Mother's Day : "आगळावेगळा मातृदिन" लेकीने दिले मला एक दिवसाचे माहेर.

"आगळावेगळा मातृदिन...!"

#आठवण 

©सौ. सुचिता वाडेकर...✍️



दरवर्षी मे महिन्याचा दुसरा रविवार सर्वत्र मातृदिन म्हणून साजरा केला जातो. ११ मे २०२० चा मातृदिन माझ्यासाठी संस्मरणीय ठरला...  अगदी सुवर्णाक्षरात कोरून ठेवावा ना अगदी तसा. आदल्या रात्री माझ्या लेकीने 👧 सांगितले कि उद्या आई आपण रोल प्ले करूयात.. म्हणजे उद्या मी आई होणार 👩‍आणि तू मुलगी...👧 तू काही काम करायचे नाहीस.. सर्व जेवण मी बनवणार. सकाळचा नाष्टा, 🍜दुपारचे जेवण,🍛 संध्याकाळचा नाष्टा ☕️आणि रात्रीचे जेवण 🥪 अगदी सर्वकाही. 


तू तुझा मोबाईल 📱 घेऊन सोफ्यावर बसायचं.. उद्या तुला मोबाईल📱साठी फुल परवानगी. मलापण गंमत वाटली...😀 तसे लॉकडाउनच्या ती काळात बरीचशी कामे स्वतःहुन करू लागली होती. देवपूजा, लिंबू🍹 सरबत, संध्याकाळचा चहा,☕️ मॅगी,🍜 लसूण सोलणे,🧄 अमरस बनवणे🥭 आणि कलिंगड कापणे🍉 हे तर तिचे आवडते काम.. शिवाय मी काही बनवत असताना मध्ये मध्ये लुडबुड असायची ती वेगळीच.


बऱ्याचदा पोळ्या 🍪करायच्या असायच्या तिला पण इतर कामे आल्याशिवाय पोळ्या नाही करायच्या असे तिला निक्षून सांगितले होते, त्यामुळे मातृदिनाची ही संधी तिला सोडायची नव्हती. मग मीही सांगितले कि मीही उद्या उशिरा उठणार, मला आजिबात उठवायचे नाही.. मग तीही माझ्या भूमिकेत गेली अन, 'हो गं राणी, नाही उठवणार'... असं म्हणाली आणि मला हसू आले. 😃


Marathi Recipe - Pav bhaji "पावभाजी" बिनाकांद्याची तुम्ही केलीत का कधी..?


असा हा सोनेरी दिवस उगवला अन सकाळी आठ वाजता चहा, ☕️नऊ वाजता मसाला मॅगीचा नष्टा 🍜समोर हजर झाला.. त्यात कांदा 🧅 बारीक चिरून घातला होता.. वरून लाल तिखटाची पेरणी आणि तुळशीचे पान 🍃 ठेवले होते.. खरंच खूप सुंदर चव होती..👌 नेहमी पेक्षा वेगळी. सगळी आवरा-आवर तिने आणि तिच्या बाबाने केली.. कारण मला स्वयंपाक घरात जायला बंदी होती. 🚷


मी माझं आवरून देवपूजा केली अन माझ्या लेकीने मोबाईल📱घेऊन मला हॉल मध्ये बसवलं. खरं तर मला चैन पडत नव्हता पण काही पर्याय नव्हता. तसे आदल्या दिवशीच तिचा जेवायला काय बनवायचे हा बेत ठरलेला होता. आंबे 🥭🥭 घरात होते त्यामुळे आमरस पोळी फिक्स झाली.. फ्रिज मध्ये चिरलेला कोबी होता... तिला कोबीची भाजी आवडत नाही म्हणून तिने कोबीची भजी करायच ठरवलं... सोबतीला पापड आणि वरण भात. रात्री मळलेली कणिक फ्रिज मध्ये होती त्यामुळे फक्त पोळ्या 🍪करायच्या होत्या.


मधून मधून माझ्या इन्स्ट्रक्शनस चालू होत्या.. कोणती तयारी कधी करायची म्हणजे सोपे जाईल वगैरे वगैरे. त्यानुसार तिने आमरस आधी करायला घेतला... आमरस तिला येतो कारण तीन चार वेळा आमरस तिने बनवला होता.. त्यानुसार तीच आवरून आकरा वाजता तिने आमरस करायला घेतला, आमरस करून तो झाकून तिने फ्रिज मध्ये थंड होण्यासाठी ठेवला. एका आंब्याचा ज्यूस बनवला अन १२ वाजता मँगो ज्यूसचा ग्लास समोर हजर. मस्त टेस्टी होता.


Mother's Day मातृदिन_स्पेशल : चॉकलेट_केक


आता खरी कसोटि होती. मला चैन पडत 🙃 नव्हते.. तिला आता भजी बनवायची होती.. मी म्हटलं, 'त्या आधी वरण भाताचा कुकर लाव..' कसा लावायचा तिला प्रश्न पडला.. 🤔 मग माझ्या सांगण्यानुसार करायच ठरलं.. पण मी कशालाही हात लावायचा नाही या अटीवर बरं. मी ही निश्वास सोडला, 😅 आणि तिला वरण भात कुकरला कसा लावायचा ते स्टेप बाय स्टेप सांगू लागले आणि त्यानुसार ती करू लागली.


कुकर मध्ये डब्बे ठेवताना मात्र तिची पंचाइत झाली..  काही केल्या तिला ते जमेना..  मग तिला विचारलं, 'मी दाखवू का तुला'... त्यावर ती हो म्हणाली.. मग कुकर तिने गॅस वर ठेवला. 'दोन शिट्या झाल्यावर गॅस बारीक करून १५ मिनिटांनी बंद कर' असे सांगून आता भजी साठी पीठ मळून घ्यायला सांगितले. सर्व काही आज्ञाधारकपणे चालू होतं.. काय काय लागते ती सर्व तयारी माझ्या सांगण्यानुसार तिने केली.


तोपर्यंत कुकरच्या दोन शिट्या झाल्या... तिने कुकरचा गॅस बारीक केला. कोबी चिरलेला होता.. त्यात एक कांदा आणि ३-५ मिरच्या  चिरून घातल्या.. मीठ, हिंग-हळद  सांगण्यानुसार घालून झाकून ठेवून दिले. कुकरचा गॅस बंद करायला अजून ५ मिनिटे होती म्हणून, 'थोडा वेळ बस, मग पोळ्या करायला घे' सांगितले. मला आश्चर्य वाटत होते.. 😇


Women's Day Special : महिलादिन विशेष


पोरगी आज्ञाधारकपणे सगळं ऐकत होती. जे जे मी सांगत होते त्याप्रमाणे सर्व करत होती. बरं झालं नाहीतर आज काही खरं नव्हतं.😜 ५ मिनिटे झाल्यावर तिने कुकरचा गॅस आठवणीने बंद केला. मग तिला पोळ्या करण्यासाठी काय काय तयारी करायची ते सांगितले... त्यानुसार तिने सर्व तयारी केली.  पहिली पोळी लाटली.. वाकडी तिकडी झाली.. पोळपाटाला चिकटली.. मग ती मोडून पुन्हा दुसरी बनवली.


आता मात्र लाटण्याचा हलकेच दाब देत होती.. पोळी थोडी जाड होती पण पुन्हा चिकटेल म्हणून तिने पातळ लाटली नाही.. मी भाजून घेऊ का विचारले, पण ती नाही म्हणाली.. मग तिला उलथने घेऊन त्याने भाजायला सांगितले. तिला ते सोपे गेले.. दोन्ही बाजूने तेल लावून खरपूस पोळी भाजली मग दुसरी पोळी लाटली.. मग ती भाजली. याचा व्हिडीओ खाली पहा. इतक्यात एक फोन आल्यामुळे  मी फोनवर 📱बिझी झाले... माझे फोनवरील संभाषण संपेपर्यंत तिच्या सहा पोळ्या 🍪 लाटून भाजून झाल्या देखील.






आता ओटयावरील सर्व कसं आवरून ठेवायच.. ओटा कसा पुसून घ्यायचा हे सांगितले त्यानुसार तिने सर्व केले. आता मोर्चा भजीच्या पिठाकडे वळवला. कोबी मध्ये बेसन पीठ मिसळून भजीचे पीठ कसे भिजवायचे ते सांगितले.. त्यानुसार तिने केले. गॅसवर एका कढइत तेल तापत ठेवले... "पापड तळू का मम्मा..? " तिने अनपेक्षितपणे विचारले. "ठीक आहे, मग आधी पापड तळून घे, मग भजी तळ" असे सांगितले.. त्यानुसार चिमटयाच्या साहाय्याने तिने पापड तळले.






लेकीचा उत्साह, आणि निश्चय पाहून तिचे बाबाही 👨तिच्या मदतीला आले. भजी बनवेपर्यंत आर्याच्या बाबांनी सांगितल्यानुसार वरण बनवलं.. अर्थात माझी प्रत्यक्ष मदत दोघांनीही 🚫 नाकारली. दोघेही सगळं ऐकत होते.. मलाही छान वाटत होतं. 


चला स्वयंपाक रेडी झाला तस मीच हुश्श..  केलं. ताट मी भरू का विचारले पण माझी लेक नाही म्हणाली. मग तिनेच तीन ताटे बनवली... देवाला नैवेद्य दाखवला आणि नैवेद्याचे ताट माझ्या पुढ्यात आणून ठेवले, सोबत पाण्याचा ग्लासही दिला. पहिला घास घेई पर्यंत लेक कसं झालंय हे पहायला तिथेच उभी होती.🙄 अगदी माझ्यासारखी.. 😉 कसं  झालंय विचारायला... पहिला घास घेतला अन तोंडातून शब्द बाहेर पडले... 'वा! एकदम सुंदर!' 👌👌 तसा तिचा जीव भांड्यात पडला. 😍😍


आर्याने बनवलेले जेवण 



आम्ही सगळे मनसोक्त पोटभर जेवलो.🤗🤗 तोपर्यंत दुपारचे दोन वाजले होते. माझी रवानगी पुन्हा हॉल मध्ये झाली. जेवणानंतर सगळी आवरा-आवरी तिने आणि तिच्या बाबाने केली. उरलेलं अन्न फ्रिज मध्ये ठेवून.. भांडी घासून गॅस ओटा अगदी चकाचक करून  ठेवला. चकाचक ओटा पाहून तर माझं मन भरून आलं. 😱🤗😍





आज मी खूप खुश होते.. 😍😍 जणू सर्व सुख माझ्या पायाशी लोळण घेत होतं. तुम्ही कल्पना करा... याहून आणखी दुसरं काय हवं असतं एका आईला. ☺️☺️ खरं तर आर्या पूर्ण स्वयंपाक एक दिवस एकटी ने करण्यासाठी खूप लहान आहे.. नुकतीच आकरा वर्षांची झालीय... पाचवीतून सहावीत गेलीय, पण तिच्यात मी काल एक जबरदस्त इच्छाशक्ती पाहिली... म्हणतात ना की तुम्ही एखादी गोष्ट मनापसून ठरवलीत तर ती पूर्ण करण्यासाठी सारी कायनात भी तुमच्या पाठीशी उभी राहते. ✌️✌️अगदी तसच काहीस.


Manogat : मनोगत Lock down Days : दिवस लॉकडाउनचे


संध्याकाळी चहा ☕️सोबत भेळ पुढ्यात आली.. भेळ साठी लागणारी हिरवी चटणी फ्रिजर मध्ये होती.. ही सवय माझ्या बहिणीमुळे 👩 मला लागली. पुदिना जुडी आणली की त्याची हिरवी चटणी करून फीजरला ठेवायची जेणेकरून कांदा🧅 टोमॅटो🍅 चिरला की पटकन भेळ तयार होते. चिंचेची चटणी मात्र कशी करायची हे विचारून घेऊन त्याप्रमाणे केली अन माझ्या लेकीने भेळ बनवली.


चहाची ☕️ जबाबदारी मात्र तिने तिच्या बाबावर सोपवली कारण जसा लॉकडाउन सुरु आहे तसा संध्याकाळचा चहा☕️ तीच करत आलीय.. त्यामुळे आज तिला चहाला सुट्टी मिळाली. भेळचा फोटो मात्र काढायचा राहून गेला. 🤭😔


यानंतर आदल्या दिवशी आर्याच्या हट्टानुसार मी बनवलेला 🎂 रवा केकचा 'मदर्स डे केक-कटींग प्रोग्राम' पार पडला..






आदल्या दिवशी बनवलेलं एक छानसं ग्रीटिंग तिने मला दिले. मला फुलपाखरू🦋 आवडते, त्यामुळे ग्रीटिंगच्या मध्यभागी फुलपाखराचा आकार कट करून त्यावर तिच्या माझ्याविषयीच्या भावना लिहिल्या होत्या…


"You are the bird who fly in the sky of Beauty & Love..."   "Mom, I love you very much!"


तुम्ही समजू शकाल माझ्या भावना... हे वाचून माझ्यासाठी स्वर्ग जणू दोन बोटे उरला होता.😍😍😘😘


आता शेवटचा टास्क आला होता तिच्यासाठी.. "व्हेज सॅन्डविच".🥪 आदल्या दिवशी ठरवलेल्या मेनूनुसार तिच्या बाबांनी सकाळी ब्रेड आणला होता.. काकडी-टोमॅटो🥒🍅 फ्रिज मध्ये होते त्याची साले काढून तिने स्लाइस बनवले.. हिरवी चटणी ही होतीच.. टोमॅटो सॉस आणि बटर देखील होते.






व्हेज सॅन्डविच तिला बनवायला येत असल्यामुळे संध्याकाळचा हा मेनू आम्ही निवडला होता. त्यामुळे यासाठी मला काही सूचना द्याव्या लागल्या नाहीत. अर्थात आर्याला आवडही आहे वेगवेगळे पदार्थ बनवण्याची आणि खाण्याची देखील त्यामुळे हे सर्व जमून आले.



Made by Aarya Wadekar 



थोडयाच वेळात अगदी प्रेझेंटेन्शनसहित डिश समोर हजर झाली. आजचे सॅन्डविच तर खूपच टेस्टी लागत होतं. आमचं जेवण झालं मग बाप लेकीने सर्व व्यवस्थित आवरलं.. मात्र दिवस भरात मला काहीही करू दिले  नाही.


आता मात्र दिवसभराचा शीण लेकीला जानवू लागला तशी ती म्हणाली, "मी खूप दमलेय.. माझे पाय खूप दुखत आहेत.. आता मी झोपणार आहे आणि उद्या मला कोणीही लवकर उठवायचं नाही"... हे तिच्या बाबांसाठी होतं..😃 असे म्हणत अंथरुणावर आडवी झाली.


आता माझ्यातील आई जागी झाली.. हलकेच तिचे पाय चेपून दिले, तसं माझं पिल्लू पटकन झोपी गेलं. 😴😴 मी मात्र डोळेभरून तिच्याकडे पहात होते.. नकळत्या वयात मोठ्यांपेक्षाही किती प्रेमळ आणि समंजस वागली होती.


या लहान वयात  एक दिवसाचं माहेरपण तिने मला दिल होतं... ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी मनोमन ईश्वराचे 🙏🙏 आभार मानले आणि माझ्या पिलाला धन्यवाद दिले. 😘😘


तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का..? या रोल प्लेमुळे नकळतपणे आर्यावर खूप सारे संस्कार झालेत... याची पुंजी तिला आयुष्यभर पुरेल.


• मला सगळं येत असं नेहमी म्हणणाऱ्या आर्याला हे वाटतं तेवढं सोपं नाही हे प्रत्यक्ष कृती करताना जाणवलं.


• कोणतीही गोष्ट करताना पूर्व तयारी किती महत्वाची असते त्यामुळे आपली काम पटापट होतात हे तिला आज कळले.


• दिवसभर काम करून रात्री अंथरूनावर पडल्यावर आईचे पाय का दुखतात हे तिला कळलं आणि माझ्याविषयीच प्रेम अजून वाढलं.


• वेळ पडली तर स्वतःचे स्वतः करून खाण्यासाठी तरी काही गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि ते आवश्यक आहे हे तिच्या बाबांना जाणवले.


• अकरा वर्षाच्या एकुलत्या एक मुलीला वळण कसं लावू हा मला पडलेला प्रश्न आपोआप निकालात निघाला.


• भविष्यात आणखी बरंच काही कृतीतून दिसून येईल याची आता खात्री वाटते.


• या दिवसाचे कॅमेरामध्ये टिपलेले काही क्षण "फोटो" मध्ये बंदीस्त केलेत.. ते तुमच्यासाठी पाठवत आहे.


• नक्की पहा आणि तुमचा अभिप्राय कळवा.


• तुमचे कौतुकाचे चार शब्द माझ्या लेकीचा  आनंद द्विगुणित करतील... धन्यवाद! 🙏🙏


• ११ मे २०२० च्या मदर्स डे ची ही आठवण तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा.


• ब्लॉग आवडल्यास फॉलो करा, शेअर करा पण माझ्या नावासहित.


धन्यवाद! 🙏🏻

©सौ. सुचिता वाडेकर...✍️




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या