Marathi Recipe : "कोहळा बर्फी" कोहळा आहे आरोग्यासाठी फायदेशीर, वात-पित्त कमी करणारा. पहा कोहळा खाण्याचे फायदे..

"कोहळा बर्फी"

कोहळा आहे आरोग्यासाठी फायदेशीर, वात-पित्त कमी करणारा.

©सौ. सुचिता वाडेकर..✍🏻️




Marathi Recipe : "कोहळा बर्फी"
कोहळा आहे आरोग्यासाठी फायदेशीर,
वात-पित्त कमी करणारा. पहा कोहळा खाण्याचे फायदे.. 


* पहा कोहळा खाण्याचे फायदे.. 

कोहळा हा आरोग्यसाठी खूप फायदेशीर असून गुणकारी व वात-पित्त कमी करणारा आहे. आयुर्वेदानुसार कोहळा हा शीत व स्निग्ध गुणांचा असून बुद्धिवर्धक व बल वाढवणारा आहे. कोहळा मध्ये जीवनसत्त्वे विटामिन्स आणि खनिजे मिनरल्स मुबलक प्रमाणात आढळतात. कोहळा मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते तसेच फायबरचे ही प्रमाण भरपूर असते.


कोहळा खाण्याने आम्लपित्ताचा त्रास कमी होतो व त्यातील फायबर्स मुळे पोट साफ होण्यास मदत होते. मूळव्याधीचा त्रास असेल तर तोही कोहळा खाण्याने कमी होतो. कोवळ्या मध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे कोहळा खाण्याने हृदयविकाराचा धोका कमी होते. कोहळा हा शितल असल्यामुळे कोहळा रस पिल्याने उष्णतेचा त्रास कमी होतो. मुलांना रोज सकाळी कोहळा रसामध्ये दोन चमचे मध घालून पिण्यास दिल्यास मुलांची स्मरणशक्ती वाढते; त्यामुळे कोहळ्याचा आहारात जरूर समावेश करावा. कोहळ्यापासून थालीपीठ, पराठा, हलवा, भाजी, सूप, ज्युस तसेच बर्फी आदी पदार्थ बनवता येतात. • आता आपण कोहळ्याची बर्फी कशी बनवावी ते पाहूयात..


Marathi Recipe : "कोहळा बर्फी"
कोहळा आहे आरोग्यासाठी फायदेशीर,
वात-पित्त कमी करणारा. पहा कोहळा खाण्याचे फायदे.. 


"कोहळा बर्फी"

साहित्य : • कोहळा अर्धा (किस २ वाटी) • साखर १ वाटी • वेलची पूड १ चमचा • ड्रायफ्रूट्स सजावटीसाठी • तूप ३ चमचे Family is most important in our life : बंध नात्यांचे....
कृती : १. प्रथम कोहळ्याचे साल व बिया काढून उरलेला गर किसणीवर किसून घ्यावा. २. हा किस हाताने पिळून त्यातील पाणी बाजूला काढावे व या पाण्यात दोन चमचे मध टाकुन ते पिऊन टाकावे. ३. गॅस वर एका कढईत दोन चमचे तूप घालून कोहळा किस २ ते ३ मिनिटे परतून घ्यावा. ४. यानंतर यात एक वाटी साखर घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत रहावे. ५. मिश्रण घट्ट होत आले की यात वेलची पूड घालावी. ६. यानंतर एका ताटाला एक चमचा तूप लावावे व कढईतील मिश्रण ताटामध्ये ओतावे आणि चमच्याच्या साह्याने एक सारखे करावे.

Evening Breakfast : गरमा गरम 'बटाटे वडा' आणि गरमागरम 'वडापाव' ७. वरुन ड्रायफ्रूट्स पेरावेत व थंड झाल्यावर वड्या कापाव्यात. • आपली आरोग्यदायी "कोहळा बर्फी" तयार झाली.



Marathi Recipe : "कोहळा बर्फी"
कोहळा आहे आरोग्यासाठी फायदेशीर,
वात-पित्त कमी करणारा. पहा कोहळा खाण्याचे फायदे.. 

• कशी वाटली रेसिपी आवडली का..


• मग तुम्हीही बनवणार नां..


•बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा.


•रेसिपी आवडली तर जरूर शेअर करा पण नावासहित कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे. 


धन्यवाद! 🙏🏻

© सौ. सुचिता वाडेकर…✍🏻️



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या