Marathi Recipe : करा मिश्र भाज्यांचे पोष्टिक आप्पे. झटपट होणारे हे आप्पे मुलेही खातील अगदी आवडीने

 मिश्र भाज्यांचे पोष्टिक आप्पे

©सौ. सुचिता वाडेकर...✍🏻️



मिश्र भाज्यांचेपौष्टिक आप्पे 




तुमचा असं कधी झाले का की एखादा पदार्थ करताना तो जास्त झाला आणि उरलेला ठेवून दिला जातो फ्रीजमध्ये आणि मग तो उरलेला पदार्थ  दुसऱ्यादिवशी नाश्त्यासाठी सर्वांना पुरेसा नसतो मग काय करायचे? तोही वाया घालवायचा नसतो आणि तो तसाच ठेवून दुसरा ही करायचा नसतो.


माझेही परवा असेल झाले. लेकीला पोळी-भाजीचा कंटाळा आला म्हणून ती म्हणाली की आई आज इडली सांबर कर ना मी म्हटलं ठीक आहे.. सर्वांनाच आवडते.. सासऱ्यांना हे चालते म्हणून मग इडली सांबर बनवले.


पुरेशा इडल्या झाल्यावर उरलेले पीठ फ्रिजमध्ये ठेवून दिले. दुसऱ्या दिवशीच्या नाष्टा साठी  ते पीठ  पुरेसे नव्हते. आता काय करायचे... ते पीठ पण वापरायचे होते आणि नाश्ता ही बनवायचा होता.  मग विचार केला आणि फ्रीजमधील भाज्या बाहेर काढल्या.. फ्लॉवर, कोबी, गाजर, मटार, टोमॅटो, सिमला मिरची इत्यादी भाज्या होत्या. सगळ्या भाज्या थोड्या थोड्या घेऊन बारीक चिरून घेतल्या.. एक कांदाही बारीक चिरला.


चिरलेल्या सर्व भाज्या उरलेल्या इडली पीठात घातल्या.. वरून अर्धी वाटी तांदळाचे पीठ आणि डाळीचे पीठ घातले. तांदळाचे पीठ माझ्याकडे नेहमी असते वेळ प्रसंगी ते उपयोगी पडते त्यामुळे दळणा बरोबर एक किलो तांदूळ ही दळून आणत असते.


Marathi Recipe - Maharashtrian Veg Satvik Thali : महाराष्ट्रीयन 'व्हेज सात्विक थाळी' स्पर्धा


तीन-चार हिरव्या मिरच्या घेऊन मिक्सरला फिरवल्या आणि पिठात घातल्या, मीठ घातले, अर्धा चमचा इनो घातला आणि त्या पिठाचे आप्पे बनवले. एकदम मस्त झाले, लेकीला सासऱ्यांना खूप आवडले हे आप्पे. या आप्यांबरोबर बरोबर सर्व भाज्या ही पोटात गेल्याचे समाधान मिळाले. मुलांनी भाज्या खाल्यावर मिळणारे समाधान आपल्या आयांना  खूप मोठे असते हो ना!


मग बनवणार ना तुम्हीही मिश्र भाज्यांचे पोष्टिक अप्पे.. जरूर बनवा आणि प्रतिक्रिया द्या. हे आप्पे अगदी झटपट बनतात. दिसतात ही मस्त रंगीबिरंगी.


• चला तर मग पाहुयात यासाठी लागणारं साहित्य आणि कृती



मिश्र भाज्यांचे पौष्टिक आप्पे 

Evening Snacks : गरमा गरम 'बटाटे वडा' आणि गरमागरम 'वडापाव'


करा मिश्र भाज्यांचे पोष्टिक आप्पे. झटपट होणारे हे आप्पे मुलेही खातील अगदी आवडीने..


साहित्य :


• इडली पीठ अंदाजे तीन वाटी

• बेसन पीठ  अर्धी वाटी

• तांदळाचे पीठ अर्धी वाटी

• सिमला मिरची एक

• कांदा एक

• टोमॅटो एक

• गाजर एक

• फ्लावर छोटा तुकडा

• कोबी अर्धी वाटी

• मटार छोटी वाटी

• हिरव्या मिरच्या चार ते पाच

• मीठ आवश्यकतेनुसार

• इनो अर्धा चमचा


कृती :


1. प्रथम सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात.


2. एका मोठ्या पातेल्यात उरलेले इडली पीठ घेऊन त्यात सर्व चिरलेल्या भाज्या घालाव्यात.


3. नंतर त्यात डाळीचे पिठ तांदळाचे पीठ घालावे.


4. हिरवी मिरची मिक्सरला फिरवून त्यात घालावी.


5. आवश्यकतेनुसार पाणी घालून बॅटर तयार करावे.


Marathi Recipe : Sabudana Khichadi : खिचडीसाठी साबुदाणा भिजवण्याची एक सोपी पद्धत


6. नंतर यात इनो घालून त्यावर थोडे पाणी घालावे व ते पिठात घालावे.


7. यानंतर मिश्रण एकसारखे हलवून घ्यावे आणि त्याचे आप्पे बनवावेत.


8. आप्पेपात्रात थोडे तेल घालून त्यात चमच्याने पीठ सोडावे.


9. त्यावर दोन मिनिटांसाठी झाकण ठेवावे गॅस मध्यम आचेवर ठेवावा.


10. दोन-तीन मिनिटांनी झाकण उघडून आप्पे चमचा च्या साह्याने पलटी करावे.


11. आप्पे दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्यावेत आणि टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे.


12. आपले मिश्र भाज्यांचे झटपट होणारे आप्पे तैयार!



मिश्र भाज्यांचे पौष्टिक आप्पे 




Letter to God : प्रभूस पत्र...

टीप : हे आप्पे बनवण्यासाठी तुम्ही फक्त इडली पीठ देखील वापरू शकता.


• कशी वाटली रेसिपी..

• आवडली का..


• मग तुम्ही बनवा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.


• आणि हो रेसिपी आवडल्यास जरूर शेअर करा.. पण माझ्या नावासहित.

• कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

धन्यवाद! 🙏🏻

©सौ सुचिता वाडेकर...✍🏻️


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या