How to make Crispy Bombil Fry Recipe in Marathi l 'कुरकुरीत ओले बोंबील फ्राय' Simple Recipe



How to make Crispy Bombil Fry
Recipe in Marathi l
'कुरकुरीत ओले बोंबील फ्राय'  Simple Recipe 


 कुरकुरीत ओले बोंबील फ्राय


#nonveg 


#seefood 


       माझ्या सासूबाई 'मुरुड' च्या, त्यामुळे आमच्या घरी मच्छी बऱ्याचदा होत असे. सुरमई, पॉपलेट, कोळंबी, ओले बोंबील, शिंपले(शिवले), कालवं, चिंबोरी ... इ. मी मात्र पॉपलेट सोडला तर सर्व मच्छी लग्नानंतर प्रथमच पाहिली. यातीलच एक प्रकार म्हणजे 'बोंबील फ्राय'


बोंबील फ्राय बनवायला एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. नुसतेही खाऊ शकता किंवा पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता.  मासे जिथे मिळतात तिथे ते साफ देखील करून मिळतात त्यामुळे घरी आणले की लगेचच डिश तयार होते.


यासाठी फारसं साहित्य लागत नाही. तांदळाचे पीठ नसेल तर बारीक रवा घेतला तरी चालेल. एका वाफेत ते शिजतात. वरून तेल सोडून खरपूस भाजून घेतले की झाले बोंबील तयार! चाला तर मग पाहुयात याची झटपट होणारी रेसिपी.


Marathi Recipe : Chicken Paneer Roll "चिकन पनीर रोल" आहे हटके रेसिपी झटपट करा नोट


कुरकुरीत ओले बोंबील फ्राय


बोंबील फ्राय करण्यासाठी साठी लागणारं साहित्य.. ⤵️


•बोंबील पाव किलो

•हिंग पाव चमचा 

•हळद पाव चमचा

•लिंबू रस 1 चमचा

•लालतिखट 1 चमचा

•मीठ आवश्यक तेनुसार 

•तांदळाचे पीठ 2 चमचे 

•बारीक रवा 2 चमचे 

•तेल 4 चमचे


बोंबील फ्राय करण्यासाठी आवश्यक कृती.. ⤵️


प्रथम बोंबील स्वछ धुवून घावेत त्यानंतर त्यावर हिंग, हळद, लालतिखट, लिंबू रस, मीठ घालून चांगले मिक्स करून मॅरीनेट करण्यासाठी दहा मिनिटे ठेवून द्यावे.





Marathi Recipe : 'भरलं वांगं' सातारी भरलं वांगं


एका डिशमध्ये बारीक रवा आणि तांदळाचे पीठ घ्यावे. त्यात थोडे चावीपुरते लालतिखट आणि थोडे मीठ घालून मिक्स करावे.





दहा मिनिटांनतर गॅसवर तवा ठेवून 2 चमचे तेल सोडावे. यानंतर मॅरीनेट केलेला बोंबीलचा एक एक पीस घेऊन रवा आणि तांदळाच्या मिश्रणात घोळवून घ्यावा व तेल सोडलेल्या तव्यावर अलगद ठेवून द्यावा. याप्रमाणे बाकी पीस देखील रवा आणि तांदळाच्या मिश्रणात घोळवून तव्यावर ठेवून द्यावेत.





बाजूने एक चमचा तेल सोडून त्यावर झाकण ठेवावे. 3-4 मिनिटांनतर झाकण काढून बोंबील पलटी करून घ्यावेत. पुन्हा उरलेले एक चमचा तेल बाजूने सोडावे. आता मात्र यावर झाकण ठेऊ नये. पाच मिनिटांनी गॅस बंद करावा. आपले गरमागरम ओले बोंबील तैयार झाले. भाकरी किंवा पोळीसोबत सर्व्ह करावे 'ओले बोंबील..!'


How to make Crispy Bombil Fry
Recipe in Marathi l
'कुरकुरीत ओले बोंबील फ्राय'  Simple Recipe 



Marathi Recipe : How to make  - हरभऱ्याच्या वाळलेल्या पानांची भाजी

खुप मस्त लागतात. तोंडाला चव नसेल तर नक्की ओले बोंबील बनवा आणि पोटभर जेवून तृप्त व्हा.


• मग तुम्हीही बनवून बघणार ना कुरकुरीत बोंबील फ्राय


• तुमचा फीडबॅक द्यायला विसरू नका..


• आणि हो रेसिपी आवडल्यास fw करताना माझ्या नावासहित करा.


• अन्यथा कॉपी राईट कायद्याचा भंग होईल.


धन्यवाद..! 🙏🏻

©सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻️





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या