"तुला काय वाटतं"
आजपर्यंत जगलीस पोरी,
साऱ्यांच्या सुखासाठी…
सासर- महेर, नातेवाईक,
साऱ्यांच्या आनंदासाठी..!
सासरी तू होतीस,
बाहेरून आलेली..
अन लग्नानंतर माहेरी,
पाहुनी बनून गेलेली...!
तुझ्या अस्तित्वाची,
कधी चिंता केली नाही..
तुला काय वाटतं याचा,
विचारही केला नाही..!
जन्माला आल्यापासून,
अपेक्षांची ओझी..
वहात तू झालीस,
लहानाची मोठी..!
अनेक कठीण प्रसंगात तू.
कणखर बनून राहिलीस..
अन नकळत तू माझी,
आई होऊन गेलीस..!
लग्नामध्ये पाठवणी करताना,
डोळ्यात पाणी आले…
पोटचा गोळा दुसऱ्याला देताना,
मन कातर झाले..!
लहानपणीचे ते दिवस,
पटापट निघून गेले…
अन तुला काय वाटतं,
विचारायचेच राहून गेले..!
(एका वडिलांचे मनोगत)
©सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻️
Positive Mind : "आपणच आहोत आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार"
• कशी वाटली कविता..
• आवडली का..
• आवडल्यास जरूर शेअर करा पण माझ्या नावासहित कारण साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.
धन्यवाद! 🙏🏻
0 टिप्पण्या