाठी...
Mother's Day : "आगळावेगळा मातृदिन" लेकीने दिले मला एक दिवसाचे माहेर.
"सातारी भरलं वांगं"
साहित्य :
•वांगी - पाव किलो
•लसूण - 5-6 पाकळ्या
•खोबरे - पाव वाटी
•कोथिंबीर
•तेल - 3 Tbs
•हिंग - पाव Tsp
•हळद - पाव Tsp
•कांदा लसूण मसाला - 2Tbs
• लाल तिखट - 1Tsp
•दाण्याचा कूट - अर्धी वाटी
•मीठ - आवश्यकतेनुसार
Marathi Recie : सातारी भरलं वांगं |
कृती :
1. मध्यम आकाराची किंवा त्याहून थोडी छोटी वांगी पावकिलो घ्यावीत. वांग्याचा पाठीमागील देठ अर्धा कापून वांग्याला उभा आडवा छेद द्यावा आणि हि वांगी मिठाच्या पाण्यात ठेवावीत म्हणजे काळी पडत नाहीत.
2. लसूण, खोबरे, कोथिंबीर पाट्यावर (मिक्सर) वाटून घ्यावेत. कढईत थोडे जास्तीचे तेल घालून त्यात हिंग, हळद, लसूण+खोबरे+कोथिंबीरीचे वाटलेले वाटण घालून थोडे परतावे.
Evening Breakfast : गरमा गरम 'बटाटे वडा' आणि गरमागरम 'वडापाव'
3. कांदा लसूण चटणी (काळा मसाला) घालावा, मीठ व दाण्याचा कूट घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतावे. यानंतर यातील थोडे वाटण वांग्यात भरून वांगी मसाल्यात सोडावी आणि थोडेसे पाणी घालून झाकण ठेवावे.
4. पंधरा मिनिटांनी वांगी शिजली की गॅस बंद करावा आणि ही डिश गरम गरम भाकरी सोबत सर्व्ह करावी, 'भरलं वांगं' !
संत बहिणाबाई चौधरी : "हृदयाचा हृदयाशी संवाद" याचे धावते समालोचन..."
टीप : हे मसाला वांगं तुम्ही छोट्या कुकर मध्येही करू शकता. सर्व साहित्य परतल्यावर थोडंसं पाणी घालून कुकरचं झाकण लावून एक शिट्टी झाली की गॅस बंद करावा.
• कशी वाटली रेसिपी आवडली का..
• मग तुम्हीही बनवणार नां..
•बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा.
•रेसिपी आवडली तर जरूर शेअर करा पण नावासहित कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
धन्यवाद! 🙏🏻
© सौ. सुचिता वाडेकर…✍🏻️
0 टिप्पण्या