"चिकन पनीर रोल"
(CPPW)
C - Chicken
P - Paneer
P - Potato
W - Wheat Flour
©सौ. सुचिता वाडेकर...✍🏻️
Contest म्हणजे घरच्यांसाठी पर्वणीच असते.... असेच एका contest साठी "चिकन पनीर रोल" (CPPW) बनवले. त्यामुळे घरची मंडळी एकदम खुश…! 😍😍 लेक तर म्हणाली, "मम्मा, तू असाच काँटेस्ट मध्ये भाग घेत जा म्हणजे आम्हाला वेगवेगळ्या रेसिपी खायला मिळतील. 😁
तशी वेगवेगळ्या रेसिपी बनवायची आवड आहे मला, परंतु या काँटेस्टमुळे एक वेगळंच फिलिंग येतं. तुम्हीही ते कधी अनुभवलं असेल तर माझे म्हणणे पटेल तुम्हाला. 😍
नेहमीपेक्षा एक वेगळा प्रकार बनवला. काँटेस्टसाठी दिलेल्या सहा वस्तूंपैकी 4 वस्तू वापरून डिश (CPPW) बनवायची होती त्याप्रमाणे बनवली. टेस्ट एकदम उत्तम झाली आहे. 👍🏻 खरे तर स्वतःच स्वतःचे कौतुक करू नये... पण खरंच अप्रतिम चव असल्यामुळे राहवले नाही. 😁
● तुम्हीही जरूर करून बघा.. 🤗
चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहुयात... 👍
"चिकन पनीर रोल"
◆ साहित्य : ⤵
◆ पारी साठी (कव्हर) :⤵
● गव्हाचे पीठ 1 वाटी
● बारीक रवा 2 चमचे
● ओवा अर्धा चमचा
● तूप 3 चमचे
● मीठ थोडेसे
● पाणी पाव वाटी
◆सारण : ⤵
● चिकन खिमा पाव किलो
● हिंग अर्धा चमचा
● हळद 1 चमचे
● मीठ आवश्यकतेनुसार
● अर्धे लिंबू
● कांदे 2
● कांदा लसूण मसाला 2 चमचे
● लाल तिखट 1 चमचे
● कोथिंबीर
● तेल 4 ते 5 चमचे
◆ रोल : ⤵
● उकडलेले बटाटे 2 ते 3
● पनीर किसलेले 1 वाटी
● आले अर्धा इंच
● मिरची 2
● तांदूळ पीठ 1 चमचा
● कोथिंबीर
● मीठ थोडेसे
● काँफ्लॉवर 2 चमचे
◆ कृती : ⤵
◆ पारी (कव्हर) :
1. प्रथम एका बाऊल मध्ये गव्हाचे पीठ, रवा, ओवा, मीठ आणि तूप घालून एकत्र करावे.
Gupit : गुपित (लघुकथा) - काही गोष्टी गुपित ठेवणं हे सगळ्यांच्याच हिताचं असतं
2. पाव वाटी पाणी घालून घट्ट गोळा बनवावा आणि एका डब्यात घालून फ्रीज मध्ये ठेवावा. (फ्रीजमध्ये ठेवल्याने कणिक घट्ट राहते)
◆ चिकन खिमा सारण : ⤵
1. प्रथम खिम्यावर हिंग, हळद, मीठ आणि अर्धे लिंबू पिळून 10 मिनिटे मॅरीनेट करावे.
2. गॅसवर छोट्या कुकर मध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून त्यात 1 कांदा बारीक चिरून परतावा.
3. नंतर यात मॅरीनेट केलेला खिमा घालून परतावे.
4. नंतर यात थोडे पाणी घालावे आणि कुकरचे झाकण लावून 1 शिट्टी घेऊन गॅस बंद करावा.
5. कुकरची वाफ गेल्यावर शिजलेला खिमा बाजूला काढावा.
6. एका कढईत थोड्याशा तेलावर बारीक चिरलेला 1कांदा परतून त्यात बाजूला काढून ठेवलेला खिमा, कांदा लसूण मसाला, लालतिखट घालावे आणि सुकी भाजी बनवावी. (खिमा शिजवताना मीठ घातल्यामुळे इथे मीठ घालण्याची आवश्यकता नाही)
7. वरून कोथिंबीर घालावी... आपली खिमा सारण तैयार!
◆ रोल : ⤵
1. एका बाऊल मध्ये उकडलेले बटाटे स्मॅश करावेत.
2. यानंतर यात किसलेले पनीर घालावे
3. यानंतर मीठ + मिरची + आले + कोथिंबीरचे वाटण आणि बाइंडिंग साठी 1 चमचा तांदूळ पीठ घालून चांगले मळून घ्यावे आणि याचे समान गोळे बनवावेत.
4. या गोळ्यांची मोदकाप्रमाणे पारी बनवून त्यात खिम्याचे सारण भरावे आणि थोडेसे उभट आकाराचे रोल बनवावेत.
5. आता फ्रीजमध्ये ठेवलेली कणिक बाहेर काढून त्याची मोठी पोळी लाटावी.
6. या पोळीचे एका वाटीच्या सहाय्याने गोल काप करून घ्यावेत.
7. तयार झालेल्या गोल काप वर सारणाचा एक एक रोल ठेवून अर्धे बंद करून घ्यावेत.
8. एका बाऊल मध्ये 1 चमचा काँफ्लॉवर मध्ये पाणी घालून पातळ पेस्ट करावी.
9. ओपन असलेल्या अर्ध्या भागाला काँफ्लॉवरची पेस्ट लावून तो अर्धा भाग तिळामध्ये घोळवावा.
10. तयार झालेले छोटे छोटे रोल तेलात तळून घ्यावेत आणि टोमॅटो सॉस आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करावेत.
Marathi Recipe : Masala Bhendi मसाला भेंडी तुम्ही कधी सोलर कुकर मध्ये बनवलीत का..?
11. आपले "चिकन पनीर रोल (CPPW)"
तैय्यार !! 😋😋
• कसा वाटला ब्लॉग...
• आवडला का...
• ब्लॉग आवडल्यास जरूर शेअर करा पण माझ्या नावासहित.
• कारण साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.
धन्यवाद ! 🙏
©सौ. सुचिता वाडेकर...✍️
0 टिप्पण्या