Summer Recipe : मसालाताक रोज पिण्यासाठी उत्तम पाचक पेय

 "मसालाताक"

#summercoolers


© सौ. सुचिता वाडेकर..✍🏻️



Summer Recipe : मसालाताक
रोज पिण्यासाठी उत्तम पाचक पेय 


उन्हाळ्याच्या दिवसात रोज पिण्यासाठी उत्तम पाचक पेय म्हणजे मसाला ताक. रोजच्या आहारात ताजे दही, ताक असावे असे आयुर्वेद सांगते. रोज रात्री दही लावून दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणावेळी त्यात पाणी घालून रवीने चांगले घुसळावे... तयार झालेले हे द्रव्य म्हणजे ताजे ताक.


या ताकात मसाला घातला की ते एक उत्तम पाचक बनते. असे ताक रोज पिल्याने पोटाचे पचनशक्ती संदर्भातील आजार पळून जातात त्यामुळे आयुर्वेदात या ताकाला अतिशय महत्व आहे.


Marathi Recipe : Masala Bhendi मसाला भेंडी तुम्ही कधी सोलर कुकर मध्ये बनवलीत का..?


•चला तर मग पाहुयात या मसाला ताकाची साहित्य आणि कृती..



"मसालाताक"


साहित्य:


● ताजे दही - 2 कप

● पाणी - 3 कप

● जीरा पावडर - 1 चमचा

धनापावडर - अर्धा चमचा

● सैंधव मीठ - 1 चमचा

पादेलोन मीठ - आवश्यकतेनुसार



कृती :


1. प्रथम एका भांड्यात दही आणि पाणी घालून रवीने चांगले घुसळून घ्यावे.


2. यात जीरा पावडर, धनापावडर, सैंधव मीठ, पादेलोन मीठ  घालून चांगले हलवून घ्यावे.


3. थंड होण्यासाठी थोडावेळ फ्रीज मध्ये ठेवावे.


4. थोड्यावेळाने सर्व्ह करावे थंडगार 'मसाला ताक'.



Summer Recipe : मसालाताक
रोज पिण्यासाठी उत्तम पाचक पेय

निराधार, विकलांग बालकांचे संगोपन आणि पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने सोफोशने उचललेले पहिले पाऊल Sofosh : सोफोश' अनाथांचे माहेरघर



• रेसिपी आवडली का..


•मग तुम्हीही बनवणार नां..


•बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा.


•रेसिपी आवडली तर जरूर शेअर करा पण नावासहित कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे. 


धन्यवाद! 🙏🏻

© सौ. सुचिता वाडेकर…✍🏻️



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या