Summer Recipe : Virgin_Mojito Simple Recipe मुलांनाही सहज बनवता येईल असे पेय..

 #Virgin_Mojito

#summercoolers


•मुलांनाही सहज बनवता येईल असे पेय..

Summer Recipe : Virgin_Mojito



व्हर्जिन मोजीतो जेव्हा आपण हॉटेल मध्ये घेतो त्यासाठी आपल्याला 100 ते 150/- रुपये मोजावे लागतात... पण हेच पेय अगदी हुबेहूब घरी बनवले तर…! हे बनवायला अगदी सोपे आहे. साखर, पुदिना, लिंबू  हे साहित्य तर घरी असतंच.. एक स्प्राईट तेवढी विकत आणावी लागते. अगदी सिंपल रेसिपी आहे.. 50 - 60 रुपयात आपण घरातील सर्वजण मोजितो पिऊ शकतो. 


तुमच्या घरी 10 -12 वर्षांची मुले असतील तर ते दिखील ही रेसिपी अगदी सहज बनवू शकतात. त्यांना जर तुम्ही सुट्टीत असा टास्क दिलात तर मुलांना देखील ते आवडेल आणि त्यांच्या सुट्टीतील अनुभवात आणखी एक भर पडेल.


Marathi Recipe : Veg Crispy 'व्हेज क्रिस्पी' तुम्ही कधी घरी बनवलीत का..? या पद्धतीने बनवा मुले होतील अगदी खुश !


माझ्या लहानपणी आम्ही भावंड उन्हाळ्याच्या सुट्टीत रसना बनवायचो. घरातील सर्वांना प्यायला द्यायचो. त्यावेळी घरातील मोठ्यांच्या चेऱ्यावर आमचं कौतुक आम्हला एक वेगळीच ऊर्जा देऊन जायचं. या वयातील मुलांना त्यांचं केलेलं कौतुक खुप आवडतं त्यासाठी ते मेहनत घ्यायला तयार असतात. मग वाट कशाची बघताय.. रेसिपी बघा अगदी सोपी आहे आणि मुलांनाही सांगा.


चला तर मग पाहुयात आपण याची साहित्य आणि कृती ...


Virgin_Mojito 


साहित्य :


● साखर 4 चमचे

● पाणी 4 चमचे

● पुदिना 5 ते 7 पाने

● लिंबू 1

● आइसक्युब 5

● स्प्राइट


मौनसंवाद..! तुम्ही कधी निर्जीव वस्तूंशी संवाद साधला आहे का..? मौनसंवादामुळे मला समजले भाज्यांचे अंतरंग !


कृती :


1. प्रथम शुगर सिरप बनवूयात.

एका बाऊलमध्ये चार चमचे साखर आणि तितकेच पाणी घेऊन साखर त्यात विरघळून घ्यावी. आपले शुगर सिरप तैयार झाले.


2. एका ग्लासमध्ये लिंबाच्या 2 फोडी, पुदिना 5 ते 7 पाने स्वच्छ धुऊन घालाव्यात आणि खलबत्याच्या बत्त्याने हलकेसे कुटावे.


3. यानंतर यात 2 ते 3 चमचे शुगर सिरप घालावे.


4. यानंतर यात 5 आइसक्युब घालावेत.


5. यानंतर यात स्प्राइट ओतावे आणि स्ट्रॉ घालून सर्व्ह करावे "व्हर्जिन मोजीतो"


•मग नक्की बनवणार ना छोट्या मित्रांनो 'व्हर्जिन मोजीतो..!'



Summer Recipe : Virgin_Mojito


Marathi Recipe - Maharashtrian Veg Satvik Thali : महाराष्ट्रीयन 'व्हेज सात्विक थाळी' स्पर्धा


बनवा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका..


•रेसिपी आवडल्यास जरूर शेअर करा..


•पण माझ्या नावासहित..


•कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.


धन्यवाद! 🙏🏻


©सौ. सुचिता वाडेकर...✍️



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या